कोरोनाची कॉलरट्यून बंद करण्यासाठी ही ‘माहिती’ नक्की वाचा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून राज्य सरकार, रूग्णालये, सामाजिक संस्था व संघटना या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहे. सध्या  मोबाइलवर ऐकू येणारी करोना व्हायरसची माहिती देणारी कॉलरट्यूनमुळे ग्राहक वैतागले आहे.  करोनाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारकडून लावण्यात आलेल्या कॉलरट्यूनची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. … Read more

महापालिकेत सत्ताधारी भाजपचे काहीच चालत नाही !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘महापालिकेत सत्ताधाऱ्यांचे काहीच चालत नाही,’ अशी टीका माजी आमदार अनिल राठोड यांनी रविवारी भाजपचे नाव न घेता केली. ‘महापालिकेत अधिकाऱ्यांकडून महिलांना होत असलेल्या त्रासाबाबत कोणीही दखल घेत नाही व हे दुर्दैवी आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मनपातील महिलांनी एका अधिकाऱ्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या निनावी तक्रार … Read more

कोरोनाची दहशत : ‘त्या’ परदेशी नागरिकांमुळे अहमदनगरकरांमध्ये घबराट !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसपासून होणाºया आजाराची दहशत अहमदनगर शहरातही दिसून येत आहे. रेल्वे स्टेशन भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास आलेल्या परदेशी नागरिकांमुळे नगरकरांमध्ये घबराट पसरली आहे. करोनाच्या भितीने नगरकर त्या पर्यटकांना हुसकावून लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भागात सुरू असलेल्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात या पर्यटकांनी फोटोसेशन केले. त्या वेळी त्यांना पिटाळून … Read more

नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा – आमदार संग्राम जगताप

नगर : नगरमध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या, घरफोडी, चेन स्नॅचिंग व मारहाणीचे प्रकार होत आहेत.  कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला  असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. नगरला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी  गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देऊन केली आहे. दरम्यान, ५ मार्चला अशी आढावा बैठक प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांसमवेत घेण्याची मागणी … Read more

मोबाईलची रिंग वाजताच खोकल्याचा आवाज आणि कोरोनाची सूचना

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  जिल्हयात सद्या कोणालाही मोबाईल लावा , रिंग सुरू होताच खोकल्याचा आवाज येतो त्यानंतर कोरोना संबंधी काळजी घेण्याची सूचना येते . केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मदत केंद्राचा नंबर दिला असून तो सांगितला जातो. त्यानंतर पुढच्या माणसापर्यंत रिंग पोहचते. त्यामुळे कोरोनाचा धोका रोखण्यासाठी आता मोबाईलच्या संपर्काच्या यंत्रणेचाच वापर होत असल्याचे कालपासून कोणताही मोबाईल … Read more

अहमदनगर मधील हे १५ पर्यटन स्थळे तुम्हाला माहित आहेत का ?

चांदबीबी महाल शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे.चौथे निजामशाहच्या (1565-88) कारकीर्दीत सलाबतखान महान राजकारणी आणिअंतर्गत मंत्री होते.ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. स्थानिक रहिवाशांनी कधीकधी चुकून चंदीबीबी महल म्हणून संदर्भ दिला. सलाबतखान दुसरा इ.स. 1580 मध्ये ही इमारत बांधली. इमारत सुमारे 70 फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रकार उघडकीस

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथील दूध संकलन केंद्रावर छापा टाकून कारवाई करण्यात आल्याने भेसळयुक्त दुधाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे साहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी … Read more

अहमदनगर शहरात तब्बल तीन टन प्लॅस्टिक जप्त

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बालिकाश्रम रोड परिसरातील एका घरातून महापालिकेच्या पथकाने गुरुवारी (दि.5) कारवाई करत बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा मोठा साठा जप्त केला आहे. सुमारे तीन टन माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज कासलीवाल यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांनी दिली. शासनाने सिंगल युज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घातलेली … Read more

अहमदनगरच राजकारण लय भारी शिवसेना-भाजपचे सूर जुळले आणि राष्ट्रवादी ….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला अहमदनगर कँटोन्मेंट बोर्डावर सत्तास्थापन करण्याची संधी मिळाली. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपचे सूर जुळल्याने कँटोन्मेंट बोर्डात शिवसेनेला 30 वर्षात पहिल्यांदाच उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. शिवसेनेचे निष्ठावंत प्रकाश फुलारी यांची कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. शिवसेनेने भाजपशी केलेली छुपी युती राष्ट्रवादीला शह देणारी ठरली. याचबरोबर शिवसेना-भाजपचे गेल्या काही … Read more

