Ahmednagar Breaking : भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला ठार झाली. तर तिचा पती व मुलगा जखमी झाल्याची घटना (दि. २६) सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे रोडवर म्हाळुंगी बायपास पुलाजवळ घडली.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत खराडकर हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एम.एच १७ बी. टी. ३६१६) पत्नी वैष्णवी उर्फ रोहीणी खराडकर व मुलगा शुभ चंद्रकांत खराडकर यांना घेऊन (दि. २६) सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गाने जात होते.
यावेळी मागून येणाऱ्या पिकअपने ( क्रमांक. एम. एच. १४. के. ए. ७३३४) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये वैष्णवी उर्फ रोहिणी कराडकर यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मुलगा शुभ व पती चंद्रकांत हे जखमी झाले.
जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत अश्वीनीकुमार दिपक बेल्हेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात काल रविवारी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पिकअप चालक सतिष संदीप डोंगरे (रा. पांगरीमाथा, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.