7 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या टॉप 3 एसयुव्ही कार ! मिळणार दमदार फिचर्स अन 20 Kmpl चे मायलेज

Cheapest SUV In India

Cheapest SUV In India : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात एसयुव्ही कारला डिमांड आली आहे. सेडान कारच्या तुलनेत एसयूव्ही कारची मागणी वाढली आहे. यामुळे आता ऑटो कंपन्या देखील ग्राहकांच्या मागणीनुसार नवनवीन एसयुव्ही कार लॉन्च करत आहेत. विशेष म्हणजे भारतीय ग्राहकांसाठी दिग्गज ऑटो कंपन्यानी स्वस्त SUV कार देखील लाँच केल्या आहेत.

दरम्यान आज आपण भारतीय कार बाजारातील 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 3 एसयूव्ही कारची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

Renault Kiger : Renault ही एक दिग्गज ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या SUV गाड्यांना भारतीय मार्केटमध्ये मागणी आहे. Renault Kiger या SUV ला देखील इंडियन मार्केटमध्ये मोठी पसंती मिळत आहे. या गाडीत 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.0 लीटर एनर्जी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

यात Xtronic CVT आणि 5-स्पीड EG-R AMT असे ट्रान्समिशन पर्याय पाहायला मिळतात. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतातील सर्वात स्वस्त SUV पैकी एक आहे. या गाडीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या गाडीची मेन्टेनन्स कॉस्ट देखील खिशाला परवडणारी आहे.

ही गाडी 20.62 Kmpl चे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीत 4 एअरबॅग्ज तसेच प्री-टेन्शनर आणि ड्रायव्हरसाठी लोड-लिमिटरसह सीटबेल्ट देण्यात आले आहेत. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत पाच लाख 99 हजार 990 रुपये एवढी आहे.

Tata Punch : टाटा ही एक प्रमुख आणि एक मोठी दिग्गज इंडियन ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये तर कंपनीचा मोठा बोलबाला आहे.

या कंपनीची टाटा पंच ही SUV भारतीय ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय बनली आहे. ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही अवघ्या 6.63 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध होते. तथापि ही या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत आहे.

ही बेस वॅरीयंटची किंमत आहे. टॉप मॉडेलची किंमत यापेक्षा जास्त आहे. कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स हे या गाडीचे वैशिष्ट्य आहे. या गाडीत खूप मोठी स्टोरेज स्पेसही आहे.

Tata Panch मध्ये 7-इंच टचस्क्रीन, एक पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्वयंचलित हवामान नियंत्रण, पुश-बटण स्टार्ट, ऑटो हेडलॅम्प आणि असे बरेच फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतात. ही गाडी 18.97 Kmpl चे मायलेज देण्यास सक्षम आहे.

Hyundai Exter : ह्युंदाई कंपनीची ही सर्वात स्वस्त SUV आहे. या गाडीची किंमत 6.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही गाडी 19.4 Kmpl चे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या गाडीचे डिझाईन खूपच आकर्षक असून यामध्ये अनेक अपडेटेड फीचर्स पाहायला मिळतात.