साई मंदिर सोमवारपासून सुरु होणार ! नियम व अटी पाळण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- राज्य शासनाने आदेशित केल्यानुसार येथील श्री साईबाबा मंदिर सोमवार, 16 नोव्हेंबरपासून भविकांसाठी सुरु होणार असून, भाविकांनी प्रशासनाने निर्देशित केलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले. शिर्डी येथील साई मंदिर सुरु करण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली श्री साई सभागृह येथे आढावा बैठक … Read more

ठाकरे सरकारच्या निर्णयाचे स्वागत… महंतांनी केले भाविकांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस मंदिरांची दरवाजे उघडणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. दिवाळी पाडव्या पासून राज्यातील मंदिरे आणि इतर धार्मिकस्थळे उघडण्यात येणार आहेत. मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र शासनाच्या नियम अटी यांचे पालन करूनच भक्तांना देव पावणार आहे. … Read more

साईंच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यभरातील मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर जगप्रसिद्ध असलेले शिर्डीतील साईमंदिराच्या दर्शनासाठी विविध नियम करण्यात आले आहेत. शिर्डी येथील श्रीसाई मंदिर कोरोनामुळे 17 मार्च रोजी बंद करण्यात आले होते. आता राज्य सरकारच्या परवानगीने धार्मिक स्थळे उघडणार आहे. … Read more

डॉक्टरला चाळीस लाखांना गंडवले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-संगमनेरात एका नामांकित डॉक्टरांची तब्बल 40 लाख रुपयांना फसवणूक झाली असून त्यांच्या तक्रारीवरुन शहरातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, संगमनेर शहरातीलगंगागिर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ.योगेश बाळकृष्ण गेठे यांनी 04 वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2016 रोजी गुंजाळवाडी शिवारात दहा गुंठे जागा दाखविण्यात आली होती. त्यानंतर व्यवहार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘येवढे’ कोरोनाचे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार २२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ … Read more

४५० किलो गोमांस पकडले; तिघे ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. यातच दिवालियाच्या दिवशी पोलिसांनी श्रीरामपूर शहरात एक मोठी कारवाई केली आहे. शहरातील एका घराच्या आडोशाला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ४५० किलो कत्तल केलेले गोवंश जातीचे गोमांस श्रीरामपूर शहर पोलिसांनी शनिवारी पकडले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना पकडले आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

खुशखबर! अखेर शिर्डीतील साईबाबांचा दरबार खुलणार

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यातच जगभर प्रसिद्ध असलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर देखील बंदच होते. मात्र आता साई भक्तांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून साईंच्या दर्शनपासून वंचित राहिलेले भक्तांना आता साईबाबाचे दर्शन घेता … Read more

इतिहासात प्रथमतः शनिशिंगपुरात घडली अशी घटना

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाच्या वर्षी सर्वच सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातच देशभर प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर मध्ये प्रथमतःच अशी घटना घडली आहे. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून शनिशिंगणापुर येथील … Read more

आज २६७ रुग्णांना डिस्चार्ज तर १८५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार १०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८५ ने … Read more

ब्रेकिंग न्यूज! या दिवसापासून राज्यातील मंदिरे उघडणार

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट दिलं आहे. दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळी पाडवा म्हणजे सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. अनेक राजकीय पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी … Read more

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा … Read more

पगाराअभावी येथील शिक्षकांची दिवाळी झाली बेरंग

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा कॉलेज अद्यापही बंदच ठेवण्यात आल्या आहेत. यातच जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथील शिक्षकांची यंदाची दिवाळी पगाराविना बेरंग झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या, वेळेवर वेतन करण्याबाबतच्या अनास्थेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन सातत्याने विलंबाने होत आहे. ऐन दिवाळीत शिक्षक वेतनापासून वंचित राहिल्याचे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण … Read more

दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच दोन बालकांचा विहिरीत पडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीचा सण आला असून सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यातून अत्यंत दुखांकित बातमी समोर येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून दोन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात राहणाऱ्या कांतीलाल … Read more

बिबट्यानंतर आता या प्राण्याची दहशत वाढू लागली

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तरास नामक प्राण्याचा वावर वाढू लागल्याच्या घटना ऐकण्यात आल्या आहेत. या प्राण्याकडून काही जणांवर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. अकोले तालुक्यातील राजूर मध्ये या प्राण्याचा वावर वाढू लागला आहे. जंगलात खायला नसल्याने बिबट्या, तरास गावाकडे येऊ लागल्याने नागरिकमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने … Read more

तरुणावर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने संगमनेर तालुक्यात एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात अनिल संभाजी मधे हा युवक जखमी झाला होता. ही घटना संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे घडली होती. तरुणावर हल्ला केल्याने वन खात्याने पिंजरा लावला होता. … Read more

सराफाकडून महिलेची 9 लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका महिलेला एका सराफाने लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी एक़ास ताब्यात घेतले असून एक जण पसार झाला आहे. दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, येथील … Read more

महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला काही तासातच केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरातील एका 35 वर्षीय विवाहित महिलेवर नातेवाईकाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडितेने तक्रारीत म्हटले आहे … Read more

निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-अकोले नगरपंचायत निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा नारा देत महाविकास आघाडीऐवजी एकला चलोरेची भूमिका शिवसेनेने घेतली. तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शासकीय विश्रामगृहावर शिवसैनिकांची बैठक झाली. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला गुरुवारी आयोजित बैठकीचे निमंत्रण न दिल्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक होऊन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आगपाखड … Read more