अश्लील चाळ्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना ! प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ऐतिहासिक, धार्मिकस्थळ म्हणून ओळख असणारे डोंगरगण गाव व परिसर प्रेमीयुगुलांसाठी लव्हर पॉइंट बनले आहे. या ठिकाणी सुरू असणार्‍या अश्लील चाळ्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे या ठिकाणी पोलिसांनी संबंधित प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नगर-वांबोरी रोडवर असणार्‍या डोंगरगण गाव हे धार्मिकदृष्टीने महत्त्वाचे गावा आहे. या ठिकाणी सीतेची … Read more

ते पिडीत पती-पत्नी यापूर्वी माझाकडे आले असते. तर, यापूर्वीच त्यांना न्याय दिला असता

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अत्याचार प्रकरणातील फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवर्‍यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला … Read more

उसने पैसे मागितल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उसने पैसे मागितल्याच्या रागातून तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना झारेकर गल्लीत घडली. महेश अशोक चव्हाण (२९, आदर्श नगर, कल्याण रोड, नगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रविंद्र सुरेश बारस्कर, आशा रवींद्र बारस्कर, सागर सुरेश बारस्कर, निखिल कैलास बारस्कर, अविनाश सुरेश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नगरसेवकाची गुंडागिरी रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले ! आणि…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शिवसेनेच्या एका नगरसेवकासह पाच ते सहा जणांनी बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची व शिवीगाळ करत गैरवर्तन केल्याची फिर्याद नालेगावच्या झारेकर गल्लीतील महिलेने दिली आहे.  फ्लॅट खरेदीसाठी पैसे देवूनही खरेदीची कार्यवाही न केल्याने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग येवून शिवसेनेचे नगरसेवक सुभाष लोंढे यांच्यासह 5 ते 6 जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावल्याची व … Read more

अहमदनगर बाजार भाव : 3-3-2020

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले बाजारभाव: पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो २०० -६००, वांगी ५०० – १०००, फ्लावर १०० – २०००, कोबी १०० – ६००, काकडी ४०० – १३००, गवार २५०० – ८०००, घोसाळे १२०० – २५००, दोडका १५०० – २५००, कारले १००० – २५००, भेंडी १००० – २८००, वाल ५०० – १०००, बटाटे … Read more

वाढत्या चोऱ्यांबाबत मंत्रालयातील गृह विभागात बैठक घेणार

अहमदनगर : शहरातील वाढत्या चोऱ्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयातील गृह विभागात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. महापालिकेत काल सोमवारी (दि.२) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शहर विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरु झाले शिवाभोजन !

अहमदनगर : शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर असलेल्या पाच केंद्रांत ९०० थाळीचे शिवभोजन सुरू होते. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली होती. या पाचही केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काल रविवारपासून शहरात ऐकून दहा केंद्रांत १ हजार … Read more

तृतीयपंथीयांच्या सहभागाचा फंडा मनपाच्या अंगलट

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- तृतीय पंथीय संघटनेला विश्­वासात न घेता किंवा कुठलीही माहिती न देता मालमत्ता करवसुलीसाठी तृतीयपंथीयांचा सहभाग घेणार असल्याचे परस्पर प्रसिद्धीपत्रक काढून तृतीय पंथीयांच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शहरातील तृतीय पंथीयांनी सोमवारी (दि.२) महापालिकेवर मोर्चा नेवून उपायुक्तांना याचा जाब विचारला. तृतीयपंथीय संघटनेचे अध्यक्ष काजलगुरू यांच्या नेतृत्वाखाली शहरातील तृतीयपंथीयांनी महापालिकेत निदर्शने करुन उपायुक्तांना घेराव घातला. … Read more

गुन्हा दाखल केला तर तुमची व्हिडीओ क्लिप आम्ही व्हायरल करू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अत्याचार प्रकरणातील दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पतीपत्नीस विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. जर याबाबत तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करून पीडितेच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचा दावाही संबंधितांनी केला आहे. २०१६ मध्ये एका विवाहित … Read more