अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १४३७ अकोले २, नगर ग्रामीण ४, नगर शहर २४, संगमनेर १, जामखेड २, राहाता १०, शेवगाव १०. पालकमंत्री हसन मुश्रीफ शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर कोरोना स्थितीबाबत घेणार आढावा बैठक राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार … Read more

डॉक्टरच्या संपर्कातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोपरगाव शहरातील ५८ वर्षीय डॉक्टरच्या संपर्कातील साईनगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल तपासणी केलेल्या ३१ अहवालानुसार २० अहवाल प्राप्त झाले होते. त्यात तीन पॉझिटिव्ह तर १७ निगेटिव्ह आले होते. त्यापैकी ११ व डॉक्टरच्या संपर्कातील १३ असे २४ अहवाल प्रलंबित असून … Read more

एकाला संपविले आता तुमचा नंबर’ असे म्हणत भावानेच केला भावाचा खून, वडीलांनाही मारायला निघाला पण….

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- संगमनेर तालुक्यात भावाने केलेल्या शिवीगाळीमुळे पत्नी घर सोडून माहेरी गेल्याचा राग मनात धरून अंध असलेल्या छोट्या भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा सुरीने वार करून निर्घृण खून केला ही घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील माताडे मळा परिसरात घडली. किशोर मनोहर अभंग (वय 32, रा. माताडे मळा, सुकेवाडी रोड, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीपात्रालगत नंदू माधवराव चिखले (५०, माळीवाडा, संगमनेर) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. पात्रालगत मृतदेह पडला असल्याची माहिती काही नागरिकांनी शहर पोलिसांना दिली. मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दुपारपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नंदू … Read more

धक्कादायक : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- श्रीरामपूर येथील प्रवरा कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शिवसेनेचे नेते सदाशिव कराड यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अशोकनगर फाटा परिसरातील रस्त्याने सायंकाळी कराड दुचाकीवर जात होते. कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. त्यात कराड जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे … Read more

कोरोना अहवाल येण्याअगोदरच महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील एका महिलेचा कोरोना अहवाल येण्याअगोदरच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या मृत्यू कोरोनामुळे झाला की नाही हे अहवाल आल्यानंतरच कळू शकणार आहे. महिलेस त्रास होत असताना तिला तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला नगर येथे पाठविले असता तिचा स्त्राव घेवून … Read more

आजपासून ‘असा’ असेल गंगागिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 173 वर्षांची परंपरा असणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले होते. हा सप्ताह सराला बेटावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या सप्ताहास आजपासून श्रीक्षेत्र सराला बेटावर … Read more

श्रीरामपुरात 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर नगर येथे उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय व्यापार्‍यासह वॉर्ड नं. 6 परिसरातील एका 68 वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धाकट्या भावाकडून थोरल्याचा खून !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 : संगमनेर शहरातील सुकेवाडी रोड येथील माताडे मळ्यात घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली. शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहेबराव अभंग याच्या पत्नीला त्याचा मोठा भाऊ किशोर अभंग नेहमी शिवीगाळ करत असे. या त्रासाला कंटाळून ती निघून गेली. या कारणावरून … Read more

खासदार सुजय विखेंचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र म्हणाले संचारबंदी करा, अन्यथा….

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात व शहरामध्ये पाच दिवसाची जनता संचारबंदी करा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खा. डॉ.सुजय विखे यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात वाढले १५१ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर … Read more

अहमदनगर करोना अपडेट : डॉक्टरसह जिल्ह्यात १५१ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण १५१ रुग्णांची नोंद झाली.धक्कादायक म्हणजे शहरातील एका डॉक्टराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९० जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ०८ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या … Read more

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिले ‘हे’ निर्देश

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी कृतिशील वागण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर, अनावश्यक रित्या घराबाहेर न पडणे आणि आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत बाधितांच्या संख्येत ५४ ने वाढ

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १३८४ इतकी झाली आहे.  दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२४२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २६७४ इतकी … Read more

शास्त्रज्ञांवर हल्ला करणारा ‘तो’ गजाआड

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 :राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्याकास मारहाण करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. राहुल जगन्नाथ देसले यांना मारहाण करण्यात आली होती. सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांचा कार्यभार काढून घेतल्याच्या वादातून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार या घटनेतील मास्टरमाइंड ठरलेला विद्यापीठाचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्णांची कोरोनावर मात.बरे झालेल्या रुग्णांची संख्या: १३८४ अकोले ६, नगर ग्रामीण ११,नगर शहर ५१,राहाता ३, कॅन्टोन्मेंट २ ,संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा येथील प्रत्येकी १ रुग्ण. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

एफआरपीची रक्कम थकवल्याने जिल्ह्यातील ‘ह्या’ कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील खासगी मालकीचा युटेक शुगर हा साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी: गळीत हंगाम 2019-20 मध्ये या कारखान्याने 38 हजार 685 मेट्रीक टनाचे ऊस गाळप केले. कारखान्याची या … Read more

संगमनेरमध्ये एका दिवसात ३० रुग्ण तर एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. काल दिवसभरात संगमनेर तालुक्यात 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर नाशिक येथे उपचार घेत असलेल्या एकाच मृत्यू झाला. अद्यापपर्यंत तालुक्यात 456 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 279 रुग्ण … Read more