मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आणखी 6 जण ‘कोरोना’ पॉजिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या अजूनही कंट्रोलमध्ये येण्याचे चिन्हे दिसत नाही. आज (रविवार) एकाच दिवशी जिल्ह्यात सकाळी बारा आणि संध्याकाळी सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी ०६ नवे रुग्ण नगर शहरातील तिघे तर श्रीगोंदा तालुक्यातील तिघे बाधित आहेत. नगर शहरातील तोफखाना भागातील ६२ वर्षीय … Read more

आता मंत्रीपद टिकविण्यासाठी बाळासाहेब थोरातांची धडपड सुरु !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर : नेहरु, गांधी यांचे विचार सोडून काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना मातोश्रीच्या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्थान आहे, याबद्दल न बोललले बरे मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले. आणि आता मंत्रीपद टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. … Read more

‘या’ आमदाराने रिक्षा चालवून दिले विरोधकांना उत्तर

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर : कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांची मागील काही दिवसांपासून मतदारसंघात जोरदार बॅटिंग सुरु आहे. यात थेट नगराध्यक्षांनाच राष्ट्रवादीत आणण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. सध्या आ.पवार हे मतदारसंघातील दौर्‍यावर असून यादरम्यान त्यांनी रिक्षा चालवण्याची मजा घेतली. कार्यकर्त्यांना रिक्षात मागे बसवून त्यांनी काही अंतरापर्यंत रिक्षाचे सारथ्य केले. रिक्षा … Read more

विनापरवानगी तालुक्यात आल्याने या तालुक्यातील ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर : कोरोनाच्या काळात पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विलगीकरण केंद्रात शासकीय कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर दाखल झालेल्या ११ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबधीची फिर्यादी भाळवणी गावचे ग्रामविकास अधिकारी संपत राधुजी दातीर यांनी दिली असुन, याप्रकरणी सुनील एकनाथ भोसले, संगीता सुनील भोसले, मारुती दगडू भोसले, … Read more

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा : रेशमा आठरे

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : नगर : महात्मा फुले जन आरोग्य योजना ही नागरिकांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, यासाठी राज्य सरकारने ३१ जुलैपर्यंत केसरी, पिवळे रेशन कार्डबरोबरच आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमध्ये सुमारे ९७१ आजारांवर निदान केले जात आहे. विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ हुक्का पार्लरवरील छाप्यात उच्चभ्रू तरुण-तरुणी ताब्यात !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :दौंड रोडवरील अरणगाव शिवारातील एका हॉटेलवर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला. येथे हुक्का पार्टी सुरु असल्याची खबर मिळाली होती. या छाप्यामध्ये नगर तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यादरम्यान उच्चभ्रू समाजातील मुला- मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले  आहेत. संगमनेर तालुक्यातील ०७ पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित *संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित. दिल्ली … Read more

धक्कादायक : नगरमधील ‘त्या’ कोरोनाग्रस्त रुग्णाला टेस्ट रिपोर्टसह मुंबईहून नगरला पाठवले !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  नगर शहरातील सारसनगर येथे नव्याने ५८ वर्षीय कोरोना रुग्ण सापडला. परंतु त्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णाचा अहवाल हा मुंबईमध्येच पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यानंतरही या रुग्णाला त्या ठिकाणीच उपचार मिळणे आवश्यक असताना  केवळ हातावर शिक्का मारून नगरला पाठवण्यात आले. मात्र यानिमित्ताने पॉझिटिव्ह पेशंट मुंबईवरून नगरमध्ये … Read more

किरण काळे यांची युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या नगर ग्रामीण व शहर जिल्हा समन्वयक पदी निवड

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  किरण काळे यांची युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या नगर ग्रामीण व शहर जिल्हा समन्वयक पदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात आदेशावरून व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाचे युवा नेते किरण काळे यांची अहमदनगर ग्रामीण आणि नगर शहर … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केली आदर्श गाव हिवरे बाजारची पाहणी

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  मा.नामदार शंकरराव गडाख मंत्री जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांनी दि.२० जून २०२० रोजी आदर्शगाव हिवरे बाजारला भेट देऊन जलसंधारण तसेच विविध विकास कामाची पाहणी केली तसेच आदर्श गाव योजनेची आढावा बैठक घेतली. पद्मश्री पोपटराव पवार यांनी नामदार गडाख यांचे स्वागत केले. नामदार गडाख यांनी आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत्राची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले आज 6 नवे रुग्ण ! एकूण संख्या @282…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 282 वर पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण बाधित. संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष … Read more

कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास ५० हजारांची मदत !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : अहमदनगर महानगर पालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांचे हित जोपासणारी संस्था आहे. सभासदांचे हित लक्षात घेऊन संचालक मंडळाने सभासदांसाठी विविध निर्णय घेण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. देशात संध्या कोरोनाचा संसर्गविषाणूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नगर … Read more

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे होम क्वारंटाइन, ‘त्या’वादावरून शीतयुद्ध उफाळून येण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : लॉकडाऊन काळात विनापरवाना कारमधून केलेला नगर-पुणे प्रवास जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या चांगलाच अंगलट आला. महसूल प्रशासनाच्या फिर्यादीवरून बेलवडे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. नावंदे यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. नावंदे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहिल्या. पदभार घेतल्यानंतर काही दिवसांतच … Read more

विरोधीपक्षनेते असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पाय धरले ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विखे पाटलांना टोला

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   ते विरोधीपक्षनेते असताना त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना आम्ही पाहिले आहे. त्यामुळॆ त्यांनी माझ्यावर टीका करू नये,असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आज लगावला. विखे पाटील यांनी काॅंग्रेस सत्तेसाठी लाचार आहे. काॅंग्रेसच्या मंत्र्यांना कोणी विचारीत नसून, सत्तेसाठी ऐवढे लाचार प्रदेशाध्यक्ष मी प्रथमच पाहिले, अशा शब्दांत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 7 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांचा आकडा झाला @276!

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज सातने वाढ झाली आहे, आज संध्याकाळी कोरोनाचे चार रुग्ण वाढले असून सकाळी तीन रुग्ण आढळले होते.   त्यामुळे आज अखेर जिल्ह्याची एकूण कोरोना ग्णसंख्या २७६ झाली असून ऍक्टिव्ह केसेस ४५ झाल्या आहेत. जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत  सायंकाळी o४ ने वाढ पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :   शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांना चीनच्या विरोधात आंदोलन करणे चांगलेच महागात पडले आहे. जिल्हाधिकार्याच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेच्या २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. भगवान फुलसौंदर, बाळसाहेब बोराटे, योगीराज गाडे,अभिषेक कळमकर , सुरेश तिवारी ,विक्रम राठोड यांचा यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिला अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, तहसीलदार झाले फिर्यादी!

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास … Read more

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांना तहसीलदारांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास … Read more