Ahmednagar Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर यांचा खून करणारा नगरसेवक स्वप्नील शिंदे अटकेत

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News :- अहमदनगर शहरात लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मोठय़ा वादावादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आज पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातले जात असताना तो … Read more

अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

Ahmednagar Politics : नगर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये दुफळी

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या दुफळीच्या पार्शभूमीवर नगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने तालुका महाआघाडीची बैठक घेत आम्ही शरद पवार यांच्या सोबत असल्याचा नारा दिला. त्यास २४ तास उलटायच्या आतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नगर तालुका कार्याध्यक्ष गौरव नरवडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नगर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली असल्याचे … Read more

Ahmednagar City News : चक्क अहमदनगर महानगरपालिकेची फसवणूक ! तब्बल १४ लाख…

Ahmednagar City News

Ahmednagar City News : मनपा हद्दीत रस्ता बाजू शुल्क वसुलीचा ठेका घेतलेल्या श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा संस्थेच्या (नांदेड) संचालकाने वसूल केलेली १४ लाख ८६ हजाराची रक्कम मनपाकडे भरणा न करता या रकमेचा अपहार केला आहे. याबाबत सोमवारी (दि. १०) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. मनपाच्या मार्केट विभागाचे प्रमुख विजयकुमार नेवतराम बालानी यांनी … Read more

अहमदनगर करांसाठी धोका ! सीना नदीचे अजूनही…

Ahmednagar news

Ahmednagar news : नगर शहरात पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या सिना नदी व नाले सफाई कामात दिरंगाई होत असल्याने तातडीने ही कामे व्हावीत, या मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात १२ कि.मी. सीना नदीचे पात्र मध्य शहराच्या नागरी वसाहतीमधुन जात आहे. वास्तविक पाहता … Read more

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

MLA Nilesh Lanke | आमदार निलेश लंके अस्वस्थ,म्हणाले राजकारणात मला काही मिळाले नाही तरी चालेल मात्र, पवार परिवार

Ahmednagar Politics

MLA Nilesh Lanke :- राजकारणात मला काही मिळाले नाही तरी चालेल मात्र, पवार परिवार एकसंघ राहिला पाहिजे. धर्मावर, चुकीच्या पध्दतीने काम करणारा पवार परिवार नसून विकासला प्राधान्य देणारा हा परिवार देशाच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी एक राहिला पाहिजे. मला पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई यांनी निःस्वार्थ प्रेम दिले आहे, त्यांच्यात मी आवड, निवड कशी करू, असा सवाल करीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या सभेत शिवाजी कर्डिले यांनी घेतला महत्वाचा निर्णय ! सभासदांना मिळणार…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक विकास सेवा सोसायटीच्या थकबाकीदार शेतकरी सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शासनाकडून सन २०१६ पासून वेळोवळी कर्जमाफी देण्यात आली. मात्र कर्जमाफीच्या योजनेत काही कर्ज प्रकारांचा समावेश नव्हता. … Read more

Ahmednagar News : जिल्हा बँकेच्या संचालकपदी या महिलेची बिनविरोध निवड !

Ahmednagar News

Ahmednagar News : सॉलिसिटर गुलाबराव शेळके व जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन अॅड. उदय शेळके यांनी त्यांच्या कार्य काळात जी. एस. महानगर बँक व जिल्हा सहकारी बँकेत पदाधिकारी म्हणून काम करताना सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्याच पद्धतीने आपण जी. एस. महानगर बॅक आणि जिल्हा सहकारी बँकेत सर्वसामान्य जनतेला पाठबळ देऊन सॉलिसिटर … Read more

Ahmednagar City News : नगर शहर मर्डर सिटी झाली ! ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Ahmednagar City News : पोलीस प्रशासनाचा धाक संपल्यामुळे अहमदनगर शहर हे मर्डर सिटी झाले आहे. एकामागे एक राजरोसपणे शहरात खून, हत्याकांड होत आहेत. नुकताच केडगाव येथे एका व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली असून त्या आधीची ओंकार उर्फ गामा भागानगरे याच्या हत्याकांडाची घटना देखील अद्याप ताजी आहे. ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात, पती-पत्नीसह चिमुकली ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत कोकमठाण शिवारात क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीसह एका चिमुकलीचा मृत्यू झाला. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. ३०) पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा गेल्या महिन्यात सुरू झाला. या रस्त्यावर अपघातांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी ही बातमी वाचायलाच पाहिजे ! जिल्ह्यातील शासकीय…

Ahmednagar Education News : अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील एकूण १८ शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यानी १२ जूलै २०२३ पर्यंत तर व्यासायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी ३१ जूलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत. … Read more

Ahmednagar Stories : भूक भागविण्यासाठी कचर्‍यात असलेले अन्नपदार्थ खायला गेले आजोबा ! मदतीच्या आकांताने ओरडत होते पण…

Ahmednagar Stories : शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका कोपर्‍यात कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ पडलेल्या आजोबांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाच्या स्वयंसेवकांनी नवजीवन दिले. मदतीच्या आकांताने ओरडणार्‍या त्या आजोबांना मदतीचा हात देऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ही हृद्यद्रावक घटना बघून अनेकांचे डोळे पाणावले. पोटात कणभरही अन्न नसलेल्या व अनेक दिवसांपासून एकाच जागेवर पडून असल्याने एका … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 104 उद्योगांना मंजुरी

जिल्ह्यात अधिकाधिक उद्योगांची उभारणी होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा अव्वल असल्याची माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरासह तालुक्यातून हे लोक तडीपार ! वाचा नावे…

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक व छळ करणारे व त्याबाबतचे गुन्हे दाखल असलेल्या १० आरोपींवर एमआयडीसी पोलिसांच्यावतीने नगर शहरासह नगर तालुका हददीतुन हददपारीची कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ही माहिती दिली. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद व हिंदू बांधवांची आषाढी एकादशी असे दोन्ही उत्सव गुरुवारी (दि. २९) एकाच दिवशी … Read more

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण !

आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या “वारी आपल्या दारी” या संपर्क सुचिमुळे तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संवेदनशीलतेमुळे अहमदनगरच्या वारकऱ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. शनिवार दि. 24 जून रोजी … Read more

दूध भेसळीचे काळे वास्तव समोर ! दुधात होणारी भेसळ अतिशय गंभीर

राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दुधात भेसळ करणाऱ्यांसह भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्यांवर ‘मोक्का’ नुसार कारवाई करण्याचा इशारा नुकताच दिला आहे. यामुळे दूध भेसळीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील एका दूध भेसळखोरावर कारवाईचा बडगा उगारताच एका दिवसात एका तालुक्यातील दुधाचे प्रमाण ६० हजार लिटरने कमी आल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले दुधात होणारी … Read more

निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर, दि.22 जुन (जिमाका वृत्तसेवा) – खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बी-बियाणे, खते मिळतील याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, … Read more