अहमदनगर जिल्हा लवकरच ग्रीन झोनमध्ये !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली आहे.रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांची तातडीने तपासणी, रुग्ण आढळलेला परिसर तातडीने सील करणे, तसेच बाधित व्यक्तीचा इतरांशी संपर्क तोडणे या जिल्हा प्रशासनाने केलेल्या त्रिसूत्री उपाययोजनांमुळे जिल्हा ग्रीनझोनकडे वाटचाल करत आहे. या तीन प्रमुख उपाययोजनांमुळे जिल्ह्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. राज्यात … Read more

धक्कादायक : अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये सापडली ‘ही’ वस्तू !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- शहरातील काही भागात गेल्या ८ दिवसांपासून पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने नगरसेवक गणेश भोसले व नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आज थेट वसंत टेकडी वरील महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पालाच भेट देऊन पाहणी केल. अहमदनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये रिकामी गोणी अडकून बसल्याचे निदर्शनास आले. यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर … Read more

महत्वाची बातमी : ‘त्यांना’ आता अहमदनगर मध्ये ‘नो एण्ट्री’ !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लाॅकडाऊन शिथिल झाल्याने अनेक मजूर, नातेवाईक नगरमध्ये वास्तव्याला येत आहेत. परवानगी असेल, तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. परवानगी असेल त्यांची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जातील. अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शहरात १७ प्रभाग सुरक्षा समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणेसह नगरसेवकांचाही … Read more

अहमदनगरकरानों काळजी घ्या ! जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा, वाचा महत्त्वाची बातमी

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  कोरोना व्हायरस तसेच लॉकडाऊन चे संकट सुरु असतानाच आता अवकाळी पाऊसही बळीराजाची चिंता वाढविणार असल्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने राज्यभरात पावसाचे संकेत दिले आहेत.रविवारी (ता.१०) अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत वादळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आजही पुढील तीन ते चार तासात वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा, मुंबई हवामान विभागाने दिला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 4 रुग्ण झाले कोरोनामुक्त; आज डिस्चार्ज,आतापर्यंत ४० जण झाले कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जामखेड येथील ०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.आज या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली … Read more

अहमदनगर जिल्हातील दुकाने आणि आठवडे बाजाराबाबत नवा आदेश

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेंटमेंट झोन वगळता महानगरपालिका, नगरपालिकाहदीतीन एकल (stand alone), वसाहती लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि याची काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नागरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी ०१ जण कोरोनामुक्त, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- जिल्ह्यातील नेवासा येथील ०१ कोरोनामुक्त होऊन आज घरी परतला. आज या रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ५३ असून त्यापैकी आता १४ जणांवर उपचार सुरू असून ०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी … Read more

भाजप निष्ठावंत माजी मंत्र्यांची श्रेष्ठींवर नाराजी !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी विधानपरिषदेबाबत माझ्या नावाची शिफारस केली होती. 81 शिफारशी झाल्या होत्या. त्यामुळे श्रेष्ठींनी निर्णय घ्यायला हवा होता. आजी-माजी आमदारांनीही शिफारशी केल्या होत्या. तरीही श्रेष्ठींना विचार केला नाही, अशा शब्दांत भाजपचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी श्रेष्ठींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जाणाऱ्या शिंदे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरला भरस्त्यात कमरेच्या बेल्टने मारहाण !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कारला दुचाकीची धडक देऊन धक्का लागल्याच्या कारणातून डॉक्टरला शिवीगाळ करून भररस्त्यात कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. नगर-मनमाड रस्त्यावरील लोकमत भवनशेजारी ही घटना घडली. साईदीप हॉस्पिटल येथील डॉक्टर मिलिंद कांबळे हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून घराकडे चालले होते. त्यावेळी त्यांच्या कारला एका दुचाकीने पाठीमागून धडक दिली. गाडीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराने डॉक्टरसोबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५३

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही ३६ वर्षीय व्यक्ती धांदरफळ येथीलच आहे. या व्यक्तीचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे. तर, धांदरफळ येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ०८ … Read more

‘तो’ पोलिस निरीक्षक अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याने पोलिस निरीक्षकाने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. शहरात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एका महिलेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्याने जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अहमदनगर Live24 वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 52 !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे. जामखेड येथील ०२ कोरोना बाधित तरुणापैकी एकाचा चौदाव्या दिवसा नंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर दुसऱ्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी दोन दिवसांत झाले ‘एवढे’ अर्ज !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रोज हजारो अर्ज येत आहेत. दोनच दिवसांत २ हजार १०० जणांचे इतर अहमदनगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज आले होते. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना परवानगी देण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ परदेशी नागरिक पोलिस कोठडीत !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  कोरोनाबाधित असलेल्या तबलिगी जमातीच्या पाच जणांचा अहवाल निगोटिव्ह आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील दोन परदेशी नागरिकांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या अटकेची कारवाई केलेली आहे. टुरिस्ट व्हिसा घेऊन भारतात धर्मप्रसार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तीन … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला एकाच दिवसात सात रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  संगमनेर येथील एक महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी ०२ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आणि या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ०७ रुग्ण आढळून आले. आता आलेल्या अहवालानुसार बाधित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना बाधिताची संख्या वाढली !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज संगमनेर शहरातील एक तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी या व्यक्तींचे अहवाल प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. संगमनेर शहरातील एक 59 … Read more

अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन ; उपनेते अनिल राठोड यांचा इशारा

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- ऐन उन्हाळातच उपनगर मधील प्रभाग 1 ते 7 च्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तसेच महापालिकेने वॉलमन वाढवणे गरजेचे आहे. यावर पालिकेने आठ दिवसात तोडगा काढावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला. तसे निवेदन मनपा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही सदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज … Read more