जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मामा व दोन भाच्यांना पाण्यात जलसमाधी !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील झोळे येथे गणेशवाडी परिसरात असणार्‍या म्हसोबा नाल्यात शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या मामा व दोन भाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 17 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात शेळ्या धुवत असताना एका मुलाचा पाय घसरला असता दुसरा त्यास हात देण्यासाठी गेला, … Read more

सुखद रविवार ! आजच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने वाढ … Read more

धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून, या षड्यंत्राविरोधात त्यांचे सर्व समर्थक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगत मंत्री मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कदापिही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी व्यक्त केली आहे. मंत्री धनंजय … Read more

महिलेचा खून झाल्याचे उघडकीस, ‘त्या’ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव येथे महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला. या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५, रा. पांढरे वस्ती, शिरसगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला शिरसगाव येथे एकटी राहात होती. … Read more

लोकप्रतिनिधी सरकारदरबारी आपले वजन वापरून तालुक्याला पाणी उपलब्ध करून देणार आहेत का?

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणीपातळी कमी होत जाते, तसा पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पायथ्याशी धरण असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना हा प्रश्न नेहमी भेडसावत असतो, असे पिचड म्हणाले. हे टाळण्यासाठी भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधल्यास पाणलोट क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न … Read more

‘त्या’ कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्यात नोकरी – आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- घोडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय अडसूळ यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शासकीय मदत व कुटुंबातील एकाला साखर कारखान्यात नोकरी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार पवार यांच्या आश्वासनामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सावकाराचे कर्ज व … Read more

अपहरण केलेल्या ‘त्या’ महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नुकतेच या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला आहे. या प्रकरणी दोघा … Read more

जिल्ह्यातील मतदान मोजणी प्रक्रिया ‘या’ ठिकाणी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सोमवार (दि.18) रोजी मतमोजणी होणार आहे. इच्छुक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे, आता सोमवार रोजी मतपेट्या खुलणार व यातूनच काही जणांचा विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. दरम्यान या मतमोजणीच्या ठिकाणे संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी निश्चित केली … Read more

गुटख्याचा हॉटस्पॉट ठरलेल्या तालुक्यात गुटखा तस्करी सुरूच

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरु आहे. या धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलिसांकडून देखील सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र तरीही जिल्ह्यात या धंद्यांना आळा घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. संगमनेर तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना दिसून येत आहे, यामुळे तालुक्यात अवैध धंद्याने डोके वर काढले आहे. … Read more

जिल्ह्यात ८७१ जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- राज्यात कालपासून (दि.१६ जानेवारी) कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. दरम्यानन राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. नगर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. … Read more

भक्ष दिसताच बिबट्याने घेतली झडप; पहा पुढे काय झाले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील पठारभागात बिबट्यांची दहशत वाढत आहे. नुकतेच शुक्रवारी (ता.15) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथे एका कारवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. परंतु, कारच्या सर्व काचा बंद असल्याने कारचालक तरुण बचावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कारचालक गणेश दिलीप वाघ हा तरुण शेळकेवाडी … Read more

कोरोनाची पिछेहाट; तीन दिवसात सहा बाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कोरोनाचे प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यातच जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. यामुळे या महामारीचा धोका कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बाब आहे. दरम्यान नुकतेच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात तीन दिवसात सहा जण करोना संक्रमित असल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले. गुरुवारी माळीचिंचोरा व बहिरवाडी येथे प्रत्येकी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १०१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ७९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more

पशुपालक चिंतेत; भक्षक बिबट्याने श्वानाला केले फस्त

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या अनेक महिन्यांपासून नगर जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच या भक्षक बिबट्याने प्राण्यांवर देखील हल्ले करत त्यांना ठार केले आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद शिवारात बिबट्याने कुत्र्याला फस्त केले आहे. तसेच एका चारचाकी वाहनावर देखील बिबट्याने झेप घेतली … Read more

जिल्ह्यातील तब्बल पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून तब्बल पाच अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा गंभीर प्रकार गत तीन दिवसांमध्ये घडला आहे. या प्रकाराने पालक वर्गात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसात याबाबत वेगवेगळे गुन्हे दाखरल करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर असे की, पारनेर येथोल पद्मावती गली भागात राहणारी मुलगी दि.१३जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या … Read more

या कारणावरून केला तिन महिलांचा विनयभंग या तालुक्यातील घटना : दोघेजण अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- मोटारसायकलला कारचालकाचा धक्का लागला त्यावरून कारचालकाला गाडी हळू चालव असे सांगितल्याचा राग आल्याने कारचालचालक व त्याच्यासोबत असलेल्या अन्य एकजण असे दोघांनी त्या मुलास मारहाण केली. यावेळी मध्यस्ती करणाऱ्या तिन महिलांचा या दोघांनी वियभंग केल्याचा गंभीर प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील पोहेगाव खूर्द मध्ये … Read more

धक्कादायक ! दोघा अज्ञातांकडून महिलेचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत नुकताच तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यता आला आहे. याबाबतचे अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील पांढरे वस्ती येथे वास्तव्यास … Read more