ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीतून गहू चोरीला ! चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

Ahmadnagar Breaking : श्रीरामपूर येथील एमआयडीसीतील गोडाऊन फोडून गोडाऊनमधील ३ लाख ५६ हजाराचा १५८ पोते गहू चोरीची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

याप्रकरणी शशिकांत वामनराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून येथील शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आहे की फिर्यादीत म्हटले , आपण महाबिज प्रक्रिया केंद्र, खंडाळा येथे वरिष्ठ कृषी अभियंता म्हणून काम करतो. महाबिजच्या अतिरिक्त बियाणांची साठवणूक खासगी गोडाऊनमध्ये केली जाते. गोपाल झंवर यांच्या एमआयडीसी येथील खासगी गोडाऊनमध्ये महाबिजचा गहू साठवलेला आहे.

काल (दि. १९) एप्रिल रोजी सदर ३ शटर असणाऱ्या आणि बाहेरून कुलूप लावलेल्या या गोडाऊनचे मुख्य शटरचे सिलबंद कुलूप उघडून आत पाहिले असता आतमधील गव्हाच्या गोण्या कमी असल्याचे लक्षात आले.

तसेच आतमधील शटरची पाहणी केली असता एका शटरचे नटबोल्ट काढल्याचे दिसले. त्यामुळे या ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आल्याने या ठिकाणी कामाला असणारे कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक सागर शिंदे हे गोडाऊनची पाहणी करायला गेले असता, त्यांना बियाणांचे पोते अस्तव्यस्थ दिसले, थप्पीही कमी झाल्याचे दिसले.

त्यावरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लोखंडी तारेचे कुंपण कशाच्यातरी सहाय्याने कट करून गोडाऊनचे लोखंडी शटरचे आतील नटबोल्ट काढून प्रवेश करून आतमधील १५८ पोते गहू हा चोरून नेल्याचे लक्षात आले.

गुरूवारी (दि. १८) सायंकाळी ६.३० ते शुक्रवारी १९ एप्रिलच्या सकाळी १०.१५ या दरम्यान ही चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts