बड्या उद्योगसमूहापैकी असणाऱ्या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे, त्यांना पत्नी अर्चना कुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे. आशिष पाटोदेकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोट्यवधींच्या ज्ञानराधा बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे
. ज्ञानराधा बँकेच्या घोटाळ्यासंबंधीचे दस्तऐवज सुरेश कुटे यांना पोलिसांसमोर सादर करायचे असून कुटे यांना ठेवीदारांच्या ठेवी कसे परत करणार तसेच आरबीआय सोबत झालेला पत्रव्यवहार आदींबाबत कागदपत्रे देखील सादर करावे लागणार आहेत.
हिंजवडी येथून अटक, बीडमध्ये आणले
सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे त्याचप्रमाणे ज्ञानराधाचे संचालक आशिष पाटोदेकर यांना पहाटे साडेचार वाजता पुण्यातील हिंजवडी येथून पोलिसांनी ताब्यात घेतलेय. त्यानंतर त्यांना दुपारी तीन वाजता बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले गेले.
..तरच सुटका
कुटे यांनी जर पोलिसांना ठेवीदारांना ते पैसे कसे देणार, या संदर्भात पुरावे सादर केले व पोलिसांना गॅरेंटर दिला, तर त्यांची व संचालक मंडळाची सुटका होऊ शकते परंतु जर हे पुरावे समाधानक कारक नसतील तर त्यांच्या अटकेची कारवाई होऊ शकते.
११ गुन्हे, एसआयटीकडे तपास
ज्ञानराध्याच्या ठेवी वेळेत न दिल्याने ठेवीदारांची फसवणूक संदर्भात सुरेश कुटे यांच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे देण्यात आल्याची माहिती आहे.
साडेसहा लाख ठेविदारांचे हजारो कोटी अडकले
ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये तब्बल साडेसहा लाख ठेविदारांचे 3 हजार कोटी रुपये अडकले असल्याची माहिती आहे. सध्या यातील ठेवीदार हे प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान आता मागील 9 महिन्यांपूर्वी कुटे यांनी जे चेक दिले होते त्याच्या तारखा संपत आल्या आहेत.
हे ठेवीदार हे चेक बँकेत टाकणार असल्याची महती समजली आहे. मागील आठ दिवसांपासून ज्ञानराधाच्या 51पैकी 26शाखा बंद असल्याने ठेवीदारांच्यात ठेवींबाबत धास्ती आहे. दरम्यान आता न्यायालयाने पहिले सत्र न्यायाधीश अली एस.ए.एस. एम. यांनी माजलगाव शहर ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे व तपासाचे आदेश दिलेत.