अहमदनगर ब्रेकिंग : त्या डॉक्टरसह तिघे कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कोपरगाव शहरातील दोन, तर टाकळी येथील एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला. खडकी रोड येथील ४५ वर्षीय डॉक्टर व डॉक्टरांच्या ७२ वर्षीय वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे दोघेही नाशिक येथे जाऊन आले होते. टाकळी येथे सासरी आलेल्या मुंबईत वास्तव्य असलेल्या ४६ वर्षीय जावयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी कृष्णा … Read more

लग्नाला गेले अन् कोरोना घेऊन आले…संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरजवळ असलेल्या केसापूर येथील दाम्पत्य मुलासह मुंबईतील विवाह समारंभासाठी गेले होते. खैरी येथील युवती अस्तगाव येथे लग्नाला गेली होती. येताना ते कोरोना घेऊन आले. कोरोना लग्नाच्या माध्यमातून प्रवास करतो हे लक्षात आले असूनही नियम धाब्यावर बसवून लग्नांचा धुमधडाका सुरूच आहे. मागील आठवड्यात २३ वर्षीय युवतीसह अनेकजण … Read more

श्रीरामपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांच्या सीमा सील कराव्यात- केतन खोरे

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव श्रीरामपूर शहर व तालुक्यात झपाट्याने वाढत असल्याने श्रीरामपूरमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमा किमान सात दिवस सील करून अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यक्ती, वाहनांना श्रीरामपूरात प्रवेश देऊ नये. सोबतच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संपूर्ण माहिती घेतल्यास श्रीरामपूरात वाढू पाहणाऱ्या कोरोनाला रोखण्यात मोठे यश मिळेल अशी … Read more

कोरोनाचा अहमदनगर जिल्ह्यात विस्फोट: एकूण रुग्ण झाले @500 !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  शहरासह जिल्ह्यात बुधवारी दि. 1 रोजी 10 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून यात नगर शहरातील सात जणांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १० तर दुपारी २५ असे एकुण ३५ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा … Read more

लग्न पडलं महागात : नवरदेव नवरीच्या आई वडिलांसह सभागृह देणाऱ्यांवर गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : शासनाने विवाहासाठी ५० लोकांना नियम पाळून परवानगी दिली असली तरी तालुक्यातील अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून धुमधडाक्यात लग्न होत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद बन देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक सभागृहात लग्न समारंभासाठी बेकायदा मंडळी जमवून जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष, व्यवस्थापक … Read more

चढ्या दराने बिल पाठवून जनतेला वेड्यात काढण्‍याचे काम !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : कोपरगावात महावितरणने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ तर केले नाहीच, परंतु चढ्या दराने बिल पाठवून जनतेला वेड्यात काढण्‍याचे काम केंद्र व राज्य सरकारने, तसेच महावितरणने केले. तीन महिन्यांचे बिल माफ करा किंवा सात ते साडेसात रुपये युनिटप्रमाणे दर आकारा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली. याबाबत आठ दिवसात निर्णय … Read more

साधु-संतांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना लांच्छनास्पद

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ तालुक्यातील वारकरी संघटना व सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेली फिर्याद खोटी असून ती त्वरित मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन अकोले तालुका वारकरी संघटनेने तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले. या भुमिपुत्राने तालुक्याचा नावलौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आहे. काही नास्तिक प्रवृत्तीच्या लोकांनी शाब्दिक दोष काढून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी वाढले पुन्हा २५ कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये एकूण २५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात नगर शहरातील १४, राहुरी तालुका ०४, बीड जिल्हा-०१, पाथर्डी तालुका ०१, कोपरगाव ०३, राहाता तालुका ०१आणि श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहेत. नगर शहरातील तोफखाना भागातील १०, ढवणवस्ती येथील ०२ … Read more

कोरोना’ला हरवून ९० वर्षांच्या आजीबाईं परतल्या घरी ! उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मानले आभार

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज नगर शहरातील ९० वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात करुन उपचारांना प्रतिसाद दिला तर रुग्ण बरा होऊ शकतो हे दाखवून दिले. या आजीबाईंसह एकूण ०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 36 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : अकोले तालुक्यातील कृषीउत्पन्न बाजार समिती या परिसरात राहणार्‍या एका 36 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काल मंगळवार दि. 30 रोेजी कोरोनाशी लढा देत असताना या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या मृत कोरोनाबाधित व्यक्तीच्या सानिध्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी जिल्ह्यात १० पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज सकाळी जिल्ह्यात १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ०७, अकोले तालुका ०२ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला आणि पदमा नगर येथील ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ६० … Read more

एकाच कुटुंबात तिघे कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एकाच कुटुंबातील ३९ वर्षीय महिला, ४१ व ५१ वर्षीय पुरुष असा तिघांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. हे तिघे बाधितांच्या संपर्कात होते. गावाचा बाधितांचा आकडा ६, तर संगमनेरचा आकडा १०९ झाला आहे. कुरण रोडची पहिली महिला पॉझिटिव्ह आल्याने हे गाव हॉटस्पॉट घोषित झाले होते. … Read more

इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल झालेला गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले … Read more

शरद पवार यांच्यावर टीका माझ्या मनाला दुःख देणारी – मधुकरराव पिचड

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  आ. गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका माझ्या मनाला दुःख देणारी आहे. सवंगप्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही आता फॅशन झाली आहे. पवार हे एक देशव्यापी नेतृत्व असून, त्यांच्यावरची टीका ही दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा भाजपचे नेते मधुकरराव पिचड यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रेकॉर्ड : आज तब्बल 43 जणांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज संध्याकाळ पर्यंत एकाच दिवसात रेकोर्ड ब्रेक 43 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सत्रात १० दुपारनंतर १९ व १४ रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या ४६५ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा 10 पॉझिटिव्ह … नगर शहरासह पारनेर, जामखेड, श्रीरामपूर, श्रीगोंद्यात वाढले रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड २, चितळे रोड १, ढवण वस्ती १, पदमानगरच्या  एकविरा चौक येथील १ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १० जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहे. जामखेड येथील ४२ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला. परळ (मुंबई) येथून पिंपरी पठार (पारनेर) येथे आलेला २८ वर्षीय पुरुष बाधित राजुरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. नगर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी झाली आहे, याबाबतचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सुधारीत आदेशाद्वारे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व नियम लागू राहणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला …आज आढळले 19 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  आज दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या. *नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, … Read more