जिल्ह्यातील आठ नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव, कोरोना बाधित एका रुग्णाची प्रकृती उत्तम

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेले्या १५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी ८ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. दरम्यान यापूर्वी आढळलेला कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे आणि त्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयितास झाला स्वाईन फ्ल्यू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत.  नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे, नगरमध्ये आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची परिस्थिती आता ठणठणीत आहे. जे हाय रिस्क संशयित रुग्ण होते त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान आठ जणांचा रिपोर्ट … Read more

कोरोना व्हायरसचा धुमाकूळ : जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट्स या लिंकवर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभर धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता अहमदनगर शहरात देखील आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.जाणून घ्या कोरोना व्हायरसबाबत प्रशासनाचे अपडेट्स, उपाययोजना,निर्णय, माहिती व बातम्या या पेजवर.  (लास्ट अपडेट 4.22 AM 16-03-2020) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत.  नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संभाजी महाराजांचा पुतळा बसविणा-या दहा जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरातील प्रोफेसर चौकात रविवारी (दि़ १५) पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविला. हे समजताच प्रशासनाने पुतळ्याचे पावित्र्य राखत तो काढून घेत सुरक्षित ठिकाणी हलविला. या घटनेनंतर प्रोफेसर चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘तो’ पुतळा हटवला

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;- अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा महापालिका प्रशासनाने पोलीस बांदोस्तात हटवला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी होत होती. परंतु त्यास प्रशासनाकडून दाद मिळाली … Read more

जिल्हा रुग्णालयातून निघून गेलेले कोरोनाचे तीन संशयित पुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम ;-  नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जण पसार झाल्याने एकच गोंधळ उडाला. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. पोलिसांनी शोधासाठी तीन पोलीस पथके तातडीने रवाना केली. पसार झालेले तीनही रुग्ण स्वत: रात्री उशिरा पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती प्रशासनाने दिल्यानंतर या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तीन कोरोना संशयीत रुग्णांनी जिल्हा रुग्णालयातून काढला पळ

अहमदनगर :  जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणुच्या संशयावरून उपचारासाठी दाखल असलेल्या तिघा रुग्णांनी पळ काढल्याची माहिती समोर आहे. या रुग्णांच्या शोधासाठी जिल्हा रुग्णालयाने तोफखाना पोलिसांना पत्र दिले आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी याला दुजोरा दिला. जगभर कोरोनाचा कहर आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा २२ वर गेला आहे. नगर जिल्ह्यात १  जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी अझहर शेखला मध्यप्रदेशातून अटक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील उद्योजक करीम हुंडेकरी अपहरण प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आरोपी  व फरार सराईत गुन्हेगार अझहर मंजूर शेख यांस शिवनी, मध्यप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि. १८/११/२०१९ रोजी पहाटेचे वेळी अहमदनगर शहरातील प्रसिध्द उद्योजक अब्दूल करीम सय्यद, रा. एस. टी. … Read more

अहमदनगर – पुणे रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर – पुणे इंटरसिटी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी लोकसभेत केली.  संसदेच्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांसंबधी लोकसभेत चर्चा सुरू आहे. त्या वेळी डॉ. विखे बोलत होते.नगर-पुणे रेल्वेचा प्रश्न मांडताना त्यांनी सांगितले की, ‘हे अंतर जरी कमी वाटत असले, तरी वाहतुकीची कोंडी आणि … Read more

श्रीपाद छिंदमकडून ‘त्या’ निर्णयास आव्हान !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिकेतील नगरसेवकपद रद्द करण्याच्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयास श्रीपाद छिंदमने न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याच्याकडून याबाबत काही सांगितले जात नाही, पण महापालिकेला यासंदर्भात म्हणणे मांडण्याची नोटीस आली असून, १६ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने छिंदमचे विद्यमान नगरसेवकपद रद्द करण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कॉलेज जवळ पुरुषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नगर कॉलेजच्या जवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत व जवळच विषारी औषधाची बाटली आढळली. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. बापू तुकाराम पवार (वय ४०, रा. अनंतापूर, पाटोदा, जि. बीड) असे त्याचे नाव आहे.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मनपाच्या आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिका आयुक्तपदी श्रीकांत मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण भालसिंग निवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. डिसेंबरपासून मनपा आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे होता. महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाने शुक्रवारी मायकलवार यांची नियुक्ती करून या विषयावर पडदा टाकला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अहमदनगर शहरातील ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर, नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेला कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. सदर रुग्ण सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे. त्यांची प्रकती स्थिर व चांगली आहे. सदर रुग्णांमध्ये अद्याप सर्दी, ताप, खोकला इत्यादी सारखे लक्षणे आढळून आली नाहीत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुण्यापाठोपाठ आज अहमदनगरमध्येही कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं खळबळ माजली आहे दुबईवरून आलेल्या चार संशयितांपैकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. त्यामुळं आता राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा … Read more

कोरोनामुळे 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द

अहमदनगर लाईव्ह24 टीम  :- कोरोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे, मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी नगरकर एकवटले आहेत. प्रशासन, डॉक्टर, सामाजिक संस्था आणि नागरिक आपापल्या परीने खबरदारी घेत असून जनजागृतीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 15 दिवस शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मोठ्या यात्रा, उत्सव या ठिकाणी दक्षता घेण्याचे आदेश जिल्हधिकार्‍यांनी दिले आहेत. प्रत्येक तालुक्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जमुक्तीसाठी मिळाले ‘इतके’ कोटी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बळिराजाला दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. दरम्यान बुधवारपर्यंत जिल्ह्यातील २ लाख २८ हजार ५२१ कर्जखात्यांसाठी १ हजार ४०१ कोटी ९२ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांच्या थकबाकीदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ ब्लॅकमेलर महिलेला अटक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बलात्काराच्या गुन्ह्यात असणाऱ्या आरोपींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी विवस्त्र करून व्हिडिओ काढल्याचा बनाव केल्याच्या गुन्ह्यात बुधवारी पीडित महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या महिलेला १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. जुन्या गुन्ह्यात नातेवाईक असलेल्या आरोपींकडून पैसे मिळविण्यासाठी पती-पत्नीने स्वतःचा व्हिडिओ तिघा मित्रांच्या मदतीने तयार केला होता. त्यानुसार पीडित … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, अफवांना बळी न पडता आरोग्याची काळजी घ्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे. घाबरून जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नागरिकांना केले आहे. दुबईहून व इतर ठिकाणवरुन राज्यात परतलेल्या लोकांची यादीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. यामध्ये नगर शहरातील चौघेजण दुबई … Read more