Ahmednagar News : अहमदनगरधील ‘या’ गावचे ग्रामसेवक निलंबित, का झाली कारवाई? पहा…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एका ग्रामसेवकाच्या निलंबनाबत एक वृत्त आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका ग्रामसेवकास निलंबित केले आहे. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे.

नितीन शेषराव गिरी असे या निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते नगर तालुक्यातील सांडवे येथील ग्रामसेवक आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सांडवे येथील ग्रामसेवक नितीन शेषराव गिरी यांना १६ मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबित केले आहे. १६ मे रोजी निलंबनाचा आदेश निघालेला असल्याची माहिती समजली आहे.

गिरी यांची नेमणूक सांडवा येथे असून त्याठिकाणी कार्यरत असताना त्यांनी कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत त्यांना पुरेशी संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, जि. प. कर्मचाऱ्याने सदैव निरपराध, सचोटीने वागणे व कर्तव्यपरायण असणे आवश्यक असते. गिरी यांनी गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ चा नियम ३ चा भंग केला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबित केले असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

या आदेशात पुढे असे म्हटले आहे की, निलंबन काळात गिरी यांचे मुख्यालय कोपरगाव पंचायत समिती राहणार असून त्यांना कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe