अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाने कहर केला असून सातत्याने रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता महापालिकेने जुने दीपक हॉस्पिटल ताब्यात घेतले आहे. काल मंगळवारी नगर शहरातील 270 नव्या बाधितांची भर पडली.
बेडची संख्या आणि बाधितांचा आकडा ताळमेळ जुळत नसल्याने महापालिकेने आता खासगी हॉस्पिटल ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.मनमाड रोडवरील जुने दीपक हॉस्पिटल महापालिकेने ताब्यात घेतले.
तेथे 58 बेडची सुविधा आहे. याशिवाय सिव्हील हॉस्पिटलच्या नर्सिंग होस्टेलमध्ये उभारलेले कोवीड सेंटर ताब्यात मिळावे यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. बाधितांची बेड मिळण्यासाठी होणारी धावपळ यामुळे थांबण्याची शक्यता आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved