अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथिल किल्ले शिवपट्टन या ठिकाणी किल्याच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करत असताना 250 तोफ गोळे व तोफेचा फुटलेला भाग आढळून आला आहे.
किल्ल्यावर तोफगोळे आढळून आल्याची बातमी गावात वार्यासारखी पसरली आहे. त्यामुळे तोफगोळे पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.
दरम्यान सापडलेले तोफगोळे खर्डा किल्ल्यात जपून ठेवून येणार्या पर्यटाकांसाठी किल्ल्याच्या आवरातच वास्तु संग्रहालय करुन ठेवण्यात याव्यात अशी मागणी शिवप्रेमींनकडुन होत आहे.
तसेच खर्डा किल्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे लवकरात लवकर व्हावे. तसेच जे काही पुरातन वस्तु मिळतील त्या जपून ठेवूप पर्यटाकासाठी किल्ल्याच्या आवरातच वस्तू संग्रहालय उभारण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
ऐतिहासिक किल्ला खर्डा येथील 1795 च्या लढाईत मराठ्यांनी निजामशाही पराभूत करुन विजय प्रात केला होता. आजही खर्डा भागात अनेक ठिकाणी युध्दाच्या खूणा सापडतात.
या किल्ल्यात रणटेकडी दौडवाडी येथून युध्दाची तयारी आखली जात होती. तेथे ही टेकडी रणांगणाची साक्ष देत उभी आहे. अनेक शेतकरी बांधवांना देखील नागंरताना तोफ गोळे, ढाल, तलवारी मिळुन आलेल्या आहेत.
ही लढाई पाणीपतनतंर विजयाची शौर्याची गाथा ठरली आहे. आजही अनेक खर्डा शहराच्या जवळपास पुरातन वास्तू इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.