‘त्या’ लोकप्रतिनिधीच्या संपर्कातील ‘त्यांचे’ अहवाल आले …

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने संक्रमणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उत्तरतेतील एका लोकप्रतिनिधीस कोरोनाची बाधा झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर श्रीरामपूर शहरात कोरोनाबाधित लोकप्रतिनिधीच्या संपर्कात आलेले ‘त्या’ नऊ राजकीय प्रतिष्ठांनी स्वतःहून रुग्णालयात जावून घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : वाळूज एमआयडीसीतून गावी सोनई येथे आलेल्या कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याने प्रशासनाने तत्परता दाखवत त्याच्या संपर्कातील वीस जणांना क्वारंटाइन करत सर्वांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले. दरम्यान, मृत व्यक्तीने पाथर्डी तालुक्यातील एका लग्न समारंभास हजेरी लावली होती, अशी माहिती पुढे आली. सोनई येथील ५४ वर्षीय व्यक्ती वाळूज येथे कंपनीत … Read more

कोरोना ब्रेकिंग : दिवसभरात ४९ रुग्ण आढळले,जिल्ह्यातील रुग्णांची संख्या @६९५ !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  आज रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१, जामखेड येथील ०२ (पुण्याहून प्रवास करून आलेले) आणि पारनेर तालुक्यातील लोणी मावळा (मुंबईहून प्रवास करून आलेला) एका रुग्णाचा समावेश. मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा(सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले. यात सर्वाधिक १२ रुग्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आणखी वाढले १६ कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :   येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री १६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ११ तर पेमरेवाडी येथील ०१, अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ०२ पारनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील ०१ आणि राहाता तालुक्यातील दाढ बु. येथील एक रुग्ण बाधित आढळून आला … Read more

‘ती’ एक चूक पडली महागात ; श्रीरामपुरातील ‘त्या’ कुटुंबातील चौघांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता. आज आलेल्या रिपोर्टनुसार याच कुटुंबातील चौघांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. … Read more

कोरोना ब्रेकिंग : या तालुक्यात वाढले 3 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचे 3 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.  अकोले तालुक्यातील धुमाळवाडीत 1 तर पिंपळगाव निपाणीत 2 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. या तीन रुग्णांचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत अकोल्यात 32 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 24 रुग्ण करोनामुक्त झाले. तर 7 … Read more

कौतुकास्पद ! साईचरणी भक्तांची ‘अशीही’ गुरूदक्षिणा

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. अशातच गुरुस्थान मंदिरात रुद्रपूजा व साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमेची सांगता झाली. यावेळी दोनशे दहा भाविकांनी रक्तदान करून साध्या पद्धतीने साईचरणी गुरुदक्षिणा अर्पण … Read more

बिग ब्रेकिंग : बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातील एकाला कोरोना,थोरातांनी घेतला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःला होम कॉरांटाइन केले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी २० जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल असे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले आहे. … Read more

काल्याच्या कीर्तनाने शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : शिर्डी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने ४ जुलैपासून सुरू झालेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता भाविकांविना सोमवारी काल्याच्या कीर्तनानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडून झाली. उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे साडेचारला श्रींची काकड आरती झाली. पहाटे ५ वाजता मंगलस्नान व शिर्डी माझे पंढरपूर ही आरती झाली. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पाच रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यात पारनेर येथील १ तर श्रीरामपूर येथील ४ जणांचा समावेश आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील … Read more

काही लोक आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत : मंत्री थोरात

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : सध्याचे राज्याचे राजकारण पहिले तर महाविकास आघाडी उत्तम कार्य करत आहे. जनताही या कार्यामुळे समाधानी आहे. परंतु काही लोक महाविकास आघाडीत बिघाडी करण्याच्या केविलवाण्या प्रयत्नांत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे दंडकारण्य अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ते यावेळी बोलताना म्हणाले शिवसेना, राष्ट्रवादी … Read more

धक्कादायक : ग्रामपंचायत कार्यालयात शिपायाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावातील ग्रामपंचायत शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोहन आबाजी वाणी असे शिपायाचे नाव असून ते धामोरी ग्रामपंचायतचे कर्मचारी होते. सकाळच्या सुमारास त्यांनी धामोरी ग्रामपंचायतच्या जुन्या कार्यालयातील इमारतीत आत्महत्या केली. घटनास्थळी कोपरगाव पोलिसांनी सदर घटनेची पाहणी करून कोपरगाव आरोग्य केंद्रात मृतदेह पीएम साठी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षीय तरुणाचा खून, आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कोपरगाव शहरातील रेणुकानगर येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या सुरू असलेल्या बांधकामावर किरकोळ वादातून २५ वर्षीय परप्रांतीय मजुर तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  सानू निमाई बिस्वास ( वय २५ वर्षं, रा. सरुलीया, मंगलकोट, बर्धमान, पश्चीम बंगाल ) असे मृत मजुराचे नाव आहे. काल (सोमवार) रात्री सव्वानऊ वाजेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाने घेतला आणखी एका वृद्धाचा बळी !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून गेल्या सात दिवसांतच २१६ रुग्ण आढळले आहेत. आज संगमनेर शहरात मध्यवर्ती भागात राहणार्‍या 70 वर्षीय वृद्धाचा आज पहाटे मृत्यु झाल्याचा अहवाल नाशिक प्रशासनाने संगमनेर प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता संगमनेरात कोरोनाने बाधित होऊन मयत झालेल्यांची संख्या 12 वर गेली आहे. … Read more

३६ रुग्णांची कोरोनावर मात, ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ०६ वर्षाच्या चिमुकलीचा समावेश

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ६ वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या आजारातून बरे होऊन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर मनपा १७, राहाता ०५, नगर ग्रामीण ०५, पारनेर, जामखेड, आणि अकोले येथील प्रत्येकी ०२, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक रुग्ण यांचा समावेश आहे. … Read more

संगमनेर मधील कोरोना नियंत्रणासाठी महसूल मंत्र्यांच्या मदतीला धावणार पालकमंत्री

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे. संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असून कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. हाच धागा पकडून भाजपकडून त्यांच्यावर गैरव्यवस्थापनाचा आरोप होत आहे. … Read more

धक्कादायक! ‘त्या’ कोरोना रुग्णाचा ठावठिकाणाच कळेना !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने चिंता वाढली आहे. सोमवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात २० कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली होती. परंतु या रुग्णांमधील एका रुग्णाच्या माहितीबाबत प्रशासनातच विसंगती आढळून आली आहे. सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शेवगाव तालुक्यातील … Read more

कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावच बंद ठेवण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  बेलापुरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर २०० मीटर परिसर पूर्ण सील करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या. तथापि, चार दिवस संपूर्ण गावच बंद ठेवण्याचा निर्णय कोरोना कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. रविवारी रात्री एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्ण आढळलेल्या परिसरात नागरिक ये-जा करत असल्याचे … Read more