Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीपात्रात तीन जवानांसह पाच जण बुडून मृत्यू पडल्याची घटना घडली अन संपून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. अकोले तालुक्यातील या केटिवेअरवर पोहण्यासाठी काही युअवक गेले होते. त्यात दोन युवक बुडून गतप्राण झाले.
ही घटना काल बुधवार दि. 22 मे रोजी दुपारी घडली व त्यांना शोधण्यासाठी SDRF च्या जवानांचे एक पथक सुगाव परिसरात आज दि. 23 मे रोजी तेथे आले होते. त्यांनी सकाळी साडेसहाच्या दरम्यान एका स्थानिक व्यक्तीला सोबत घेत पाण्यातील घटनास्थळ दाखविण्यासाठी बोट घेऊन पाण्यात उतरले.
तेथे केटिवेअर असल्याने घटनास्थळी फार मोठा भोवरा निर्माण झाला आणि ही बोट अचानक पलटी झाली. यात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, राहुल गोपीचंद पावरा(कॉन्स्टेबल), वैभव सुनील वाघ (चालक) या तिघांचा मृत्यू झालाय. सोबत जो स्थानिक व्यक्ती गणेश मधुकर वाकचौरे (वय-38,रा. मनोहरपुर,ता. अकोले) नेला होता तो मात्र बेपत्ताच आहे. या घटनेत एकदंरीत पाच जण मृत्यू मुखी पडलेत.
सहा जणांची टीम या तरुणाचा शोध घेत होती. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होता. तेथे छोटीसा केटिवेअर बांधण्यात आलेला आहे. त्याची मोठी भिंत असून त्याच्या पुर्व पश्चिम दोन्ही बाजुंनी खोल पाणी आहे. त्यावरून पाणी पडल्यानंतर खालच्या बाजुने तेथे भोवरा निर्माण होतो. त्या भोवऱ्यात ही बोट अचानक उलटली. बोटीतील जवान नदीपात्रात पडले.
त्यांना नदीच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे, या टीम मधील एका अधिकाऱ्यासह दोन कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे दोघेजण दवाखान्यात उपचार घेत आहे. तर गणेश मधुकर वाकचौरे (रा. मनोहरपूर, ता.अकोले) या तरुणाचा शोध अद्याप लागलेला नाही. पण आता या निमित्ताने काही प्रश्न निर्माण झालेत ते देखील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेतच.
– ही घटना घडली खरं तर ही अत्यंत दुःखद बाब आहे. परंतु हे निष्णात जवान पाण्यात बुडून मृत्युमुखी पडतात ही अत्यंत खेदजन्य गोष्ट आहे. तेथे बचावासाठी आलेले जवान खरोखर पूर्णतः प्रशिक्षित होते का? यांना तेथे ज्यांनी पाठविले त्यांना या जवानांबाबत किंवा त्यांच्या प्रशिक्षणाबाबत किंवा त्यांच्या क्षमतेबाबत पूर्णतः कल्पना होती का? जे जवान बुडाले त्यांच्या अंगात सुरक्षा जॉकेट असूनही ते त्यांचा जीव वाचू शकले नाहीत, हे कसे होऊ शकते? या जवानांकडे पोहण्याची कसब नव्हती, यांचे प्रशिक्षण नव्हते का? असे अनेक प्रश्न सध्या नागरिकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत.
– दुसरा प्रश्न नागरिकांपुढे असा उभा आहे की, भांडरदरा ते कळस या दरम्यान अनेक केटिवेअर असून यामुळे आत्तापर्यंत 15 ते 20 लोक मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे हे केटिवेअर वरदान की शाप याचे आत्मचिंतन झाले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की, सहा जण बुडूनही प्रवरेचा प्रवाह का बंद केला नाही?
जर कालच हा पाण्याचा प्रवाह बंद केला असता तर आज जे जवान बुडाले ते कदाचित मृत्यूच्या खाईत सापडले नसते. ज्यांनी पाणी बंद केले नाही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करावा नाही अशी विचारणाही केली जात आहे.