Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजवा महोत्सवात यावर्षी पर्यटकांनी हाऊसफुल होणार आहे. या महोत्सवासाठी अगोदरच बुकींग फिक्स झाल्या आहे असून काजव्यांसाठी भंडारदरा सजला आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणाऱ्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभायाण्यात पावसाळ्याच्या अगोदर काजव्यांची चमचम सुरु होत असते. ही काजव्यांची चमचम म्हणजे पावसाची चाहुल असते. हिरडा, बेहडा, सादडा यासारख्या झाडांवर स्वयंप्रकाशित काजवा किटक कोट्यावंधींच्या संख्येने एकाच वेळेस लयपद्ध पद्धतीने चमकत असतात.
हा काजव्यांचा चमत्कार बघण्यासाठी दरवर्षी दि.२५ मे ते १५ जुनपर्यंत हजारो पर्यटक भंडारद-यात दाखल होत असतात. याही वर्षी काजव्यांची चमचम वेळेवर सुरु होण्याची शक्यता आहे. अनेक पर्यटकांनी काजव्यांचा हा करिष्मा व्यवस्थित हॉटेल मध्ये अॅडव्हॉन्स बुकींग केली आहे.
काही ऑर्गनायझर्ससे काजवा महोत्सवामध्ये वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले आहेत. अनेक आयोजकांनी पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी सोशल मिडीयाचा आधार आपली जाहीरात केली आहे. काजवा महोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वनविभागाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
पर्यटकांना काजव्यांचा व्यवस्थित आनंद घेता यावा म्हणून अभयारण्यातील असणाऱ्या प्रत्येक गावातील सदस्यांची आढावा बैठकही आयोजित केली गेली असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. भंडारदऱ्यातील हॉटेल्स व महाराष्ट्र पर्यटन निवास यांनीही पर्यटकांना काजवा महोत्सवात आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती दिल्या आहेत.
अनेक टेंटधारकही सवलतीच्या दरात बुकींग करत आहेत. कोरोनाचे सावट आता पुर्णपणे नाहीसे झाल्याने गत तीन ते चार वर्षांपासुन काजवा महोत्सव जोमाने सुरु झाला आहे. यावर्षी मात्र भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव हाऊसफुल होणार आहे