अहमदनगर महापालिकेत हिरक महोत्सवी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यभरात दोन महिने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नगर शहरात या नागरी स्वच्छता अभियानासह सिंगल युज प्लॅस्टिक मुक्त शहर अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि.1) महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला.  सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक परिसरातून या अभियानास सुरूवात करण्यात आली. यावेळी उपायुक्त सुनील पवार, … Read more

आजपासून पाच दिवसांचा आठवडा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-शासकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण हलका करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची शनिवार २८ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, या निर्णयाचे सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वागत करून सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ … Read more

सत्यजीत तांबे यांना खासदार करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्रातून रिक्त होणार्‍या राज्यसभेच्या खासदार पदासाठीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नगर मधील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत … Read more

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ‘महिला स्वसंरक्षण’ कार्यक्रम संपन्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नगर: रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात सावित्री मैत्रेयी फोरम व क्रीडा विभागामार्फत विद्यार्थीनी व्यक्तिमत्व विकास, निर्भयता, सक्षमीकरण तसेच स्वसंरक्षणार्थ ‘महिला स्वसंरक्षण कार्यक्रम’ दिनांक 25 फेब्रुवारी 2020 रोजी महाविद्यालय प्रागंणात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व कराटे प्रशिक्षिका कु.राजश्री अल्हाट यांनी विद्यार्थीनीना महिला आयोग, महिलांना असलेल्या संवैधानिक व न्यायिक … Read more

काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीसपदी फिरोज शफी खान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नगर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीसपदी फिरोज शफी खान यांची नियुक्ती विभागाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र वक्फ बार्ड अध्यक्ष माजी आमदार एम.एम.शेख यांनी केली. फिरोज खान गेल्या सहा वर्षांपासून या विभागाचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत, त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन पक्षाने प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करुन त्यांना बढती … Read more

विविध मागण्यासांसाठी बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाची निदर्शने अन्यथा लेखणी बंद आंदोलनाचा इशारा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  अहमदनगर : बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, उपाध्यक्ष निलेश उबाळे, रतन तुपविहिरे, सुनील सोयगावकर, पी.बी. गायकवाड, सचिन पैठणकर, संदीप महारनवर, बाळासाहेब गाडे, किशोर शिरसाठ, राजहंस देसाई, वासुदेव राक्षे, प्रकाशराव साळवे, अनिल जाधव, प्रभाकर दराडे, प्रभाकर उबाळे, … Read more

दिल्लीच्या हिंसाराचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : दोन महिन्यापासून शांततेने सुरु असलेल्या एनआरसी व सीएए विरोधात आंदोलनास दिल्ली मध्ये काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले असून, यामध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. पोलीसांकडून देखील आंदोलकांवर दडपशाही केली जात असल्याचा निषेध जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला. तर या मागील शक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर … Read more

सुनिल सकट यांना रयतरत्न पुरस्कार प्रदान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली) व रयत प्रतीष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिमराव सकट यांना आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते रयतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे झालेल्या पाचव्या लोककला महोत्स वात सकट यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. … Read more

सामाजिक भावनेने रसाळ नेत्रालय रुग्णांना सेवा देत आहे -प्रा. श्रीकांत बेडेकर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम /  अहमदनगर : वैद्यकिय व्यवसाय फक्त पैश्यासाठी मर्यादित न ठेवता, सामाजिक भावनेने रसाळ नेत्रालय रुग्णांना सेवा देत आहे. प्रामाणिकपणे येथे रुग्णसेवा केली जात आहे. बरे झालेले रुग्ण हेच जाहिरातीचे ब्रँड अँबेसिडर ठरतात. डोळे व ह्रद्य बाबतीत रुग्णांनी जागृक राहिले पाहिजे. डोळ्यांच्या दृष्टीअभावी जगाचे सौंदर्य हरपते तर ह्रद्या अभावी जग सोडून जाण्याची … Read more

