अहमदनगरच्या ‘त्या’जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही; के.के.रेंज प्रश्नी शरद पवार मैदानात

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.

राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ उडाली असून नागरिक चिंतेमध्ये असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यासंदर्भात आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार म्हणाले, ‘के.के.रेंजचा परिसर मला माहित आहे.

मी संरक्षणमंत्री असताना या परिसराची पाहणी केली होती. येथील जमिनी शेतक-यांनी विकसित केलेल्या आहेत. याबाबत मी शेतक-यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे.

या जमिनीचे कदापिही हस्तांतरण होऊ देणार नाही’ असे आश्वासन त्यांनी दिले. १४ आॅगस्ट रोजी के.के. रेंजसंदर्भात मुंबई येथे शरद पवार यांची आमदार निलेश लंके यांनी भेट घेतली.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, सरपंच राहुल झावरे, गणेश हाके, धोंडिभाऊ टकले, सचिन पठार आदी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts