खा. सुजय विखे म्हणतात.. संरक्षणमंत्री व्हावं लागेल

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार झाल्यानंतर अनेक मोठ्या कामांना हात घातला. त्यांचा अभ्यास आणि त्यांची टोलेबाजी करण्याची शैली सर्वश्रुत आहेच. त्यांनी आपल्या याच खास शैलीत टाकळीकाझी (ता. नगर) येथे फटकेबाजी केली. अहमदनगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण-नुतनीकरण भूमिपूजन कार्यक्रम टाकळीकाझी (ता. नगर) येथे पार पडला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर … Read more

अबब ! पाऊस पुन्हा येणार ; ‘ह्या’ भागात पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-सध्या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. जूनच्या पूर्वार्धात सुरु झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. मध्यंतरी थंडावलेला पाऊस सुखावणारा असला तरी पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख के … Read more

सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने जिल्हा व तालुक्यात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. याकरिता प्रशासनाने त्वरित पंचनामे करवे, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कलामंच येथे नूतन अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, जिल्हाधिकारी … Read more

नुकसान झालेल्या पिकांसाठी मदत तातडीने देण्याकरता त्वरित पंचनामे करा – महसूल मंत्री नामदार थोरात

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसाने अहमदनगर जिल्ह्यात व संगमनेर तालुक्यात नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत हि मिळालीच पाहिजे. याकरिता प्रशासनाने तातडीने पंचनामे करा अशी सूचना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिली असून कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अमृत कलामंच या ठिकाणी नवीन अधिकार्‍यांसमवेत झालेल्या जिल्हास्तरीय … Read more

थोरात सह. साखर कारखान्याचे काम उत्कृष्ठ – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- सहकार चळवळीतून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली असून कायम उच्चांकी भाव देत सभासद, कामगार व शेतकर्‍यांचे हित जपणार्‍या व सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम उत्कृष्ठ असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. सन 2020 – 21 या गळीत हंगामातील पहिल्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. यामुळे … Read more

आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये घातलेल्या अटीमुळे शेतकर्यांंचा विश्वासघात झाला असून, शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.आ.विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या गावांचा पाहाणी दौरा केल्यानंतर विश्रामगृहात माध्यमांशी … Read more

कोरोना योद्ध्यांचे कार्य म्हणजे देशसेवाच : जिल्हाधिकारी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना योद्धे हे कोरोना विषाणूच्या विरोधात आपल्या प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश भोसले यांनी केले. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाचा समूळ नायनाट व्हावा व समाजातील गरीब, वंचितांना मदत करणारे स्नेहबंध … Read more

आतापर्यंत ५२ हजार १९८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४३३ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८८, अकोले … Read more

मोदींची शेतकऱ्यांना आणखी 5000 रुपये देण्याची तयारी, ‘अशी’ आहे योजना

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रक्कम देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपये मिळतात. हे पैसे 3 हप्त्यात दिले जातात. प्रत्येक हप्त्याची किंमत 2000 रुपये आहे. 5000 रुपये अधिक मिळू लागताच शेतकऱ्यांना वर्षामध्ये 17,000 रुपये मिळू लागतील. हे पैसे थेट शेतकऱ्यांना बँक खात्यावर … Read more

धक्कादायक ! जिल्हा परिषदेचा प्रताप; ‘ते’ काम अपूर्णच तरीही 35 लाखांचे बिल अदा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असे म्हटले जाते. येथे येणार निधी, होणारी कामे , चालणारे राजकारण पाहता महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा परिषदेचे नाव आहे. परंतु बऱ्याचदा खोटे कारनामे देखील येथे होताना पहिले जातात. असाच एक प्रताप जिल्हा परिषद विद्युत विभागात झाला आहे. सोपवलेले काम अपूर्ण असूनही ठेकेदारास 35 लाखांचे बिल … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी महसूलमंत्री थोरातांची उद्धव ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  यंदा पाऊस खूप बरसला. जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार सुरु झालेल्या पावसाने अगदी आजपर्यंत दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने खरीप पिकांवर अक्षरशः पाणी फिरवले. परंतु आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. शेतांना तळ्यांचे स्वरूप येऊन पिके नष्ट झाली. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी … Read more

साईबाबांच्या ‘ह्या’ उत्सवावरही कोरोनाचे सावट; होणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले.आताही श्री साईबाबांचा 102 वा पुण्यतिथी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार … Read more

सात महिन्यांनी फुलला जनावरांचा बाजार पहिल्याच दिवशी झाली कोट्यवधींची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यापासून बंद असलेला नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव येथील जनावरांचा बाजार फुलल्याचे चित्र काल शुक्रवारी पहावयास मिळाले. करोना अनलॉक नंतर सुरू झालेल्या पहिल्याच बाजारात सुमारे 3400 जनावरे विक्रीसाठी आली होती. या जनावरांच्या खरेदी-विक्रीतून अडीच कोटींच्या दरम्यान उलाढाल झाली आहे. नेवासा बाजार समिती अंतर्गत असलेला घोडेगावचा … Read more

कोरोनाचा परिणाम रावण दहनावरही ; संगमनेरमधील सोहळा रद्द

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  यंदा कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घालत अनेकांना घरात बसविले. त्याचे सावट अनेक उत्सवांवर पडले. पंढरीची वारी असो कि गणेशोत्सव असो हे सर्व सध्या पद्धतीने पार पडले. आता याचा परिणाम यंदाच्या दसरा सणावरही होणार आहे. संगमनेर मध्ये मालपाणी उद्योग समुहाच्या अकोले रस्त्यावरील कारखाना परिसरात असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरकर विजयादशमीलामोठी … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : व्यापाऱ्यांवर कांदा साठ्याची मर्यादा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा घातली. आता ठोक व्यापारी कमाल २५ टन, किरकोळ व्यापारी कमाल दोन टन कांदा साठवू शकतील. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार, कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत राहील. प्राइस वॉटर … Read more

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. “मी तुमच्या पाठीशी आहे ,काळजी करू नका” असा जो शब्द व विश्वास दिला होता तो मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देऊन खरा करून दाखवला, अशी प्रतिक्रिया मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे काल झाला ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात २९४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३०७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या आता ८३९ झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ५४ हजार ४७० झाली आहे तर आतापर्यंत ५१ हजार … Read more