टँकर-दुचाकीची धडक एक तरुण ठार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर टँकर व दुचाकीची धडक होऊन सुकेवाडीचा अक्षय सोमनाथ गोसावी (२५) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता रहिमपूर येथे घडली. अक्षय आश्वी येथील दुचाकी शोरूममध्ये कामाला होता. दुचाकीवरून (एमएच १७ ईजे ६५२९) तो कामावर निघाला होता. रहिमपूरच्या जोर्वे-आश्वी रस्त्यावर ओढ्याजवळील धोकादायक वळणावर त्याच्या … Read more

महावितरणच्या चुकीमुळे ऐन दिवाळीत ‘या’ गावांची बत्ती गुल होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-वर्षाचा सणदिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. महावितरणच्या चुकीमुळे ऐन दिवाळीच्या सणामध्ये नेवासा तालुक्यातील अनेक गावांची बत्ती गुल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील 220 केव्ही वीज उपकेंद्राकडे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहमदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. या घटनेतील नववधूला पळून जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले व तिने सर्व हकीगत सांगितल्यानंतर लाखो रुपये घेऊन लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीचे रॅकेट उघडकीस … Read more

आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्या सोडविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंट्या ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षणाच्या कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या उपोषणात संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्‍वर भंगड, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल माळी, सुनिल मोरे, सोमनाथ माळी, परसराम माळी, रामू मोरे, लक्ष्मण मोरे, बाजीराव जाधव, सर्जेराव माळी, सखाराम पवार, … Read more

दिवसभरात कोरोनाने एकही मृत्यू नाही

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र, दिवसभरात नवे १६९ रुग्ण आढळून आले. चार महिन्यांत सर्वात कमी रुग्ण सोमवारी आढळले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १३३४ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत ३७ आणि अँटीजेन चाचणीत ९१ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील … Read more

नगर परिषदेची दिवाळी; महसुलात ६० हजारांची भर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-यंदा दीपावलीचा सण १४ नोव्हेंबरला साजरा होत असल्याने राहुरीत फटाका स्टाॅल लावण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे. फटाका विक्रीसाठी लागणाऱ्या स्टाॅलच्या जागेचे वाटप नुकतेच करण्यात आले. राहुरी शहर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाका स्टाॅलच्या माध्यमातून राहुरी नगर परिषदेला ६० हजार रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्मशानभूमीजवळ कारमध्ये आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गहणारे भाऊसहेब सोमनाथ कातोरे, (वय ४५) हे त्यांच्या मालकीची इंडिका कार नं. एमएच १४ इपी ९८०५ ही घेवुन घरातून गेले ते परत आले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता देवठाण रोडजवळील स्मशानभूमीजवळ इंडिका कारमध्येच सिटवर आडवे पडलेल्या स्थितीत भाऊसाहेब कातोरे आढळून आले. त्यांना … Read more

दुधवाहक टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; दुचाकीचालक ठार

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने आता सर्वत्र वाहतूक सेवा पूर्वरत झाली आहे. या दरम्यान जिल्ह्यात अपघातांचे सत्र देखील वाढू लागले आहे. दरदिवशी होणारी अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. यातच आजच्या दिवसाची सुरुवात देखील अपघाताने झालीच आहे. आश्वीकडून संगमनेरच्या दिशेने येणार्‍या दुधवाहक टेम्पोने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू … Read more

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 58000 चा आकडा वाचा आजचे अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात आज २९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ९८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६९ ने वाढ … Read more

बनावट डिजेल रॅकेटच्या मुख्य आरोपीला अटक करा. – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील बनावट डिजेल व नाप्ता भेसळ रॅकेटचा पोलिस पथकाने कारवाई करून वीस दिवसाचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापपर्यंत या डिजेल रॅकेटमधील मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही. या पूर्वीच्या नाप्ता भेसळ प्रकरणाचा तपासही अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची माहीती आहे. तरी यातील … Read more

थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्रला टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- ग्राहकांनी विजेचे बिल भरले नाही तर आक्रमक कारवाई करत ग्राहकाचे वीज कनेक्शन कट करून त्यांना अंधारात लोटणाऱ्या महावितरणालाच नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीने चांगलाच शॉक दिला आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील 220 केव्ही वीज उपकेंद्राकडे असलेली 18 लाख 72 हजार 971 रुपयांची कर थकबाकी वसुलीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतीने आज (दि.9 नोव्हेंबर) … Read more

खाकीची दहशत! या तालुक्यातील बेकायदेशीर कत्तलखाने झाले बंद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. शेकडो वेळा कारवाया करूनही संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने खुलेआम सुरुच असतात. मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची बदली होऊन नविन पोलीस निरीक्षक येणार असल्याच्या धास्तीने संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखाने … Read more

ट्रॅक्टर चालकाने वयोवृद्ध महिलेला चिरडले; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यात खडका शिवारात शेती गट नं. १५५/५ येथे टॅक्टरचालक ट्रॅक्टर हार्वेस्टरने ऊसाची तोड चालू असताना ट्रॅक्टरमागे उसाची टिपरे वेचणारी महिला साखरबाई दामोधर थोरात, (वय ७० रा. खडका) या महिलेस ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे, अविचाराने परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून महिलेस धडक देवुन उडविले. या अपघातात साखरबाई … Read more

बापरे ! या तालुक्यात आता तिसऱ्या बिबट्याचे दर्शन..

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-कालपर्यंत पार्डिी तालुक्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून आज परत नगर व आष्टी तालुक्यातील मराठवाडी घाटदेऊळगाव या परिसरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या भागातील जाधव वस्तीवर राहणाऱ्या लोकांना बिबट्या दिसल्याने या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून पाथर्डी तालुक्यातील मढी केळवंडी … Read more

साता जन्माची साथ देणारा पतीच निघाला वैरी; पत्नीला विष पाजण्याचा केला प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- साता जन्माची साथ देण्याची शपथ घेऊन आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकलेले पती – पत्नी आजवर आपण पहिले असतील. मात्र येथे खुद्द पतीनेच केवळ पैशासाठी आपल्या पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. पत्नीने आपल्या पतीस पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीच्या तोंडात विषारी औषध … Read more

धक्कादायक! विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- महिला आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात सुरूच आहे. कौटुंबिक छळातून महिलांच्या आत्महत्या घडत असताना आणखी एक धक्कादायक घटना जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडली आहे. राहाता शहरातील अस्तगाव रोड लगत असलेल्या एका शेतातील विहिरीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या बाबत समजलेली माहिती अशी कि, अलका भाऊसाहेब … Read more

डिझेल प्रकरणाचा तपास आता पोलीस उपाधीक्षक मिटके यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाढते अवैध धंदे हे वाढत असताना त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र पोलिसांची हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात सापडत आहे. यामुळे काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. यातच जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले होते. यातच पुन्हा एक मोठी माहिती समोर येत … Read more

शाळेत घुसून चोरटयांनी केली तोडफोड; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-विद्येचे माहेरघर व शिक्षणाची गंगा वाहणाऱ्या शाळेतच चोरीची घटना घडल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. दरम्यान कोरोनामुळे सध्या शाळा बंदच असून याच दरम्यान शाळेत झालेल्या चोरीच्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील जिल्हा परिषद शाळेत अज्ञात चोरट्यांनी तिसऱ्यांदा चोरी करण्याचा … Read more