प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मविभूषण डॉ विजय केळकर निवृत्त झाले आहेत आता यांच्या जागी डॉ राजेंद्र विखे पाटील हे कुलपती पदाची धुरा … Read more

एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बांबूने बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजता तालुक्यातील निमज येथे घडली. या संदर्भात १४ जणांवर संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोपट कासार मुलीला घेऊन घरी जात असताना १४ जणांच्या जमावाने त्यांना अडवून भांडणात मध्यस्थी केल्याच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; जिल्ह्यात या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- शासकीय तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने अत्यल्प भावात शेतकऱ्यांनी तूर विक्री करावी लागत असल्याचे अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यात तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून, जिल्ह्यात १४ केंद्र सुरू करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर तुरीची … Read more

वाळू तस्करांवर पोलिसांची कारवाई; तीन लाखांचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर मध्ये वाळूतस्करांनी धुडगूस घातला आहे. वाढत्या वाळू तस्करीमुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत ट्रॅक्टर, ट्रॉलीमधुन वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळू तस्करीप्रकरणे मोहन भीमाजी जेडगुले ( वय २०, सायखिंडी फाटा, … Read more

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ 21 जागेसाठी पंचवार्षिक निवडणूकी साठी 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दि.6 … Read more

शिर्डी येथील भिक्षेकऱ्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- गेल्या महिन्यातच साई मंदिर खुले झाले असले तरी कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिसांना शिर्डीतील भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस, नगरपंचायत व साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी ३३ पुरुष व १२ महिला भिक्षेकऱ्यांवर कारवाई करून त्यांना … Read more

आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्हणाले मतभेद विसरुन पुन्‍हा एकदा विकासासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गावाच्‍या विकासाची चावी तुमच्‍या हातात आली आहे. सर्वांना विश्‍वासत घेवून नव्‍या गाव कारभा-यांनी मिळालेल्‍या संधीचे सोने करावे, समाजाच्‍या हितासाठी योजनांची अंमलबजावणी करा आणि ‘स्‍वयं: रोजगाराच्‍या निर्मितीतून गावे आत्‍मनिर्भर बनवा’ असे आवाहन भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. शिर्डी मतदार संघातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्‍यांचा सत्‍कार आ.राधाकृष्‍ण विखे पाटील … Read more

त्या दोघा तरुणांवर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-प्रवरा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असून, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरजवळ दुचाकीवरील दोघा तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात त्यांच्या हाता पायाला जखमा झाल्या आहेत. कुऱ्हे वस्तीवरून सागर जाधव (रा. जवाहरवाडी, एकलहरे शिवार) व त्यांचा मित्र हे घरी चालले होते. दुचाकीवरून जात असताना तळ्याजवळ बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यातून … Read more

त्या महिलेच्या खूनप्रकरणी तपास सुरूच !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात मंगळवारी दुपारच्या वेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका ६५ वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला. खून झालेल्या सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेच्या मृतदेहावर बुधवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा व … Read more

संगमनेरात साडेसहा लाखांची दारू जप्त ! एकाविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-पुण्याच्या भरारी पथकाने बेकायदेशीररित्या दारुची वाहतुक करणाऱ्या टेम्पोला पकडून या टेम्पोतून ६ लाख ६० हजार ४३० रुपयांची दारू टेम्पोसह जप्त केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर घडली. संगमनेर तालुक्यातून एका वाहनातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना समजली. ही माहिती मिळताच पुणे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार २३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धावत्या बसने घेतला पेट आणि नंतर…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथील मुळानदीच्या उड्डाणपुलावर राज्य परिवहन विभागाच्या बसला अचानक शॉर्टसर्कीट होऊन खालील बाजूने आग लागली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या बाजूला घेतली. त्यानंतर आजूबाजूच्या तरूणांनी धाव घेऊन माती व पाणी टाकून आग विझवल्याने पुढील अनर्थ टळून 26 प्रवाशी बालंबाल बचावले. याबाबतची समजलेली … Read more

फसवणूक करणारी टोळी गजाआड !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-बनावट वधूशी लग्न लावून देऊन मोठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा श्रीरामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून ही आंतरराज्य टोळी असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील काल बुधवारी श्रीरामपूरच्या दौऱ्यावर आले असताना शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परीषदेत … Read more

मनसेच्या शहराध्यक्षांना जिवे मारण्याची धमकी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यात ग्रामिण भागात वीज वितरण कंपनीने मीटर रिडींग घेण्याचे कंत्राट संगमनेर येथील दिलीप नरहरी चकोर यांचे चाणक्य मल्टीस्टेट सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले असून कंपनीमार्फत ग्रामीण भागात मीटर रिडींग घेण्याचे काम सुरू आहे, असे असताना दिलीप चकोर यांनी कामावरून तीन कामगारांना शिवीगाळ करून काढून टाकले. त्यामुळे कामगार यांनी … Read more

कांदादर पोहचला साडेतीन हजारांच्या जवळ

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे दर चांगलेच कोसळले होते. कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण पाहून बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. नुकतेच नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याला जास्तीत जास्त ३४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. काल बुधवारी कांद्याची ४४ गोण्याची आवक झाली. सोमवारच्या तुलनेत ती जवळपास १० … Read more

धाकधूक वाढली; पुन्हा एका कावळा मृत अवस्थेत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गेली अनेक महिने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होता, या संकटाला सामोरे जात त्याच्यावर विजय मिळवत असताना नगरकरांच्या समोर आणखी एक मोठे संकट येऊन उभे राहिले आहे. देशात बर्ड फ्ल्यू या आजराने प्रवेश केला आहे, तसेच स्वाईन फ्ल्यूमुळे देखील अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

उसने पैसे देण्या घेण्याच्या वादातून दोन गटात तुफान राडा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- उसने पैसे देण्याघेण्याच्या कारणातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत जखमी करण्यात आले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे घडला आहे. या मारहाणीत शापिनखान शौकत पठान रा. उपासनी गल्ली संगमनेर हा गंभीर जखमी झाला आहे. … Read more

चारचाकीतून दारूची अवैध वाहतूक; पोलिसांनी केला पर्दाफाश

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी पिकअप पकडण्यात आली आहे. दरम्यान हि कारवाई पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more