ब्रेकिंग

विधान परिषद शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय !

महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण व मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ तसेच मुंबई व नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागांकरिता भारतीय निवडणूक आयोगाने दि. 8 मे 2024 रोजी द्विवार्षिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते.

परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, असे निवेदन आयोगाकडे प्राप्त झाले होते.

या निवेदनाचा विचार करून, महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts