म्हणून इंदुरीकर महाराज भाषण न करताच निघून गेले…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  आपल्या हटके स्टाईलमध्ये कीर्तनाद्वारे प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राजकीय चर्चा असो व इतर विषय महाराजांच्या कृती या सध्या चर्चेचा विषय बनत आहे. नुकतेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. या अनुषंगाने मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांकडून मोर्चाचे … Read more

थोडासा दिलासा थोडीशी चिंता; या तालुक्यात सुरु कोरोनाचा चढ उतार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार अद्यापही कायम आहे. सुरुवातीच्या काळात सुसाट असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा कमी झाला आहे. यातच कोरोनाबाधितांची आकडेवारीमध्ये सुरु असलेली घट हि काहीशी दिलासादायक ठरत आहे. संगमेनर तालुक्यातील … Read more

‘ह्या’ योजनेतून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते; आ. काळे म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-मनरेगा योजनेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ‘ नवी उमेद’ या संस्थेमार्फत ऑनलाईन विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी ते म्हणाले की, मनरेगा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामांना प्राधान्य देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो व जलसंधारणाची कामे राबवून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- कोरोना अपडेट्स आज ३०७ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ६९ अकोले १४ जामखेड २२ कर्जत १३ कोपरगाव १० नगर ग्रा.२२ नेवासा ०३ पारनेर १५ पाथर्डी ३९ राहाता १९ राहुरी ०८ संगमनेर ०७ शेवगावv१६ श्रीगोंदा ४३ श्रीरामपूर ०६ कॅन्टोन्मेंट ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:५००१९ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग … Read more

आ. राधाकृष्ण विखे यांची शेतकऱ्यांसाठी सरकारला आर्त हाक ; केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-चालू वर्षी पावसाने सर्वत्र कहर केला. अनेक ठिकाणी सरासरी ओलांडली. त्यामुळे हजारो हेकटरवरील पिके भुईसपाट झाली. या नुकसानीमुळे शेतकरी खूपच संकटात खचला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. … Read more

अकोले तालुक्यातील ‘त्या’ कामांबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्याची महसूलमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यामध्ये बऱ्यापैकी विकासकामे झाली आहेत. तर विविध कामे सुरु आहेत. परंतु बरीचशी कामे अनेक कारणामुळे बंदही होत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अगस्ती सह. साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे यांनी अकोले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेली प्रलंबीत कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री … Read more

‘ते’ गुटखा प्रकरण आता शिर्डी पोलीस उपअधिक्षकांकडे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली. परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यांतर संगमनेरमध्येही त्याची व्याप्ती पोहोचली. तेथेही लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु प्रकरणातील मुख्य आरोपींचा गेल्या 15 दिवसांपासून शोध लागत … Read more

श्रीरामपूरमधील ‘तो’ तोतया पोलीस बनला आणि कर्नाटकात सोने लुटून आला

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सध्या गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. यात फसवणूक, अवैध पदार्थांची विक्री , दुचाकी चोरी आदी घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. श्रीरामपुरातील एका तरुणाने कर्नाटकात जाऊन पोलीस असल्याचे भासवून सोने लुटले आहे. कर्नाटक पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने एका सराफास ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती … Read more

तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक पथकाला विहिरीतील युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-शिर्डी जवळील नांदूरखी पाटावर पोहण्यासाठी शिर्डी येथील कालिकानगर येथे राहणारे दोन युवक गेले होते. पोहून झाल्यानंतर दोन्ही युवक साईबाबा प्रसादालयाजवळील असणाऱ्या गोपीनाथ गोंदकर यांच्या विहिरीजवळ आले आणि त्यातील सुरज माणिक जाधव याने पोहता येत नसतांनाही विहिरीत उडी मारली. आणि 50 फूट खोल असलेल्या विहिरित पोहता न आल्याने पोटात पाणी जावुन … Read more

जिल्ह्यातील ‘ह्या’ तालुक्यात आहेत २१ दुर्गा माता आणि ४०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर..

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- संगमनेरचे वैभव वाढवणाऱ्या २१ दुर्गा माता आहे. त्यापैकी संगमनेर शहरातील कसबापेठ (देवीगल्ली) येथील ४०० वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे. वणी येथील सप्तशृंगीचे येथील या देवीला प्रतिरूप मानले जाते. या देवीला १८ भुजा आहेत. देवीच्या आसनाखालुन भुयारी मार्ग आहेत. या भुयाराचा एक रस्ता घास बाजारातील ऐतिहासिक आंभोरकर वाड्याकडे जातो. तेथून तो … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढली … अतिवृष्टीने नुकसानीत भर; पंचनामे करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- मागील सप्टेंबर महिन्यात नेवासे तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीत हिरावला गेला. या बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय पातळीवर झाले. मात्र नेवासे तालुका प्रशासनाकडून यासंदर्भात हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. या आपत्तीत खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तूर व अन्य पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. … Read more

बायकोचा खून करून लपून बसला उसाच्या शेतात आणि …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीच्या डोक्यात पतीने लाकडी दांडके मारल्याने ती जागीच ठार झाली. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास देवळाली प्रवरा परिसरातील आंबी स्टेशन येथे ही घटना घडली. शनिवारी सकाळी बाबासाहेब विठ्ठल गोलवड याला पकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बाबासाहेब पत्नी शीतलकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी … Read more

परीक्षांच्या गोंधळाबाबत पहा राज्यमंत्री तनपुरे काय म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत. यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रलंबित असल्याने विद्यापीठाने या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या ठरवल्या. मात्र काही दिवसापासून या परीक्षांचा गोंधळ सुरु आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी व … Read more

कारवाईचा धसका! गुटख्याचे दर भिडले गगनाला…

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीचा सुळसुळाट सुरु आहे. याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून या अवैध वुवसाय करणाऱयांविरोधात दंडात्मक कारवाईचे पॉल उचलले आहे. याचाच धसका घेत आता गुटख्याचा काळाबाजार सुरु झाला आहे. श्रीरामपूर पोलिसांनी जिल्ह्यातील गुटखा तस्करीवरील पडदा उठविल्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक गुटखा तस्करांविरोधात कारवाईचा धडाका सुरु झाला … Read more

दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ; शहरातील नागरिक झाले परेशान

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी हि सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र याच वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमेनर शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. शहरातील कुंभार गल्ली आणि तिरंगा चौक (मालदाड रस्ता) या दोन्ही ठिकाणांहून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून पोबारा केल्याने नागरिकांत भीतीचे … Read more

विखे यांच्या बालेकिल्ल्यात युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या बैठकीला तरुणांची मोठी गर्दी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बैठकीला तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या युवा फळीला युवक संघटना बांधणीसाठी मैदानात उतरविले आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर … Read more

आतापर्यंत ४९ हजार ७१२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ७१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.७९ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १९२७ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०६, … Read more

‘त्या’ शिवसेना नेत्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-मशेरपूर येथील उद्योजक व माजी जि. प. सदस्य बाजीराव शंकर दराडे यांच्यावर गुरुवारी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व मारहाण केल्याच्या आरोपावरून शेणीत येथील नामदेव आनंदा डामसे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. दराडे हे शिवसेनेचे नेते असून समशेरपूर गटातील जि. प. सदस्य सुषमा दराडे यांचे पती आहेत. … Read more