खासदार सुजय विखेंच्या ‘या’ कृत्यामुळे जिल्हापरिषदेत नाराजी

अहमदनगर :- नगर दक्षिणेतून निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी लगेच कामाचा तडाखा सुरू केला आहे. परंतु कामे करतांना मात्र त्यांनी राजशिष्टाचाराला अक्षरशः हरताळच फासल्याचा प्रचार उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गुरुवारी खा.सुजय विखे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ऍन्टी चेंबरमधील त्यांच्या खुर्चीवर बसून त्यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. … Read more

मोठी बातमी: बाळासाहेब थोरातांची कॉंगेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड

मुंबई: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे कट्टर विरोधक असलेले विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी व उपनेतेपदी नसीम खान यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.  … Read more

लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार

संगमनेर :- तालुक्यातील एका तीस वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मनोज वसंत कांगणे (रा. हंगेवाडी, ता. संगमनेर) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अत्याचाराच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील आरोपी मनोज वसंत कांगणे याने २५ मार्च २०१८ ते १ मे २०१९ या … Read more

महिलेस शिवीगाळ करत चाकूने वार, बेदम मारहाण

नेवासा :- तालुक्यातील चारी नं. चार सोनई परिसरात पानसवाडी रस्ता भागात राहणारी शेतकरी महिला अश्विनी सोमनाथ तागड, वय ३० हिला ९ जणांनी जमाव जमवून आमच्याविरुद्ध सोनई पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे या कारणावरुन शिवीगाळ करत चाकू, गुप्ती, काठीने वार करुन तलवारीचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. आरोपी महिला सुप्रिया रविंद्र गडाख हिने अश्विनी तागड या … Read more

तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न

नेवासा :- तालुक्यातील जेऊर हैबती शिवारात एकाला तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. जेऊर हैबती शिवारात पंडित यांच्या ओमसाई मोबाईल शॉपी येथे अंबादास कारभारी गायकवाड, वय ३३, धंदा शेती, रा, जेऊर हैबती हे बसलेले असताना तेथे चार आरोपी आले, व काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन तलवारीने वार केले व जिवे ठार … Read more

माझा भाजप प्रवेश हा काही आता मुद्दा राहिलेला नाही – राधाकृष्ण विखे

संगमनेर :- मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मंत्रिपद स्वीकारण्यास मी तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू असल्याने भाजप प्रवेश केवळ औपचारिकता राहिल्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी सांगितले. काँग्रेस नेत्यांनी आता स्वत:हून बाजूला होत नव्यांना संधी देण्याची गरज … Read more

क्रिकेट खेळत असताना मित्रानेच केला मित्रावर कोयत्याने वार

शिर्डी : बुधवारी (दि. १२) सायंकाळच्या सुमारास क्रिकेट खेळत असताना मित्रानेच मित्रावर कोयत्याने वार करण्याची घटना घडली आहे. सलग दुस-या दिवशी शहरात भरदिवसा थरारक घटना घडू लागल्याने शिर्डीत खळबळ माजली आहे. साईदीप कु-हाडे (वय १८, रा. वराह गल्ली, शिर्डी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यास येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलीस … Read more

भर दिवसा विद्यार्थ्याला फूस लावून पळवून नेले !

संगमनेर – संगमनेर परिसरात घुलेवाडी भागात राहणारा सूरज नामदेव देवकर, वय १७ वर्ष हा विद्यार्थी मी फोटो काढून व अॅडमिशन घेवून येतो, असे म्हणून घरातून दुपारी २ च्या सुमारास गेला. त्याला कुणीतरी अज्ञात इसमाने त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेउन फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलाचे नातेवाईक अलका रामु देवकर, रा. घुलेवाडी यांनी संगमनेर शहर पोलिसांत वरीलप्रमाणे … Read more

लग्नाचे आमिष दाखवत बदनामी,जिवे ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

संगमनेर :- तालुक्यातील निझर्णेश्वर भागात हंगेवाडी परिसरात राहणा-या एका तरुणीला मी तुझ्याशी लग्न करील, असे म्हणून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध रहात्या घरात शारीरिक संबंध करुन बलात्कार केला. वेळोवेळी जर तू कोणाला काही सांगितले तर तुझी बदनामी करील, तुला जिवे ठार मारील, असे म्हणून बळजबरीने बलात्कार केला. बलात्कार पिडीत तरुण महिलेने या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत काल … Read more

धक्कादायक : अहमदनगरमध्ये टीकटॉकवर व्हिडीओ अपलोड करत असताना तरुणाची हत्या !

