धक्कादायक : माजी नगरसेवकावर ऑईल चोरीचा गुन्हा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी नगरसेवक भाऊसाहेब भिमाजी उडाणशिवे यांच्यासह अमोल जिजाराम साबळे, दीपक दिलीप जाधव, राजू बबन दिवडे, विकास भाऊसाहेब उडाणशिवे व इतर तिघांच्या (सर्व रामवाडी) विरोधात ऑईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रवी मुकुंदलाल अबट (५८, औरंगाबाद रोड, बीटीआर गेटसमोर, नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.  आरोपींनी पत्र्याच्या … Read more

डॉ.विखे अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल टीम मेक्ट्राच्या इलेक्ट्रीक वाहनास भारतात तिसरा क्रमांक

अहमदनगर: वाढती लोकसंख्या, वाढती वाहने याच्या तुलनेत पेट्रोल व डिझेलचे मर्यादित साठे शिल्लक राहत असून, वाढती गरज लक्षात घेता भारत सरकारने इलेक्ट्रीक वाहनांवर आपले लक्ष केंद्रीत केल्याने भविष्यात याचा वापर वाढणार आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले. डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाच्या ‘टीम मेक्ट्रा’ ने  बनविलेल्या इलेक्ट्रीक वाहनास महाराष्ट्रात दुसरा तर  भारतात तिसरा … Read more

आ.संग्राम जगताप महाविकास आघाडी धर्म पाळणार की भाजपला पुन्हा बाहेरून ताकद देणार ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नगर शहरातील पोटनिवडणुकीतही राबवण्यात येत आहे. प्रभाग सहामध्ये एका जागेच्या पोटनिवडणुकीनिमित्ताने शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आमदार जगताप यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा केली. दरम्यान, शिवसेना उपनेते अनिल राठोड व शहरप्रमुख दिलीप सातपुते मात्र गैरहजर होते. नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, विजय पठारे, … Read more

प्रवरा पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अवसायनात निघालेली पूर्वश्रमीची रावसाहेब पटवर्धन व आताची प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकानी राजीनामे दिलेले आहेत , त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळणे अवघड झाले आहे. सदर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी निवेदन द्वारे संचालकांवर (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण) अंतर्गत गुन्हे करावेत, अशी मागणी ठेवीदार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सहकार विभागाचे जिल्हा उपनिंबधक दिग्विजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्थांनी कोरोनाचा घेतला ‘धसका’

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : भारतात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात या आजाराचा फारसा धोका दिसत नसला, तरी आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.  दिवसंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने दक्षता म्हणून जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शिर्डी … Read more

पाणीपट्टीच्या आकारणीत दुप्पट करवाढ ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : नगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नगरकरांना पाणीपुरवठा केला जातो, ही योजना चालवण्यासाठी मनपाला वर्षभरात २४ ते २५ कोटी खर्च येतो. त्यातुलनेत वसुलही अपुराच होत असल्याने योजनेवरील खर्च भागवणे मनपासाठी अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने पाणीपट्टीच्या आकारणीत दुप्पट करवाढ स्थायीकडे सुचवली आहे. मनपाच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात ही वाढ अपेक्षित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एसटी बसने महिलेला चिरडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- रस्ता ओलांडत असताना पादचारी महिलेला एसटी बसने चिरडले. ही घटना स्टेट बँक चौकात दुपारी दोन वाजता घडली.  अंजना धीवर (वय- 60 रा. कापुरवाडी ता. नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजना धीवर या स्टेट बँक चौकात रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एसटी बसची अंजना धीवर यांना जोराची धडक बसली.  या अपघातामुळे … Read more

बस झाले आता मी उपोषणालाच बसतो !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- उड्डाणपुलासाठी संरक्षण खात्याची जागा हस्तांतरित करताना नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीने काही नवीन नियम घातले आहेत. त्या माध्यमातून ते उड्डाणपुलाच्या कामात नाहक आडकाठी घालत आहेत.  जर त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही, तर मी खासदार या नात्याने थेट दिल्ली येथील त्याच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.  … Read more

माजी नगरसेवक संतापले, स्वखर्चाने दिल्लीगेट रस्त्यावरील खड्डे बुजविले

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : शहरामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात दररोज होत असतानाही महापालिका प्रशासन सुस्त आहे. याचा तीव्र निषेध करत माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी स्वखर्चाने मुरुमाच्या गाड्या आणून दिल्लीगेट परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले आहेत. शहरामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहतूकीला मोठी अडचण होते. रोज छोटे … Read more

पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा वारकरी सेवा संघाच्यावतीने सन्मान

अहमदनगर – राज्याचे नूतन ग्रामविकास मंत्री व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा नगर जिल्हा वाकरी सेवा संघाच्यावतीने सन्मान करण्यात आला.  यावेळी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्‍वनाथ राऊत यांचा सन्मान करुन नगरमध्ये उभारण्यात येत असलेल्या वारकरी भवनाविषयक शासनाच्या मदतीचे निवेदन दिले. यावेळी अमोल जाधव, वारकरी सेवा संघाचे सुभाष राऊत उपस्थित होते.

फ्रेंडस एफसीने पटकाविला रिपब्लिक 2020 फुटबॉल कप

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- फ्रेंडस स्पोर्टस अकॅडमीच्या वतीने तर मॅक्सिमस स्पोटर्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या अहमदनगर रिपब्लिक 2020 फुटबॉल कप स्पर्धेत 2 गोलने फ्रेंडस एफसी संघाने शिवाजीयन्स संघावर दणदणीत विजय मिळवला. सावेडी येथील आनंद विद्यालयाच्या मैदानात फुटबॉलचा थरार रंगला होता.  अंतिम सामना फ्रेंडस एफसी विरुध्द शिवाजीयन्स यांच्यात अत्यंत अटातटीचा झाला. शेवटच्या टप्प्यात 2 … Read more

कॅन्टोन्मेंट निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकेल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आगामी कॅन्टोंमेंट निवडणुकीत सर्वच्या सर्व 7 जागा जिंकून काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकवला जाईल, असा विश्‍वास काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंके यांनी व्यक्त केला. भिंगार शहर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री.साळूंके बोलत हाते.  अध्यक्षस्थानी कॅन्टों.चे माजी उपाध्यक्ष तथा पक्षाचे शहर अध्यक्ष अ‍ॅड.आर. आर.पिल्ले होते. ‘गांव तेथे शाखा’ या पक्षाच्या अभियानाच्या नियोजनासाठी … Read more

शहरातील काही भागात कडकडीत बंद, बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर धरणे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अहमदनगर शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहरातील काही भाग वगळता स्वयंफुर्तीने कडकडीत बंद पाळला गेला. तर सकाळी 11 वाजता जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्याच ठिकाणी एनआरसी, सीएए विरोधात धरणे आंदोलन करण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून तीन जिल्ह्यांची निर्मिती

मुंबई : मोठ्या जिल्ह्यांचं विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्तावच मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील एका समितीने ठेवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे निर्माण करण्याची शिफारस समितीने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 2018 मध्ये नवे जिल्हे आणि तालुके निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली … Read more

साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे भिंगारमधून प्रस्थान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भिंगार ते श्री क्षेत्र शिर्डीसाठी निघालेल्या साईबाबा पायी पालखी सोहळ्याच नुकतेच भिंगारमधून प्रस्थान झाले. जय साईरामाच्या गजरात निघालेल्या या दिंडी सोहळ्यातील रथाचे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने पूजन करुन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, दिपक घोडके, रमेश वराडे, सुंदरराव पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, विठ्ठलराव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रध्वज उलटा फडकला,पोलिसांत गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- सर्जेपुरातील पेट्रोलपंपावर प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ध्वजारोहणाप्रसंगी राष्ट्रध्वज उलटा फडकल्याची घटना समोर आली आहे. दुपारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पेट्रोल पंपावरील राम ठाकूर नावाच्या कर्मचार्‍याविरोधात पोलिसांत राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  आसिफ निजाम शेख (रा.लेखा कॉलनी, … Read more

वंचित बहुजन आघाडी च्या प्रयत्नाला यश. भिंगारला ए एम टी बस सेवा चालू.

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भिंगार शहराला गेल्या कित्येक दिवसापासून ए एम टी बस सेवा नव्हती त्यामुळे भिंगार मधील नागरिकांना नगर शहरांमध्ये येताना व जाताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भिंगार शहर अध्यक्ष सागर चाबुकस्वार व … Read more

डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील दिल्लीगेट परिसरातील मेहतर कॉलनी येथे काल रविवारी डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. वीणा सनद दिवाणे (वय ३५, रा. टिळकरोड) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. डंपर हा चालला असतानाच स्कुटीची धडक बसली. डंपरच्या मागच्या टायरला स्कुटीची धडक झाली. त्यात स्कुटीवरच्या वीणा यांना डंपरच्या मागच्या टायरचा जोराचा … Read more