औरंगपूर- गोगलगाव रस्त्यावर बजरंग दलाच्या दोघांना टेम्पोने चिरडण्याचा प्रयत्न !

hit and run

गायींची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाला बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांनी थांबण्याचा इशारा केला असता गो-तस्करांनी त्यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील औरंगपूर- गोगलगाव रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी रात्री राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील प्रज्वल दत्तात्रय चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ सागर विलास चौधरी … Read more

झोळे येथील खुनाचा तपास लागला, प्रेमात अडथळा ठरू नये म्हणून वृध्दाचा खून !

crime

संगमनेर तालुक्यातील झोळे येथील वृध्दाच्या खूनाचा तपास लावण्यात येथील पोलिसांना अखेर यश आले आहे. प्रेमात अडथळा ठरू नये म्हणून एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने या वृद्धाचा खून केल्याचे पोलीस तपासात नुकतेच निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७) यांचा मृतदेह (दि.५) ऑगस्ट रोजी पहाटेच्या … Read more

अजब ! पाहुण्याच्या हाताने साप मारण्याची परंपरा, रहिमपूर येथील शिंदे कुटुंबाला नाही साप मारण्याची मुभा

nagpanchami

साप म्हटला की, भीतीने भल्या भल्यांची गाळण उडते. घरात, परिसरात कुठेही साप निघाला, तर त्याला अनेक जण मारतात. मात्र, संगमनेर तालुक्यातील रहिमपूरमध्ये आढळलेल्या सापाला मारण्याची मुभा येथील शिंदे आडनावाच्या कुटुंबीयांना नाही. शिंदे आडनावाच्या घरी साप निघाला, तर त्याला मारण्यासाठी इतर आडनावाच्या व्यक्तीला बोलवावे लागते. त्यामुळे येथे पाहुण्यांच्या हातून साप मारण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील नोंदणीसाठी अधिक काम करण्याचा निर्धार, समितीची पहीली बैठक संपन्न !

ladaki bahin

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तालुका स्तरावरील अशासकीय सदस्यांच्या समितीची पहीली बैठक संपन्न झाली असून तालुक्यातील उर्वरित महीलांना योजनेचा लाभ देण्यासाठी येणाऱ्या त्रुटी दूर करून शासकीय यंत्रणेद्वारे कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी करीता तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून संगमनेर विधानसभा समितीच्या अध्यक्ष पदावर शरद गोर्डे आणि समिती सदस्य … Read more

दुष्काळी पट्टयातील गावांमध्ये निळवंडेच्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा : आ. बाळासाहेब थोरात !

nilvande

जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा व निळवंडे धरण भरले असून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ओहरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळग्रस्त भागाला सोडून जिरायत भागातील सर्व बंधारे भरून घ्यावेत, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. निळवंडे धरण हे दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी निर्माण केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणारे आहे. मागील आठवड्यात धरणाच्या … Read more

संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये अज्ञात व्यक्तीकडून ७० वर्षीय वृद्धाचा झोपेत खून !

khoon

संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भिमाजी उनवणे या ७० वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केला. झोळे गावात घराच्या पडवीमध्ये रविवारी रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले असता, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर वार करून खून केला. सोमवारी सकाळी साहेबराव सोनवणे यांची सून श्रद्धा ही घराबाहेर येत असताना आपले सासरे हे … Read more

मुळा नदीने धोक्याची पातळी ओलांडली मांडवे- साकुर पूल पाण्याखाली, संगमनेर-पारनेरचा संपर्क तुटला !

poool panyakhali

मागील दोन दिवसांपासून अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे. परिणामी, संगमनेर व पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलावर पाणी आले असून त्यामुळे महसूल प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी काल रविवारी (दि.४) बंद केला आहे. त्यामुळे संगमनेर व पारनेर तालुक्याचा संपर्क तुटला आहे. अकोले तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. पुलावर पाणी आल्यामुळे हा … Read more

महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही, योजेनेमुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीलाच मिळणार : मंत्री विखे

vikhe patil

महाविकास आघाडीत आता कोणतीही एकवाक्यता राहिलेली नाही. उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लबचे मेंबर झाले आहेत. शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्याना भेटत आहेत. काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागल्याने महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असून लाडकी बहिण योजेनेमुळे सर्व बहिणींचा आशिर्वाद महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त … Read more

विखे पाटलांनी सगळंच सांगितलं : उध्दव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर ! काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची स्वप्न…

vikhe

महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहीलेली नाही.उध्दव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत.शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्याना भेटत आहेत. काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लाग्ल्याने महाआघाडीत आता एकवाक्यता राहीलेली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सता येणार आहे. योजेनमुळे सर्व बहीणींचा आशीवार्द महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. निमगावजाळी येथे … Read more

लाडक्या बालकाचा छंद पुरवण्याची जबाबदारी पालकाची असते, आ. बाळासाहेब थोरातांची विखेंना कोपरखिळी !

thorat

आपण कधीही चुकीचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेऊन प्रेमाने विकासाचे राजकारण केले, म्हणून जनता सातत्याने आपल्यासोबत आहे. त्यांचे दहशतीचे अन् जिरवाजिरवीचे राजकारण फार काळ चालणार नाही. दहशतीचे राजकारण आता जनता सहन करणार नाही, असे सांगत माजी मंत्री आमदार बाळासाहेव थोरात यांनी नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात तोफ डागली. डॉ. … Read more

नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरातून जावी यासाठी पाठपुरावा करू : खा. वाकचौरे !

wakchaure

आगामी काळामध्ये नाशिक-पुणे रेल्वे मार्ग संगमनेर वरूनच जावी यासाठी आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करू, असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, रणजीत देशमुख, मिलिंद कानवडे, शंकरराव खेमनर, आर.बी. … Read more

संगमनेर मधील हृदयद्रावक घटना, शेततळ्यात बुडून नातवासह आजोबाचा मृत्यू !

mrutyu

शेततळ्यात बुडाल्याने नातवासह आजोबाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावातील पिंपळमळा परिसरात घडली. शिवाजी सोनवणे (वय ६६) व समर्थ नितीन सोनवणे (वय ३) असे मृत्यू पावलेल्या आजोबा व नातवाचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की काल गुरुवारी दुपारी शिवाजी सोनवणे हे आपल्या शेतातील तळ्यालगत … Read more

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेरातील ८५ हजार शेतकऱ्यांना १२९ कोटींचा पीकविमा मंजूर !

rhorat

आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना १२८ कोटी ९८ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले की, आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील ८४ हजार ९३० शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी पाठपुरावा … Read more

दूध दरप्रश्नी २३ जुलै रोजी कोतूळ ते संगमनेर ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन !

dudh

दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतूळ या ठिकाणी शेतकरी गेले १७ दिवस धरणे आंदोलनास बसले आहेत. दूध हंडी, कोतूळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता … Read more

साडेचार महिने उलटले तरी अद्याप शोध लागेना, काकडवाडीतून बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्याची मागणी !

missing

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील युवक तब्बल गेल्या साडेचार महिन्यांपासून घरातून बेपत्ता झालेला आहे. सोमनाथ राजाराम गायकवाड (वय ३२), असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची नोंद केलेली आहे. त्यामुळे आपल्या बेपत्ता भावाचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी दत्तू राजाराम गायकवाड यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी … Read more

शेअर बाजारात नफ्याचे आमिष दाखवून दोन कोटींची फसवणूक संगमनेरात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल !

fraud

शेअर बाजारचा आपला चांगला अभ्यास असून आपण दोन दिवसात १० टक्के परतावा देतो, असे आमिष दाखवून एका जणाने संगमनेर तालुक्यातील तिघांची १ कोटी ८३ लाख ६६ हजारांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय शंकर पवार (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) … Read more

दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची गरज !

dudh darvaadh

दूधाला हमीभाव देणे अतिशय गरजेचे आहे. दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. संगमनेर शहरातील श्रमिक मंगल कार्यालयात आयोजित दूध परिषदेमध्ये बोलताना उत्पादकांनी हा इशारा दिला. येथील श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारी (दि.९) दूध परिषद … Read more

संगमनेरमध्ये १९ वर्षांची तरुणी बेपत्ता, सकल हिंदू समाजाकडून मोर्चाचा इशारा !

apaharan

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील १९ वर्षांची मुलगी नुकतीच बेपत्ता झाली आहे. सदर मुलीचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाच्या वतीने घारगाव पोलिसांकडे केली असून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना दोन दिवसात अटक न झाल्यास जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, पठार भागातील राहणारी व सध्या एका … Read more