कोपरगाव :- डस्टर कार व बसचा समोरासमोर अपघात होऊन त्यात दोन जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर झाले. ही घटना तालुक्यातील येसगाव येथील पुलाजवळ शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली.
चालक प्रमोद भाऊसाहेब भांबरे (२५, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता) व गणेश नामदेव डांगे (२६, रा. हल्ली मुक्काम पुणे) अशी मृतांची नावे आहे. नितीन रामनाथ डांगे (२५), प्रवीण दिलीप चौधरी (२६, कोऱ्हाळे), अक्षय भास्कर निर्मळ (निर्मळ पिंपरी) हे या अपघातात गंभीर जखमी झाले.
वरील सर्व डस्टर कारने (एमएच १७ एझेड १००) येवला येथे लग्नाला गेले होते. शिर्डीकडे येत असताना सायंकाळी सहा वाजता समोरून येणाऱ्या अक्कलकोट-मालेगाव या बसला (एमएच १४ बीटी २९३४) जोराची धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाली. यात भांबरे व डांगे हे दोघे जागीच ठार झाले.