ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग ! अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा ! महसूल मंत्री विखेंचे आदेश

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. पारनेर तालुक्यात मात्र गारपिटीने कहर केला. तालुक्यातील जवळा, सांगवी सूर्या, निघोज, वडनेर, सिद्धेश्वर वाडी, पानोली या प्रमुख गावांसह इतर दहा ते बारा गावांमध्ये जबरदस्त गारपीट झाली आहे.

शेतकऱ्यांचे हात तोंडाशी आलेले घास गेले आहेत. पपई, द्राक्षे, केली या बाग अक्षरशः झोपल्या आहेत. तूर, मका आदी पिके भुईसपाट झाले आहेत.

वेळेत पाऊस न झाल्याने पहिली पिके गेलेली होती. आता दीड ते दोन महिन्यापूर्वी झालेली कांदा लागवड अवकाळीने उध्वस्त झाली. शासनाने त्वरित पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

महसूलमंत्री विखेंचे आदेश

पारनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांना तातडीने दिल्या आहेत.

यावर लगेच महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. रविवारी अवकाळीने जे थैमान घातले ते दुःखदायक व प्रलयकारी आहे.

त्यामुळे महसूल मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती विश्वनाथ कोरडे व तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिली.

पुढाऱ्यांची बांधावर धाव अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसह पाहणी करण्यासाठी विविध पुढाऱ्यांची बांधावर धाव घेतली. आ. निलेश लंके, भाजपचे राहुल शिंदे, राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड, विश्वनाथ कोरडे, विजय औटी हे सर्वच सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी देत होते. नुकसानीची पाहणी करत होते. सर्वानीच नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाकडे मागणी करू असे म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts