अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आपल्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना जे काम करायचे आहे, ते प्रामाणिकपणे करू ! पाहिजे तसा जिल्ह्याचा विकास झाला नाही.
मात्र, शहरासह जिल्हा विकसीत आणि सुंदर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत राज्यात अव्वल राहील, यासाठी प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
पालकमंत्री मुश्रीफ हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रशासनातील विविध खाते प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर नियोजन भवन सभागृहातच पालकमंत्री मुश्रीफांनी पत्रकारांशी संवाद साधला
. यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी आदी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, मागील आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजनाचा उर्वरित ४० टक्के निधी प्राप्त झाला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत हा निधी निश्चित केलेल्या योजनांवर खर्च करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.
नियोजनचा निधी १०० टक्के खर्च करण्यामध्ये जिल्हा गतवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात अव्वल राहील. आगामी आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन आराखड्यात सुमारे शंभर कोटींचा वाढीव निधी नाशिक येथील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मिळाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com