अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी ही बातमी वाचायलाच पाहिजे ! जिल्ह्यातील शासकीय…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Education News : अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील एकूण १८ शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यानी १२ जूलै २०२३ पर्यंत तर व्यासायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी ३१ जूलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

अहमदनगर शहर व जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी , इयत्ता १० वी व ११ वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्षांच्या प्रवेशीत विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता ८ वी पासून ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

शालेय विद्यार्थीसाठी १२ जुलै २०२३ , इयत्ता १० व ११ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीसाठी ३१ जुलै २०२३ , बी.ए./बी.कॉम/ बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका / पदवी आणि एम.ए / एम.कॉम. / एम.एस.सी असे पद्वी नंतरचे पदव्युत्तर, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसयीक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी ३१ जूलै २०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत. तर व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन,निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो.

विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथून अर्ज प्राप्त करुन नमूद दिनांकापर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहिती साठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी रोड, अहमदनगर येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री.देवढे यांनी केले आहे.