नगरच्या उड्डाणपुलाबाबत आनंदाची बातमी

अहमदनगर- ’नगर शहरातील उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून भूसंपादनावरून काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी लवकरच दूर करण्यात येणार आहेत,’ तसेच बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही लवकरच सुरु होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली. जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांनी … Read more

नगर विकासाचे नवे धोरण राबविणार – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- प्रामाणिक पणे कार्य केले तर जनतेची साथ भेटतेच, नगरचा सर्वागीण विकास हेच स्वप्न बाळगून या पुढे कार्य करणार असून जितोच्या ट्रेड फेअरने नगरच्या उद्योजकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून राज्यात नावलोकिक प्राप्त केले. प्रथमच अतिशय भव्य असा ट्रेडफेअर उत्तम नियोजनामुळे यशस्वी झाला असून जितो संघटनेच्या सहकार्याने नगर विकासाचे नवे धोरण राबविणार असल्याचे मत नवनिर्वाचित … Read more

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांचा सत्कार

श्रीरामपूर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात सहा जागांवर विजय मिळवून पक्षाची जिल्ह्यात ताकद सिद्ध केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार केला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यात डॉ. किरण लहामटे, कोपरगावात आशुतोष काळे, राहुरीत प्राजक्त तनपुरे, नगरमध्ये संग्राम जगताप, पारनेरमध्ये नीलेश लंके, तर नेवाशात राष्ट्रवादी पुरस्कृत शंकरराव गडाख विजयी झाले. राष्ट्रवादी … Read more

निकालानंतर आ.संग्राम जगताप यांनी घेतली गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची. केडगाव हत्याकांडात … Read more

रोहित पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादीला मिळाले नवे नेतृत्व !

अहमदनगर :-  राष्ट्रवादी काँग्रेसने दुपटीहून अधिक जागा पटकावत जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध केले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांनी यंदाच्या नगर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते.  मागील निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या श्रीगोंद्याच्या बबनराव पाचपुतेंना पराभूत करून पवारांनी जसा करिष्मा दाखवला होता, तसाच या वेळी अकोल्यात पिचडांना पराभूत करून दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात … Read more

विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला -प्रा.माणिक विधाते

अहमदनगर :- मागील पाच वर्षाचे विकासात्मक कार्य पाहून जनतेने संग्राम जगताप यांच्याबाजूने कौल दिला आहे. विकास विरुध्द निष्क्रीय माजी आमदारामध्ये ही लढत होती. यामध्ये विकासात्मक नेतृत्वाचा विजय झाला असल्याची भावना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. अहमदनगर शहर विधानसभा निवडणुकितील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसर्‍यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल व … Read more

पराजय झटकून किरण काळे लागले कामाला

कालच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. असे असले तरी काळे यांनी आजच महानगरपालिकेमध्ये दाखल होत सुरू केलेल्या कामामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. निवडणुकीमध्ये काळे यांनी जाहीर केलेला वचननामा आणि जाहीरनामा हा चांगलाच गाजला होता. काळे हे वंचित बहुजन आघाडचे उमेदवार होते.  अल्पावधीत त्यांनी आपला प्रचार केला होता. परंतु … Read more

वंचित बहुजन आघाडीचे नेते किरण काळे यांनी शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर घेतली महापालिका अधिकाऱ्यांची भेट

नगर : शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये जागोजागी पाणी साचले आहे. यामुळे अनेक अपघात होत आहेत. नागरिकांना कशीबशी वाट शोधत जीव मुठीत धरत मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे नगर शहरातील खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या शिष्टमंडळाने मनपा … Read more

भाजपाचा बुरुज उद्ध्वस्त करण्यात पवारांना यश !

कर्जत – जामखेडच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपाचे विद्यमान आमदार तथा मंत्री ना.शिंदे विरुद्ध पवारांचे नातू रोहित पवार यांच्यात लढत होती. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. रथी-महारथींच्या सभा कर्जत-जामखेडला गाजल्या. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. रोहित पवारांनी तब्बल ४३ हजार ३४७ इतक्या मताधिक्क्यांनी ना.शिंदेंना पराभवाची धूळ चारली. ना.शिंदे यांना ९२ … Read more

अहमदनगर जिल्ह्याने भाजप – सेनेच्या ‘ह्या’ सहा आमदारांना दाखविला घराचा रस्ता

अहमदनगर :-  जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदार संघाचे निकाल स्पष्ट झाले आहेत,नगर जिल्ह्यातून आलेले हे निकाल अत्यंत धक्कादायक असून ना.शिंदे, कर्डिले, औटी, पिचड, कोल्हे, मुरकुटे ह्या युतीच्या सहा आमदारांचा पराभव झाला असून नगर शहरातून माजी आमदार अनिल राठोड यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. काम न करणार पार्सल अखेर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जनतेने परत पाठवले आहे. … Read more

भाजप – शिवसेनेचे गर्वहरण, अहमदनगर जिल्ह्यात आघाडीची हवा !

