कांदादर पोहचला साडेतीन हजारांच्या जवळ

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे दर चांगलेच कोसळले होते. कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण पाहून बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

नुकतेच नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याला जास्तीत जास्त ३४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. काल बुधवारी कांद्याची ४४ गोण्याची आवक झाली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोमवारच्या तुलनेत ती जवळपास १० हजार गोण्या अधिक आहे. काल एक नंबरच्या कांद्याला ३००० ते ३४०० रुपये, दोन नंबरला २८०० ते ३००० रुपये, गोल्टी कांद्याला २७०० ते ३१०० रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते १००० रुपये भाव मिळाला.