अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ५९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ६५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६३८५ इतकी … Read more

शिव राष्ट्र सेनेच्या शहराध्यक्षपदी अरुण खिची यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-  शिव राष्ट्र सेनेच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी खिची यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तर शेतकरी आघाडीचे भैरवनाथ खंडागळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी दलित आघाडी जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अनिल शेकटकर, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब … Read more

राहते घर खाली करण्यासाठी लॅण्ड माफीयांची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- राहते घर खाली करण्यासाठी व बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेण्यासाठी जेसीबी व इतर साहित्य घरी आणून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या लॅण्ड माफियावर कारवाई करावी. तसेच गुंडांना सोडून आमचे घर खाली करुन देण्यासाठी लॅण्ड माफियास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनरीक्षक सहकार्य करीत असल्याचा आरोप दीपक ओमप्रकाश कुडिया यांनी करुन संबंधितांवर कारवाई … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : कोरोनाचा उद्रेक कायम, चोवीस तासांत वाढले तब्बल ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून चोवीस तासांत तब्बल 1100 रुग्ण वाढले आहेत  तालुकानिहाय सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे –  राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळ सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे तो म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? राज्याचे … Read more

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सह. पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 91 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्चुअल पध्दतीने घेण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सभा संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर व पदसिद्ध उपाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय ज्ञा.पवार तसेच संस्थेचे माजी … Read more

पुतणींच्या हिश्याची जागा बळकावून परस्पर विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आई, वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जीत चार पुतणींच्या हिश्याची जागा बळकावून परस्पर विक्री करणार्‍या चुलते व इतर नातेवाईक असलेल्या राजकोटवाला परिवारातील सहा सदस्यांवर जिल्हा न्यायालयाच्या आदेशान्वये कोतवाली पोलीस स्टेशनला रविवारी (दि.28 मार्च) गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अक्सा अन्वर राजकोटवाला (वय 22 वर्षे, रा. अहमदनगर) या मुलीच्या फिर्यादीवरुन हबीब इस्माईल राजकोटवाला, रेहान … Read more

कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी ताटकळत ठेवल्याप्रकरणी साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-मृत झालेल्या कोरोना रुग्णाचे मृतदेह बील अभावी बारा तास ताटकळत ठेऊन त्याची अवहेलना करुन, नातेवाईकांना पैश्यासाठी मानसिक त्रास देत धमकाविल्याप्रकरणी शहरातील साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन दिले. तसेच सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी … Read more

अरुण जगताप यांनी लस घेवून केले करोना मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ संचालित गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद रूग्णालयात महापालिकेच्या सहकार्याने सिरामच्या मोफत कोविड १९ च्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष आ.अरुण जगताप यांनी स्वतः लस घेवून केले. आ. अरुण जगताप म्हणाले, संपूर्ण जगात धुमाकूळ घालणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व नागरिकांसाठी शासनाने कोविड प्रतिबंधक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा महिनाभर बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने आज मार्च महिन्यात सर्वाधिक बाधितांचा विक्रम नोंदविला. मागील 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. यावेळी जिल्ह्यातील … Read more

प्रादुर्भाव वाढताच मनपा आणखी दोन कोवीड सेंटर सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यने महापालिकेने नटराज हॉटेल आणि जैन पितळे बोर्डिंगमध्ये कोवीड सेंटर सुरू केले. तेथे 210 बाधितांवर उपचार करता येणार आहे. आता महापालिकेने आणखी दोन ठिकाणी नव्याने कोवीड सेंटर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यापासून नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून उपचार घेणार्‍या बाधितांची संख्या दीड … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अहमदनगर  जिल्ह्यात आज ६९२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ०५३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.३१ टक्के इतके झाले आहे.दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३४७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५८९४ इतकी झाली … Read more

नगरकरांनो घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या काय म्हणालेत पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने निर्बंधांचे नवीन आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता रात्री ८ नंतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सर्व दुकानेही ८ वाजेपर्यंतच बंद करणे अनिवार्य असणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे घेतले जाणार ‘हे’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आता बाधित रुग्णांना गृह विलगीकरण ऐवजी कोविड केअर सेंटरमध्येच दाखल केले जाणार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : पुन्हा एकदा सर्वाधिक रुग्णवाढ, आकडे वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 453 रुग्ण आढळले. त्या खालाेखाल राहाता आणि काेपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या आहे. ती अनुक्रमे 116 आणि 102 एवढी आहे. नगर शहरात वाढती रुग्णसंख्या पाहून आयुक्त शंकर गाेरे यांनी शहरातील सर्व काेविड सेंटर सुरू करण्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ वेळेत असेल जमावबंदी जाणून घ्या काय असेल सुरु आणि काय बंद ?

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात व लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांना १५ एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आला. जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा जमावबंदी आदेश लागू केला. … Read more

बरे झालेल्या कोरोना रुग्णांवर फुलांची उधळण करुन होळी साजरी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- घर घर लंगर सेवा व महापालिकेच्या वतीने हॉटेल नटराज येथे सुरु करण्यात आलेल्या गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांवर फुलांची उधळण करुन होळी साजरी करण्यात आली. कोरोना रुग्णांचे आत्मबळ वाढविण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरी न थांबता … Read more

काचबिंदूने अंधत्व आलेल्या मुक्ताबाईना फिनिक्सने दिली नवदृष्टी

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- एक वर्षापुर्वी काचबिंदूने अंधत्व आलेल्या मुक्ताबाई धाडगे या आजीबाईंना फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली. निकामी झालेल्या डोळ्यास पुन्हा दृष्टी लाभल्याने आजीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. फिनिक्स सोशल फाऊंडेशनने नागरदेवळे (ता. नगर) येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. … Read more

अरणगावात आठ दिवस कॅन्टोन्टमेंट झोन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जिल्ह्याने दरदिवशी हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे कोरोनाचे वादळ जिल्ह्यावर हाहाकार माजवत आहे. यामुळे प्रशासन देखील कठोर निर्णय घेऊ लागले आहे. नगर तालुक्यातील अरणगाव येथ कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने प्रशासनाच्यावतीने अरणगाव आठ दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. येथील कोरोनाबाधित … Read more