१०० टक्के अनुदान मिळाले नाही तर रंधा फॉल येथे जलसमाधी आंदोलन करू – शिवाजी खुळे

randha faal

महाराष्ट्र राज्यामध्ये २५ वर्षापासूनच्या विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान मिळाले नाही. त्यामुळे राज्य सरकारने सर्व शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, अन्यथा भंडारदरा परिसरात रंधा फॉल येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवाजी खुळे व राजेंद्र जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये ६ हजार प्राथमिक, माध्यमिक, उच्च … Read more

घाटघर, भंडारदऱ्याच्या पाणलोटात पावसाची विश्रांती, भात लागवडींना ब्रेक !

bhandardara

गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून आदिवासी बांधवांच्या भात लागवडी थांबल्या असल्याचे चित्र समोर आले आहे. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ३ टीएमसीवर पोहोचला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच भंडारदऱ्याला मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. १ जुलैपासून ते ७ जुलै पर्यंत भंडारदऱ्याच्या पाणलोटासह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे … Read more

महसूल मंत्री विखे यांच्या आश्वासनानंतर गणोरे येथील शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित !

vikhe

अकोल्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सात दिवसांपासून सुरू केलेले उपोषण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी गणोरे येथे येऊन उपोषणकर्ते संदीप दराडे आणि शुभम आंबरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती त्यांनी उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांना दिली. याप्रसंगी माजी आमदार … Read more

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घाटघर रतनवाडी जनजीवन विस्कळीत, घाटघरला नऊ इंच पावसाची नोंद !

ghatghar

अहमदनगरची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरला विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे घाटघरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घाटघर येथे नऊ इंच पावसाची नोंद झाली असून रतनवाडीला आठ इंच पाऊस पडला आहे. आजवरची पावसाळ्यात ही सर्वात मोठी आकडेवारी समोर आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा पाणलोट क्षेत्र म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजली जाते. मागील … Read more

दूध उत्पादकांच्या आंदोलनासाठी शेतकरी एकवटले, कोतूळ येथील धरणे आंदोलनाला पाठिंबा वाढला !

farmer protest

दुधाला ४० रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. अकोले तालुक्याचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध … Read more

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या की, घातपात. काय आहे मृतदेहाचे अकोले कनेक्शन ?

ghatpaat

सप्तशृंगी गडावरील पाट झाडीत गुरुवारी (दि.४) रोजी एका शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. शेतमालाच्या व्यापाऱ्याने या शेतकऱ्याचे अपहरण करून त्याचा खून केला असल्याचा आरोप शेतक-याच्या कुटुंबीयांनी केला आहे. जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने आपल्या कुटुंबियांना दबक्या आवाजात ऑडिओ व व्हिडीओ पाठवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली … Read more

अकोले तालुक्यात वरुण राजा बरसला, भंडारदऱ्यात धुव्वाँधार तर घाटघरला मुसळधार पावसाची हजेरी !

musaldhar paus

गेल्या २४ तासामध्ये भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला असून घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. भंडारदरा धरणाच्या परीसरातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्टयात पावसाचे तांडव सुरूच आहे. घाटघरला पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. सतत कोसळत असणारा पाऊस व प्रचंड धुके यामुळे घाटघर गाव धुक्यामध्ये हरवले … Read more

चार दिवसापासून सुरु असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अखेर ओसरला !

bhandardara

गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर अखेर ओसरला असून भंडारदरा धरणामध्ये पाण्याची नवीन आवक होत आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा १७.७३ टक्के पर्यंत पोहोचला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरली असून बऱ्याच ठिकाणी भात … Read more

Kajwa Festival 2024 : काजवा महोत्सवाला येणार असाल तर ही बातमी नक्की वाचा !

Kajwa Festival 2024

Kajwa Festival 2024 : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील काजवा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. काजव्यांचा पर्यटकांना मनमुराद आनंद घेता यावा, यासाठी वन्यजीव विभागाने काही बंधने घातली असून रात्री ९ नंतर कोणत्याही परिस्थितीत अभयारण्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दरवर्षी २५ मे १५ जुनच्या दरम्यान काजव्यांची चमचम बघावयास … Read more

