पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांनी करोना चाचणी करून घ्यावी…

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात करोना वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत एक अधिकारी व सात कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी कर्मचारी धास्तावले आहेत. करोना रुग्ण वाढत असल्याने तीन दिवसांपासून कामकाजावर परिणाम झाला आहे.कोरोना संख्या वाढू नये म्हणून सॅनिटायझर करणे, अधिकारी, कर्मचार्‍यांची दररोज … Read more

कोरोना बाबत जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अधिकार्‍यांची आढावा बैठक

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ११ हजारचा आकडा पार केला आहे, यामुळे जिल्ह्यात आरोग्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्या (दि.14) शुक्रवारी जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अधिकार्‍यांची आढावा बैठकीचे आयोजन … Read more

अहमदनगर शहरातील हे हॉस्पिटल मनपाच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाने कहर केला असून सातत्याने रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता महापालिकेने जुने दीपक हॉस्पिटल ताब्यात घेतले आहे. काल मंगळवारी नगर शहरातील 270 नव्या बाधितांची भर पडली. बेडची संख्या आणि बाधितांचा आकडा ताळमेळ जुळत नसल्याने महापालिकेने आता खासगी हॉस्पिटल … Read more

एका दिवसात सात रुग्णांचा बळी, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्ण संख्येने ओलांडला अकरा हजाराचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने आणखी सात जणांचा मृत्यू होऊन बळींची संख्या १२४ झाली. २४ तासांत रुग्णसंख्येत ६४७ ने वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ११२७३ झाली आहे. व उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३४०८ झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ११३, अँटीजेन चाचणीत २४९ आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये २८५ नागरिक बाधित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नव्या ६४७ रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७७४१ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.६७ टक्के इतकी आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोन ठार

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-  कर्जत तालुक्यातील चिंचोली फाटा येथे अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी (१२ ऑगस्ट) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास झाला. ठार झालेल्यांमध्ये कर्जत-अमरापूर रस्त्यावरील कामाचा अभियंता व मजुराचा समावेश आहे. हा अपघात दुपारी अडीचला झाला. कर्जत-अमरापूर रस्त्याचे काम सुरू आहे. टेम्पोत (एमएच ४३/एफ-५८६) टिकाव, फावडे, घमेले व … Read more

अहमदनगर Live24 ची पाच वर्षे …..

5 वर्ष म्हणजे सरासरी 1825 दिवस होय …तर आज अहमदनगर Live24 सुरु करून इतके दिवस झालेत  वयाच्या 18 व्या वर्षी पत्रकारितेतील ‘प’ ही माहित नसताना एक न्यूजपोर्टल आणि ते ही जिल्ह्याचे बनविले जे आज visits, likes, followers च्या आणि जिल्ह्यातील सर्वच मिडीया हाउस स्पर्धेत नंबर 1 वरच विराजमान आहे  मागे वळून पाहिलं तर रिस्क घेण … Read more

सर्वांच्या प्रयत्नातून नगर लवकरच होईल कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :-नगर शहर तसेच जिल्ह्यात सुरुवातीपासून सर्व यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. हजारो रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतत आहेत, ही चांगली बाब आहे. उपचारांबरोबरच सर्वसामान्यांना विश्वास देण्याचे काम यंत्रणेकडून होत असल्याने नगर लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आडते बाजार मर्चंटस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी व्यक्त केला. मर्चंटस्‌ असोसिएशनतर्फे जिल्हा रूग्णालयास … Read more

24 तासांत 544 पॉझिटिव्ह व पाच जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ६२६ झाली. त्यातील ७ हजार २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मंगळवारी नगर शहर व जिल्ह्यातील आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. २४ तासांत ५४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयात ९३, अँटीजेन चाचणीत १७१ आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये २८० बाधित आढळले. जिल्हा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ५४४ रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२६३ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.३५ टक्के इतकी आहे.  दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज ‘इतके’ नवे रुग्ण आढळले तर ६१६ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात आज ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७३६३ झाली आहे.. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७१.७५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज तब्बल ६१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- आज तब्बल ६१६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. आतापर्यंत सात हजाराहून अधिक रुग्ण झाले बरे! मनपा ३०० संगमनेर २० राहाता ६ पाथर्डी २४ नगर ग्रा.१८ श्रीरामपूर२६ कॅन्टोन्मेंट२१ नेवासा १७ राहुरी१९ श्रीगोंदा ३७ पारनेर ३८ अकोले २ शेवगाव३३ कोपरगाव २० जामखेड ७ कर्जत २७ मिलिटरी हॉस्पीटल १ बरे झालेले एकूण रुग्ण:७२६३ आमच्या … Read more

व्यापार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू : कांदा लिलाव ‘या’ तारखेपर्यंत बंद !

अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा १० हजारांच्या पार गेला आहे. परंतु यात अहमदनगर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत आहे.  शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. आता या कोरोनाची लागण होऊन अहमदनगरच्या बाजार समितीतील व्यापार्‍याचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापार्‍यांनी 15 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येने ओलांडला दहा हजारचा टप्पा !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात आज ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६६४७ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६५.९३ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३५९  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या अहमदनगर येथील क्षेत्रीय लोकसंपर्क व्‍ह्युरोद्वारे आयोजित कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती,  प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजना आणि आत्‍मनिर्भर भारत या योजनांवर आ‍धारित फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी अभियानाचा शुभारंभ आज (सोमवारी) जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात आला. या फिरत्या प्रसिद्धी वाहनाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग … Read more

एका शववाहिकेत 12 कोरोनाबाधितांचे मृतदेह होते, इतका भयंकर प्रकार पाहिल्यावर मन …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारावेळी मृतदेहांची प्रचंड अवहेलना व हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार नगरच्या जिल्हा रूग्णालयात उघडकीस आला आहे. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले असून मानवतेला काळीमा फासणारे प्रकार सध्या सुरु असल्याचे म्हटले आहे. या व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईल आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा बोराटे यांनी … Read more

जिल्हाधिकारी व्दिवेदींनी दुजाभाव केला ; भाजपकडून धिक्कार

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- कोरोनामुळे अहमदनगरमध्ये सर्वच दुकानांची वेळ ठरलेली आहे. परंतु ही वेळ २ तासांनी वाढवावी असे निवेदन देण्यासाठी भाजप पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. परंतु कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ते निवेदन हातात घेण्यास नकार दिला. मात्र या पदाधिकारी समोरच त्यांनी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडून शिवसेनेचे निवेदन स्वीकारले. त्यामुळे जिल्हाधिकारी हे दुजाभाव करत आहेत आणि … Read more

अहमदनगर शहरात भयानक परिस्थिती आहे….!

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-  सध्याच्या परिस्थिती मध्ये कोरोना विषाणू ने अहमदनगर शहरात थैमान घातले असून अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे या स्थितीतून बाहेर पडावयाचे असल्यास जनता कर्फ्यू ची गरज आहे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केले आहे. गेल्या दहा दिवसात नगर शहरात कोरोना पॉसिटीव्ह चे प्रमाण अत्यंत भयानक … Read more