अहमदनगर ब्रेकिंग ! कोयत्याने वार करून एकाचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात राहणारे गोरख भोसले हे शेतकरी दळण दळण्याकरिता रस्त्याने जात असताना त्यांच्या मोटरसायकलला मेंढरू आडवे टाकून रस्ता अडवून मागील भांडणाच्या कारणावरुन मारहाण सुरू केली. तेव्हा चुलता विकास हरिभाऊ भोसले, रा. खरातवाडी, ता.श्रीगोंदा हे तेथे आले असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जिवे ठार मारुन … Read more

मला बिनविरोध येऊ द्यायचे नाही, म्हणून ते विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- खेळत्या भांडवलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आधार दिला. १४० कोटींचे कर्ज वाटले. त्यामुळे माझ्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ विरोधकांवर आली, असा टोला माजी आमदार तथा विद्यमान संचालक शिवाजी कर्डिले यांनी मारला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी कर्डिले यांनी १०९ पैकी १०० पेक्षा जास्त मतदार व समर्थकांसमवेत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल … Read more

बोगस कर्जप्रकरणातील आरोपी शेळकेंच्या पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. निलेश शेळके याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. तसेच शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या डॉ. निलेश शेळके याला पोलिसांनी फसवणूकीच्या दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी शहर सहकारी … Read more

‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याची अमरावती येथे बदली

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नगरमध्ये विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांना शासनाने अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. राठोड यांची नांदेड येथून बदली झाल्यानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी नगर येथे पदभार स्वीकारला होता. त्यांनी स्वतंत्र पथक स्थापन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध धंद्यावंर … Read more

भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले… आणि क्षणात त्याचा प्राणही गेला

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-भरधाव पद्धतीने वाहने चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असतात. असाच एक अपघात जिल्ह्यात घडला आहे. मात्र या अपघातात एका निरपराधांचा बळी गेला आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात शुक्रवारी (दि.२२) पहाटे झालेल्या अपघातात निलेश मच्छिंद्र मेहेत्रे (वय ३०, रा.जेऊर, ता.नगर) हा जागीच ठार … Read more

नेचर कॅप ऑरगॅनिक फूडस् ‘ ला राष्ट्रीय कृषी पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-भिंगार येथील महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘ नेचर कॅप ऑरगॅनिक फूडस् ‘ या मशरूम उत्पादनाला राष्ट्रीय कृषी युवा 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाशिक येथे झालेल्या विशेष समारंभात नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या हस्ते नेचर कॅप ऑरगॅनिक फूडस् च्या अध्यक्षा अपूर्वा तोरडमल … Read more

तपोवन रोड एक महिन्यांत सुरु न झाल्यास अधिकार्‍यांना काळे फासणार

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सन 2018 ग्रामसडक योजना अंतर्गत तपोवन रोड मंजुर झाला. त्यानंतर काही रोड झाला तर काही रोड झालेला नाही. अनेक चर्चा, वेगवेगळ्या पक्षाने केलेले आंदोलन, माहिती अधिकार वापरुन माहिती घेऊन या संदर्भात वर्तमान पत्रात बातम्या आल्या. सतत हा रस्ता चर्चेत राहिला मात्र महाल ते औरंगाबाद रोड पर्यंतचा रोड आहे. तसाच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हुंडा मागणाऱ्या नवरदेवासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नगर शहरात न्यू बेथेल कॉलनी कोठी परिसरात राहणारी २६ वर्षाची नोकरदार तरुणी तिच्याबरोबर मयूर सुनील भिंगारदिवे याचे लग्न जमलेले असताना त्याची आई व नातेवाईक यांनी लग्नासाठी प्रिती हिच्या नातेवाईकांकडे २ लाख रुपये दिले तरच लग्न करु, असे म्हणून हुंडा दिला नाही, अशीसमाजात बदनामी करुन हुंहा नाही दिला तर नवरदेव … Read more