अहमदनगर – जिल्ह्यात भाजपचे हेवीवेट मंत्री समजले जाणारे राम शिंदे यांच्या पराभवाने मोठा धक्का बसला आहे. शरद पवाराचे यांचे नातू रोहित पवार यांची जोरदार ‘ एन्ट्री’ झाली आहे.  राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वगळता उर्वरित सर्वच उमेदवार ‘गॅस’ वर राहिले. विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना चौकार ठोकण्यात सपशेल अपयश आले.  येथे राष्ट्रवादीचे नीलेश लंके हे जायंट … Read more

संग्राम जगताप यांनी लोकसभेत झालेला पराभव पचवला पण…

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती, व त्या निवडणुकीत नगर शहरात ते तब्बल ५५ हजाराने पिछाडीवर पडले होते. त्यांची राजकीय कारकीर्द ओहोटीला लागल्याचे बोलले गेले.  पण ही इष्टापत्ती समजून व विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोक्याची घंटा लक्षात घेऊन त्यांनी तेव्हापासूनच पुन्हा शहरात ताकद पणाला लावली. सावेडी, बालिकाश्रम रोड, नागापूर, बोल्हेगाव, … Read more

आता नगरकरांना आ.संग्राम जगताप यांचे विकास व्हीजन प्रत्यक्षात येण्याची प्रतीक्षा !

मागील २०१४च्या निवडणुकीत चौरंगी लढतीत मतविभागणीचा फायदा मिळून जगतापांना विजय मिळाला होता. पण तो विजय ‘अपघाती’ नव्हता, हे सिद्ध करण्याचे आव्हान त्यांनी या वेळी पेलताना नव्याने विकासाचे व्हीजन पुढे आणले.  शिवसेनेवर भावनिक राजकारणाचा आरोप करताना त्यांच्यामुळे शहराचा विकास ठप्प झाल्याचा त्यांचा दावा, व त्यासमवेत त्यांनी मांडलेले विकास व्हीजन मतदारांना भावले. या विकास व्हीजनच्या माध्यमातून नगर … Read more

आमदार संग्राम जगतापांनी घडवला इतिहास !

चुरशीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचा सलग दुसर्‍यांदा पराभव केला. विजय मिळवायचाच, या इर्षेने मैदानात उतरलेले आ. जगताप यांनी शिवसेना-भाजपची युती असतानाही विजय मिळविला.  भाजपची साथ नसणे आणि शिवसेनेतील नाराजी राठोड यांना भोवली. आ. जगताप यांना 81 हजार 217 आणि राठोड यांना 70 हजार 78 मते मिळाली. … Read more

जिल्ह्यातून शिवसेनेचं अस्तित्व संपुष्टात !

अहमदनगर –  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा दारून पराभव झाला आहे. नगरमधून अनिल राठोड, पारनेर – नगर मतदारसंघातून विजय औटी, श्रीरामपूर मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे व संगमनेर मतदारसंघातून साहेबराव नवले पराभूत झाले आहेत. या जिल्ह्यात भाजपने ८ तर शिवसेनेने ४ जागा लढविल्या होत्या. सेनेच्या चारही जागा पराभूत झाल्या आहेत. विधानसभेचे उपसभापती … Read more

हे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील नवे आमदार !

राष्ट्रवादी काँग्रेस- 7, काँग्रेस- 2, भाजप- 3 कर्जत जामखेड – रोहित पवार (राष्ट्रवादी) पारनेर- निलेश लंके (राष्ट्रवादी) श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप) नगर शहर – संग्राम जगताप (राष्ट्रवादी) राहुरी- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी) शेवगाव- मोनिका राजळे (भाजप) नेवासा- शंकरराव गडाख (राष्ट्रवादी पुरस्कृत) शिर्डी- राधाकृष्ण विखे (भाजप) संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस) कोपरगाव – अशुतोष काळे (राष्ट्रवादी) अकोले- किरण … Read more

Live Updates : अहमदनगर शहर मतदारसंघात संग्राम जगताप ११ हजार ११५ मतांनी विजयी

अहमदनगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार ११५ मतांनी विजयी झाले असून सलग दुसर्यांदा त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला. अनिल राठोड यांची ही शेवटची निवडणूक होती,२५ वर्ष नगर शहरावर वर्चस्व असणार्या राठोड यांच्या सलग दुसर्या पराभवाने त्यांच्या राजकारणास हा मोठा धक्का मानला जात आहे. 2.54 :- संग्राम जगताप ११ हजार … Read more

Live Updates : लंके, पवार, तनपुरे, गडाख, कानडे, थोरात, विखे विजयी होणार !

11.39 :- जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डीचा अपवाद वगळता अन्य दहाही विधानसभा मतदारसंघात धक्कादायक असे निकाल लागण्याच्या मार्गावर आहेत. संगमनेरमधून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व शिर्डीतून भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी झाल्यात जमा आहेत. दुसरीकडे पारनेरमधून राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी सेनेचे विजय औटी यांच्या विरोधात तगडी आघाडी घेतली आहे. लंके यांची ही आघाडी आता त्यांना निर्णायक विजय … Read more