अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमधील कर्मचार्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली होऊन 31 जुलैपर्यंत वर्ग ‘क’ व ‘ड’ कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत.
परंतु सध्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेसह अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचे पेशंट सापडले आहेत.
त्यामुळे मुख्यालयात गर्दी होऊ नये म्हणून बदल्यांसाठी कर्मचार्यांची मुख्यालयातून तालुका पातळीवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आजपासून बदली प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी या ऑनलाईन प्रक्रियेला सोमवारी मान्यता दिल्याची माहिती प्रशासनाने दिली. या प्रक्रियेनुसार बदलीपात्र कर्मचार्यांच्या सेवाज्येष्ठता याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या.
या याद्यावर आलेल्या हरकतीवर सुनावणी घेऊन याद्या अंतिम करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज मंगळवार (दि.21) ऑनलाईन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे समुपदेशनानुसार कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत.
यानुसार 22 तारखेला ग्रामपंचायत आणि त्यानंतर महिला बालकल्याण व प्राथमिक शिक्षण विभाग. 23 तारखेला अर्थ विभाग आणि पशुसंवर्धन विभाग, कृषी आणि बांधकाम विभाग,
24 तारखेला लघू पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा आणि आरोग्य विभाग अशा बदल्या होणार आहेत. सोमवारी अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, उपाध्यक्ष प्रताप शेळके,
सभापती सुनील गडाख आणि काशिनाथ दाते यांची मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी यांच्यासोबत राबविण्यात येणार्या व्हीडिओ कॉन्फरन्स बदल्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर पदाधिकार्यांनी यास हिरवा कंदील दाखविला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com