छिंदमला सुनावणीला हजर राहण्याचे आदेश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध मनपा अधिनियमातील कलम १३ नुसार कारवाई करण्याच्या विषयाबाबत नगर विकास मंत्र्यांकडील सुनावणीसाठी १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तसे पत्र श्रीपाद छिंदम व आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. ही सुनावणी दुपारी एक वाजता नगर विकास मंत्र्यांच्या दालनात होणार आहे. तसेच आयुक्तांनी महापाैरांनाही सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत … Read more

महिलेची १७ लाखांची फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी 

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : शिक्षिका या पदावर नियुक्ती करतो असे सांगुन विश्­वास संपादन करून १७ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाण येथे घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व सदस्य यांनी रूषाली गणेश होळकर … Read more

शौचालयासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांची छेडछाड ; चौघांना अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : रात्रीच्यावेळी शौचालयासाठी बाहेर जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्­या चौघांना भिंगार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बाकी पसार आरोपींचा भिंगार पोलिसांकडून शोध सुरू आहे. शनिवारी (दि.२२) रात्री भिंगारमधील वडारवाडी भागात काही महिला शौचालयासाठी जात असताना रस्त्यावर उभा असलेल्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. … Read more

उड्डाणपुलाचे काम एका महिन्यात मार्गी लावणार

अहमदनगर : सर्वसामान्य जनतेशी आपली बांधिलकी आहे. कुरघोडीच्या बाबतीत आपणास तिळमात्र रस नाही. जनतेने सोपवलेली जबाबदारी नैतिकतेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, आपण महत्त्वाचे मानतो. उड्डाणपुलाचा विषय येत्या एक महिन्यात मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करीत के. के. रेंजसंदर्भात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊ, असा निर्वाळा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला … Read more

अहमदनगरमध्ये गुटख्याबरोबर माव्याची विक्रीदेखील बंद !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरमध्ये सर्रासपणे विक्री होणारी गुटखा विक्री अखेर तात्पुरती बंद झाली आहे. गुटख्याबरोबर माव्याची विक्रीदेखील बंद करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत श्रीगोंदे मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी नगरमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. … Read more

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले दुसर्‍या पक्षात जाण्याची गरज नाही !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी भाजपमध्ये नाराज नाही. पक्षाचे तालुकाध्यक्ष निवडीचे अधिकार संघटनेला होते. भविष्यातही आपण पक्षात प्रामाणिकपणे काम करू. मी सर्वसामान्य लोकांतून निवडून आलो आहे. पक्षाचे काम करणे ही माझी नैतिकता आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली. वडिलांना राज्याचे मंत्रिपद दिले. आजमितीस पक्षात मानसन्मान देखील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील रमेश पवार असे आरोपीचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तीला दवाखान्यात दाखल केले. … Read more

अहमदनगरकरांचे दुर्दैव: ‘तो’ कोट्यवधी रुपयांचा निधी परत जाणार!

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील तारकपूर ते सर्जेपुरा एसटी वर्कशॉप व उपनगरातील टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महल पर्यंत मंजूर असलेली कोट्यवधी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे कार्यारंभ आदेश देऊनही ठप्प आहेत. नगरोत्थान योजनेच्या व्याजाच्या रकमेतून ही कामे मंजूर असून, लवकरात लवकर कामे न झाल्यास हा निधी शासनाकडे परत जाण्याची दाट शक्‍यता आहे. कंपाऊंड वॉल, झोपडपट्टीची … Read more

शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा: आमदार जगताप

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संत गाडगेबाबा यांनी अनेक वर्षांपूर्वी स्वच्छतेचे महत्त्व देशाला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितले आहे. गावोगावी स्वच्छतेतून आरोग्याचे महत्त्व समाजाला कळावे, यासाठी ते अनेक ठिकाणी जाऊन सांगत असत. दगडात नव्हे तर माणसांत देव पाहण्याचे त्यांनी शिकवले. गाडगेबाबांचे विचाराने स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी हागणदारीमुक्ती योजनेतून गावांना दिशा दिली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more