ब्रेकिंग

48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  राज्यात किमान तापमानात किंचित घट झाली असून अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. पण मुंबईत अद्याप दमट आणि गरम हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे क्षेत्र पुढील काही तासांत आणखी तीव्र बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. उद्याही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहेत.

नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली अशा एकूण अठरा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे.

पुढील काही तासांत या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts