अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. तसेच जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे.
परंतु याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक पूर्णतः वाया गेले आहे. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागात रविवारी झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत.
त्यामुळे मोठे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करुन नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळावी अशी मागणी होत आहे. या मागणीचे निवेदन शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी सोमवारी तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पूर्वभागातील करंजी, पढेगाव, कासली, शिरसगाव, तिळवणी, तळेगाव मळे, दहेगाव, लौकी, धोत्रे, खोपडी,
भोजडे कान्हेगाव वारी तर दक्षिण भागातील अंजनापुर सोयगाव बहादरपूर धोंडेवाडी वेस रांजणगाव मनेगाव आदी गावांना वादळी वाऱ्याचा व मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असून
शेतातील उभी पिके ऊस, मका, कपाशी, कांदा रोप, बाजरी, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या वाऱ्याचा व पावसाचा फटका काढणीला आलेल्या बाजरी, मका, तूर, कपाशी या पिकांना बसला असून शेतातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. या नुकसानीचे काही ठिकाणचे पंचनामे झाले आहेत.
मात्र, शंभर टक्के नुकसान झाल्याने सर्वच पिकांचे पंचनामे करण्यात यावे तसेच तातडीने नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved