अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरचे उद्योजक गौतम हिरण यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही याबाबत आवाज उठवला आहे. हिरण यांची हत्या हे पोलिस प्रशासनाचे अपयश असल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे.
दरम्यान या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवत दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह आता खुद्द आज नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर हे देखील जिल्ह्यात आले होते.
आज नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांच्यसह पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झालेल्या ठिकाणी ‘बेलापूर-राहुरी बायपास’ येथील ठिकाणाची पाहणी केली.
दरम्यान हिरण यांच्या हत्येने नगर जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण तापले आहे. व्यापारी अपहरणानंतर झालेल्या हत्येमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.