नगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात.

अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाबाबत बैठक घेऊन त्यात भुसंपादनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या पुलाचे काम व्हावे यासाठी लक्ष दिले आहे. भुसंपादनाचे काम सुरू होऊन तीन महिन्यात कामाला सुरुवात होऊ शकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केली.

प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मिट द प्रेस’ उपक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी द्विवेदी यांनी पत्रकार, तसेच आवृत्ती प्रमुखांशी संवाद साधला.

या वेळी अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, शाहुराव मोरे, संदीप आहेर, डॉ. विरंेद्र बडदे, सदाशिव शेलार, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त प्रदीप पठारे, सुनील पवार उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाले, उड्डाणपुलासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे कामासाठीच्या निविदा उघडण्याचा मार्ग मोकळा होईल. स्टेशन रस्त्यावर काही लष्करी व सरकारी जमिनी आहेत. खासगी जमीनधारकांना टिडीआर किंवा पैशाच्या स्वरूपात मोबदला दिला जाईल.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24