अहमदनगर जिल्ह्यातही लवकरच सुरु होणार दारू घरपोहच !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले आहे. दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर दुकानासमोर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याने करोनाचा धोका होण्याची भिती व्यक्त होऊ लागली. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने घरपोच मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. राज्य … Read more

‘त्या’अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक राजेश आहुजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यालय सोडून विनापरवानगी रेड झोन पुण्यात प्रवेश केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी फिर्याद दिली. लॉकडाऊनमध्ये अधिकाऱ्यांनीही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन निरीक्षक आहुजा यांनी पूर्वपरवानगी न घेता … Read more

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढली, वाचा सविस्तर बातमी…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे तर दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे. निमोण येथील त्या व्यक्तीचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेल्या रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आलेल्या रुग्णाचा आज मंगळवार दि.19 रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण येथील कोरोना संशयितांचा आज दि.१९ रोजी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या त्या संशयितांचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप मिळाला नसल्यामुळे … Read more

अबब !… एकाही परप्रांतीय मजुराचा प्रवास खर्च केंद्राने उचललेला नाही…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातून आपापल्या राज्यांमध्ये परतलेल्या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा एकही दमडीचा खर्च केंद्र सरकारने उचललेला नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च केल्याचे माहिती देशाला दिली. देशवासियांना चुकीची माहिती देणाऱ्या सीतारामन या खोटारड्या असल्याचे, अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीचे किरण काळे यांनी म्हटले आहे. किरण काळे यांनी … Read more

पोलिस निरीक्षकाच्या प्रकरणात ‘मिटमामिटवी’ नेमके काय झाले ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पोलिस निरीक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेची काहीजणांच्या मध्यस्थीनंतर पोलीस निरीक्षकासोबत तडजोड झाली. प्रकरणात मिटवामिटवी झाल्यानंतर पोलिस निरीक्षकाने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. पोलीस निरीक्षकावर एका महिलेने शारीरिक अत्याचार करून गर्भपात केल्याचा आरोप केला होता. याबाबतची पोस्ट सदर महिलेने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर टाकली होती. ती … Read more

नगरी माणसे माणुसकी जपणारी ,कामाला येथेच येऊ….

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- आज राहत केंद्राद्वारे १९३ परप्रांतीय  श्रमिकांना राज्य परिवहन महामंडळाद्वारे त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय  खासगी वाहनांमधून ३१३ लोकांना घरी रवाना करण्यात आले. काल ८८ परप्रांतीयांना शासकीय सुविधेद्वारे मोफत तर १८४ श्रमिकांना खाजगी वाहन वाहनांद्वारे रवाना करण्यात आले. जाताना सर्वांना शिजवलेले अन्न, तहान आणि भूक लाडू , गरजेनुसार औषधे सोबत दिलेली … Read more

बळीराजा पोलिस दादांसाठी उदार…’इतक्या’ मोसंबी दिल्या विनामोबदला !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- औरंगाबाद येथील एकाने नगर पोलिसांसाठी अडीच टन मोसंबी पाठविल्या आहेत. अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्या हस्ते त्या मोसंबींचे वाटप करण्यात आले. सध्या पोलिस कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढविणारी फळे त्यांना मिळणे गरजेचे आहेत. हाच विचार करून औरंगाबाद येथील शेतकरी मुरलीधर चौधरी यांनी … Read more

निस्वार्थ भावनेने मानधन न घेता संकट काळात उभे राहिलेल्या माजी सैनिकांचा विचार व्हावा

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  कोरोना महामारीच्या संकट काळात निस्वार्थ भावनेने मानधन न घेता पोलिस दल व आरोग्य सेवेच्या मदतीसाठी उभे राहिलेले माजी सैनिकांना विमा संरक्षण देऊन त्यांना शासनाच्या सेवेत समावून घेण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे … Read more

त्या वैद्यकीय अधिकार्‍याकडून जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांना त्रास देण्यास सुरुवात

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी देण्यात आलेले संरक्षण कीट पळविणार्‍या निवासी वैद्यकीय अधिकार्‍याचे निलंबन करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी घरीच अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप मुरंबीकर यांनी शनिवार दि.16 मे रोजी नाशिक विभागीय आरोग्य उपसंचालकांचे … Read more

दारूड्यांकडून महिलेस मारहाण

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- दारूच्या नशेत महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. भिंगारमधील इंदिरानगर झोपडपट्टीत शनिवारी (दि. 16) ही घटना घडली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात विशाल साबळे, करण साबळे, सिदान साबळे (सर्व रा. भिंगार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मारहाणीत रेणुका अविनाश भिंगारदिवे (वय 27, रा. इंदिरानगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ 7 जण कोरोनामुक्त, जिल्हयात आतापर्यंत 49 रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जिल्ह्यातील एकूण ०७ जण कोरोनामुक्त झाले. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील या ०७ कोरोना बाधित रुग्णांना आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त … Read more

अहमनगर करांसाठी आंनदाची बातमी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील ६ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवले होते. त्यापैकी सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २ अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान आज जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. अहमदनगर  जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

चारित्र्याचा संशय घेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  चारित्र्याचा संशय घेवून एका महिलेस आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील भातोडी येथील किरण किसन काळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. साक्षी किरण काळे असे आत्महत्या केलेले महिलेचे नाव आहे. साक्षी काळे यांनी कापूरवाडी येथील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी भाऊसाहेब राजाराम धामणे … Read more

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात असणार 5 झोन, असे असतील नियम आणि अटी

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- आजपासून 31 मे पर्यंत देशात लॉकडाऊन 4.0 लागू करण्यात आला आहे. दरम्यान गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. With a view to ensuring safety in offices and workplaces, employers on best effort basis should ensure that Arogya Setu is installed by all employees having … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना सावट गडद : शहर संकटात असताना महापौर अडकले प्रभागात !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- संपूर्ण नगर शहरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे परंतु शहराचे महापौर मात्र प्रभागातच गुंतलेले आहेत. ते केवळ प्रभागापुरते माहिती घेऊन घरातच बसतायेत. त्यामुळे ते शहराचे महापौर आहेत की प्रभागाचे ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलत नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली. महापौर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन चालकांकडे मागितली खंडणी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन येथील दत्त हॉटेल येथे सुरु असलेल्या शिवभोजन केंद्राचे छायाचित्र काढून सामाजिक कार्यकर्त्याने शिवभोजनची तक्रारी थांबविण्यासाठी 5 लाख रुपयाची खंडणीची मागणी केल्याची तक्रार अजित गायकवाड यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला केली आहे. शहरात शिवभोजनच्या तक्रारी वाढल्या असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. दि.15 मे रोजी शिवभोजन थाळीचे … Read more