शिर्डी- शिर्डी येथे हॉटेल पवनधाममध्ये काही मुले टीकटॉकवर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ करत असताना गावठी कट्यातून गोळी झाडून प्रतिक उर्फ भैय्या संतोष वाडेकर यांच्या छातीत गोळी घुसून तो जागीच ठार झाला. डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पो.नि अनिल कटके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शिर्डीत नाकाबंदी करुन आरोपी सनी पोपट पवार, वय २०, रा. धूलदेव, ता. फलटण, जि. … Read more

शिर्डीत हॉटेलमध्ये १९ वर्षाच्या युवकाची गोळी झाडून हत्या

शिर्डी :- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हाॅटेल पवनधाममध्ये अज्ञात चार व्यक्तींनी १९ वर्षाच्या युवकाच्या गोळीबार करून हत्या केली. यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक संतोष वाडेकर (१९, रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) असे मृताचे नाव आहे. वर्दळीच्या ठिकाणी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यातील चार संशयितांपैकी मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी … Read more

दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने मजुराची गळफास घेत आत्महत्या

श्रीरामपूर | बेलापूर येथील राजेंद्र पांडुरंग नगरकर (वय ४०) यांनी रविवारी सायंकाळी बेलापूर खुर्द येथे बोरीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. चांदनगर येथे राहणारे नगरकर मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने नगरकर काही दिवसांपासून विमनस्क अवस्थेत होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.

वऱ्हाडी मडंळींना मारहाण, लग्न समारंभात राडा

बेलापूरः चोरीच्या उद्देशाने थांबल्याचा संशय आल्याने उक्कलगाव येथील एका युवकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर सदर युवकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने वऱ्हाडी मडंळींना मारहाण केल्याची घटना बेलापूर खुर्द येथे घडली. याप्रकरणी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. नगर येथील वऱ्हाडी मंडळी बेलापूर खुर्द येथे लग्न समारंभासाठी आली होती. वरात चालू असताना उक्कलगाव येथील युवकाला धक्का … Read more

भाजप नगरसेवकाच्या जाचास कंटाळून तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

श्रीरामपूर :- पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करुनही गाळा न मिळाल्याने हताश झालेल्या प्रभाकर मधुकर कर्नाटकी (वय 45) या व्यावसायिकाने नव्याने बांधण्यात आलेल्या गाळ्यातच अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीरामपूर नगरपालिकेच्या वाॅर्ड नंबर ७ चे याप्रकरणी भाजप नगरसेवक रमेश पाटील यांच्याविरूध्द श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर … Read more

काजवे पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या कारच्या अपघातात एकाचा मृत्यू

अकोले :- तालुक्यातील भंडारदरा परिसरात काजवे पाहायला गेलेल्या संगमनेर मधील पर्यटकांची कार मुतखेल गावाजवळ दरीत कोसळली. अपघातात एक जण जागीच ठार झाला असून तीन जण जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संकेत यशवंत जाधव (रा.चिंचोली गुरव, ता. संगमनेर-हल्ली मुक्काम-इंदिरानगर, संगमनेर) असे या अपघातातील मृत गाडी चालकाचे … Read more

भाजपने दिलीप गांधी यांना उमेदवारी दिल्यास निवडून आणू !

नेवासे :- माजी खासदार दिलीप गांधी यांनी नेवाशातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळाव्यात कार्याकर्त्यानी धरला. भाजपने दिलीप गांधी यांना उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे यांनी यावेळी व्यक्त केला. मंगळवारी अर्बन बँकेच्या सभागृहात ग्राहक मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी भाजपचे व खासदार गांधी यांना मानणारे … Read more

राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश लांबणीवर, मंत्रीपदाबाबत संभ्रमाचे वातावरण

अहमदनगर :- राज्याचे माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे,तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे संभाव्य मंत्री पदाबाबत ही संभ्रमाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसात दिल्लीत चर्चा करुन, पक्षप्रवेशाबाबत भूमिका घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवले आहे. … Read more

श्रीसाई संस्थानकडून भाविकांसह शिर्डीकरांची फसवणूक !

शिर्डी :- साईबाबा संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने गेल्या तीन वर्षांत शिर्डीच्या विकासासाठी केलेल्या घोषणांची किती पूर्तता झाली, साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने मंजूर केलेल्या ३२०० कोटींच्या विकास आराखड्यातील किती कामे मार्गी लावली, याचा लेखाजोखा असलेली श्वेतपत्रिका प्रसिध्द करावी, अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते व उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी गुरुवारी केली.  दानाचा वापर … Read more