आदिवासी भागामध्ये बोगस डॉक्टरांचे बस्तान ! अघोरी उपचार करून जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोलेच्या आदिवासी भागामध्ये बंगाली डॉक्टरांचे आदिवासी बांधवांवर अघोरी उपचार सुरु आहेत. आदिवासी बांधवांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर वेळीच पायबंध घातला गेला नाही तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आदिवासी भागामध्ये निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला आदिवासी बांधवांचे वस्तीस्थान असून याच आदिवासी बांधवांच्या वस्तीस्थानामध्ये बंगाली डॉक्टरांनी आपले बस्तान बसविले आहे. मुळातच कोणत्याही … Read more

काजवा महोत्सवाला यंदाही पर्यटकांची गर्दी होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाऊसफुल होणार आहे. या महोत्सवासाठी अगोदरच बुकींग फिक्स झाल्या आहे असून काजव्यांसाठी भंडारदरा सजला आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभायाण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरु होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या … Read more

अकोले तालुक्यात दोन गावांसह २० वाड्यावर टँकरने पाणी पुरवठा

Ahmednagar News

Ahmednagar News : धरणाच्या अकोले तालुक्यात सध्या पाणीटंचाई जाणवायला लागली असून तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सध्या टँकरची गरज भासणाऱ्या गावे व वाड्यावस्त्यांची संख्याही वाढली आहे. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या तोकड्या पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तर मन्याळे, मुधाळणे या २ गावासह २० वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू असून … Read more

बस बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय !

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले या आदिवासी तालुक्यातील सर्वाधिक दुर्गम भागातील, रतनवाडी, शेणीत मुक्कामी एसटी बस बंद केली. वाघापूर, देवगाव- राजूर, बलठन मुक्कामी देवगाव मार्गे जात नाही. अनेक गावच्या बसच्या फेऱ्या बंद केल्या आहेत, त्या चालू करा, असे निवेदन ग्राहक पंचायतीच्या वतीने एस.टी. महामंडळाला देण्यात आले आहे. ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष दत्ता शेनकर, मच्छिद्र मंडलिक, रमेश राक्षे … Read more

शिर्डीतील पर्यटन विकासाला चालना देणार – उत्कर्षा रूपवते

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासाला जशी चालना देणार, तसे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास यावर आपला भर असेल. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वास शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला. अकोले तालुक्यातील आंबड येथे रुपवेते बोलत होत्या. अकोले तालुक्यातील गावात जाऊन मतदारांच्या भेटी … Read more

Ahmednagar News : पत्रकार असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीशी विवाह ! प्रचंड छळ, बेशुद्ध होईपर्यंत मारहाण अन बरेच काही..अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगा पत्रकार असल्याचे खोटी बतावणी केली. त्यानंतर आम्ही देखील अल्पवयीन विवाह केला आहे काही होत नाही असे सांगत अल्पवयीन मुलीशी विवाह करून दिला. त्यानंतर काही दिवसांतच त्याचे पाशवी रूप बाहेर आले. तो व घरचे तिला शारीरिक, मानसिक त्रास देऊ लागले. गर्भधारणा झाल्यानंतर … Read more

सांदन दरी पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोलेच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अगदी शेवटच्या टोकाला साम्रद गावामध्ये एक आश्चर्य दडलेलं असून हे आश्चर्य नक्की काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हजारो पर्यटक साम्रदला गर्दी करत असतात. हे आश्चर्य दुसरे काही नसून जगातील सर्वात खोल दरी समजली जाणारी ‘सांदन दरी’ आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या … Read more

Ahmednagar : आदिवासी भागातील एसटी फेऱ्या अचानक बंद केल्याने आदिवासी बांधव लालपरीच्या प्रवासाला मुकली

Ahmednagar

Ahmednagar : अकोले आगाराने आदिवासी भागातील अनेक फेऱ्या अचानक बंद केल्याने आदिवासी बांधव लालपरीच्या प्रवासाला मुकली आहे. प्रवासासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे. एस.टी. महामंडळ आदिवासी भागावर अन्याय करत असल्याची भावना येथील नागरिकांची झाली आहे. अकोले आगाराने आठ दिवसांपासुन आदिवासी भागातील फेऱ्यासह तालुक्यातील एकुण १८ ते … Read more

Ahmednagar Crime : तरुणावर चाकू हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अकोले शहरातील बाजारतळावर गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजता प्रदिप सुरेश वाघिरे (वय २४ रा. शाहूनगर, अकोले) या तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. चाकू हल्ला करणाऱ्या तीन आरोपींवर अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या वाघिरे याची प्रकृती गंभीर आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अकोले बाजारतळावर … Read more