बसमध्ये चढताना महिलेचे दागिने चोरट्याने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नगर शहरात पुणे बसस्थानक औट गेटजवळ एसटी बसमध्ये चढत असताना गदींचा फायदा उठवत ‘होसाबाई गायकवाड या वृद्ध महिलेच्या खांद्याला लटकविलेल्या बॅगची चैन उघडून चोरट्याने सव्वा लाख रुपये किंमतीची सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यात सोन्याची माळ, सोन्याची चैन असे दागिने होते. त्याचे वजन ५ तोळे आहे. भरदिवसा साडेअकरा वाजता ही … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शने,गोस्वामीला अटक करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असणारी माहिती अर्नब गोस्वामी याला मिळाली कशी याची तात्काळ चौकशी होण्याच्या दृष्टीने अटक करण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या … Read more

जिल्हा बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी अर्ज दाखल केला !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी शुक्रवारी (दि.22) दुपारी अर्ज भरला. सेवा सोसायटी मतदार संघातून माजी आमदार शिवाजी कर्डीले तिसऱ्यांदा रानांगणात उतरले आहेत. शुक्रवारी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला अर्ज दाखल केला. याअगोदर दोन्ही वेळेस महाविकास आघाडीला आपला … Read more

अहमदनगर शहरातील ह्या सिग्नलला चपलांचा हार !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-वाहतूक सुरक्षा सप्ताहातही सिग्नल बंद असल्याच्या निषेधार्थ येथील जागरूक नागरिक मंचातर्फे आंदोलन करण्यात आले. सक्कर चौकातील बंद सिग्नलला चपलांचा हार घालण्यात आला. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी स्वत: शिडीवर चढून सिग्नलला चपलांचा हार घातला. त्यावर निषेधाचा फलक लावला. मंचाचे प्रमुख सदस्य यावेळी उपस्थित होते. वाहतूक सुरक्षा अभियान सुरू असताना … Read more

संभाजी विडीचे साबळे विडीत नामांतर विडीच्या नवीन नावाच्या पॅकिंगचे अनावरण

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- विडी उत्पादन करीत असलेल्या साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी विडीचे नामांतर साबळे विडी केले असून, या विडीच्या नवीन नावाच्या पॅकिंगचे अनावरण नुकतेच केडगाव रोड, रेल्वे स्टेशन येथील कंपनीच्या आवारात करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक बाबू शांतय्या स्वामी, लाल बावटा विडी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष … Read more

अर्बन’ च्या २२ कोटींच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-अर्बन बॅंकेच्या चिंचवड येथील शाखेत २२ कोटी रुपयांचा अपहार झाला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बॅंक बचाव कृती समितीच्यावतीने करण्यात आली. बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात अर्बन बॅंक बचाव कृती समितीच्यावतीने गुरुवारी (दि.२१) आंदोलन करण्यात आले. श्री.मिश्रा यांनी या प्रकरणी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे … Read more

जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा रणांगणात उतरत आहेत. २२ जानेवारी रोजी शक्ती प्रदर्शनात कर्डिले सेवा सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल करत आहेत. तालुक्यातील १०९ मतदारांपैकी ८० पेक्षा जास्त मतदारांसह अर्ज दाखल करण्याची त्यांची तयारी सुरू असताना महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार शोध सुरू आहे. जिल्हा सहकारी बँकेसाठी … Read more

चिंताजनक : अहमदनगर शहरातील ह्या ठिकाणी बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये दहशत

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहरानजिक असलेल्या केडगाव परिसरातील कांबळे मळ्यात बिबट्याचा वावर असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. या प्रकरणी नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन महानगरपालिका समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी केले आहे. केडगाव येथील कांबळे मळा पोलिस चौकाजवळील नर्सरीजवळ बिबट्याचा वावर असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. याबाबत त्यांनी सभापती मनोज कोतकर यांना माहिती … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; जिल्ह्यात या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- शासकीय तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने अत्यल्प भावात शेतकऱ्यांनी तूर विक्री करावी लागत असल्याचे अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, जिल्ह्यात १४ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर तुरीची … Read more

जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस व माजीमंत्री पिचड यांची भेट !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजीमंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेऊन तब्येतीबाबत विचारपूस केली. यावेळी आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. माजी मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले होते, आता त्यांची तब्येत ठणठणीत असून ते वरळी … Read more