शिर्डीत एजंट लोकांचा सुळसुळाट ; विदेशी भक्तांना ५०० च्या पूजेच्या ताटाची किंमत सांगितली ४ हजार

१८ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी युनायटेड किंगडमहून आलेल्या भाविकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ५०० रुपये किंमतीचे पूजेचे ताट तब्बल चार हजार रुपयांला विकल्याने भाविकांची मोठी फसवणूक झाली.या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी दुकान मालकासह एजंटांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची … Read more

अहिल्यानगरचा ‘या’ प्रकल्पात आला राज्यात पहिला नंबर ! ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना मिळाला ‘हा’ लाभ…

१४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : केंद्र सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत देशभरात अॅग्रीस्टंग प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.या उपक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेतले असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी … Read more

रात्री ११ नंतर शिर्डी पूर्णपणे बंद ; डॉ. विखे यांची माहिती : विनाकारण फिरल्यास होणार कडक कारवाई

१३ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : रात्री ११ वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहील. याची पुढील चार दिवस शहरातून दवंडी देण्यात येणार आहे.रात्री साडेअकरा वाजता शिर्डी शहरात कोणीही व्यक्ती रस्त्यावर चालताना दिसली, तर त्याची चौकशी करण्यात येईल. त्या व्यक्तीला दवाखाना किंवा अत्यावश्यक ठिकाणी जाण्याचा पुरावा द्यावा लागेल, अशी माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे … Read more

शिर्डीतील अवैध धंदे, गुन्हेगारी व दादागिरी करणाऱ्यांचा बिमोड करा : सदाशिव लोखंडे

११ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शहरातील अवैध धंदे व दादागिरी कायमची मोडीत काढावी.दहशत मुक्त शिर्डी शहर निर्माण करण्यासाठी शासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीचे दादागिरी करणारे व अवैध धंद्याविरोधात कठोर कारवाई करावी.शिर्डी शहर दहशतमुक्त करावे,अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे सांगितले. … Read more

शिर्डी साई संस्थानच्या मोफत भोजन व्यवस्थेत झाला ‘असा’ बदल

७ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात मोफत भोजन घेण्यासाठी आता दर्शन घेतल्यानंतरच टोकन मिळणार आहे. मंदिराच्या उदी-प्रसाद काउंटरजवळ भाविकांना हे टोकन दिले जाणार असून, या व्यवस्थेसह काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले. याबाबत पत्रकारांना माहिती देताना गाडीलकर यांनी सांगितले, की ही सुविधा केवळ साईभक्त … Read more

…तर आ.संग्राम जगताप जबाबदार ! शिर्डीच्या त्या प्रकरणावर समोर आली महत्वाची अपडेट

शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील समाधी आणि समाधीवर जमा होणारा पैसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता, साईबाबा मंदिरातील इतर समाधीवर जमा होणारा पैसा साई संस्थानच्या तिजोरीत जमा होतो. मात्र, हाजी अब्दुल बाबा यांच्या समाधीवर जमा होणारा पैसा थेट त्यांच्या वंशजांकडे जात असल्याचा गंभीर आरोप संग्राम जगताप … Read more

Ajit Pawar घेणार मोठा निर्णय ! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय काय बदलणार ?

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षामध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल करणे, स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नवीन नेतृत्व निर्माण करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवणे या उद्दिष्टांवर अधिवेशन केंद्रित आहे. अजित पवार गटाची संघटनात्मक रणनीती शिर्डीच्या अधिवेशनस्थळी पोहोचण्याआधी अजित … Read more

साईच्या नगरीत आजपासून राष्ट्रवादीचे मंथन शिबीर ! अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती

दिशा विकासाची.. पुरोगामी विचाराची हे ब्रीदवाक्य व नवसंकल्प घेऊन २०२५ या वर्षभरात सामाजिक समता, विकासाच्या वेगवेगळ्या दिशा, पक्ष संघटन मजबूत करणे यासह इतर विषयांवर मंथन करण्याकरिता साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय पदाधिकारी शिबिर आजपासून सुरू होत आहे. या शिबिरास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार … Read more

Shirdi Breaking : शरद पवार गटाला मोठा धक्का ! शिर्डीत होणार ‘त्या’ आमदारांचा पक्षप्रवेश

शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण याआधीच विधानसभा निवडणुकीच्या काळात सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. आता मात्र ते पुन्हा अजित … Read more

शिर्डीत अज्ञात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

१४ जानेवारी २०२५ शिर्डी : शहरातील नगर-मनमाड रस्त्याजवळ असलेल्या फुल मार्केट जवळील एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ असून त्याने पांढरा हाफ शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या हातावर ‘सुवर्णा’ असे … Read more

आघाडी कशीही लढो,आम्हाला चिंता नाही ! विखे पाटील यांचा आत्मविश्वास ; निगेटिव्ह नॅरेट अल्पकाळ टिकले

१३ जानेवारी २०२५ शिर्डी : विधानसभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाला जनतेने नाकारले आहे.ते आता निवडणुका स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, त्याची आम्हाला चिंता नाही,अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्वबळाच्या घोषणेवर भाष्य केले.शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.अधिवेशन स्थळाचा आज विखे पाटील यांनी आढावा घेतला.त्या वेळी ते बोलत होते. … Read more

आता पुढील महाविजयासाठी लढा ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

१३ जानेवारी २०२५ शिर्डी: लोकसभेला ४८ पैकी १७ जागा मिळून आपण काठावर पास झालो होतो; परंतु मनात मात्र नापास झाल्याची भावना होती. हे अपयश पुसण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काम केले, म्हणून महायुती राज्यात विक्रमी २३७ जागा मिळवू शकली. यात महायुतीला ८२ टक्के मते तर भाजपला ८९ टक्के मते मिळाली.हा महाविजय जनता जनार्दनाबरोबर कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे साकारला आहे.आता … Read more

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला ! साईभक्तांबद्दल प्रचंड आदर : माजी खा. डॉ. सुजय विखे

८ जानेवारी २०२५ शिर्डी : साईभक्तांबद्दल मनात प्रचंड आदर आहे. आपण साईभक्तांमध्ये साईबाबांना बघतो, साईभक्तांविषयी मनात कधीच चुकीची भावना नसते, माझा आक्षेप साईभक्तांवर कधीच राहिला नाही. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.मात्र, बाहेरून अनेक जण येतात शिर्डीत भिक्षेकऱ्यांचे सोंग घेऊन प्रसादालयात मोफत जेवतात आणि नशापाणी करून साईभक्तांना व नागरीकांना त्रास देवून गुन्हेगारी वाढवतात, त्यावर माझा … Read more

फेब्रुवारीत होणार शिर्डी महापरिक्रमा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची उद्घोषणा

शिर्डी ग्रीन अँड क्लिन शिडी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविक उपस्थित होते. माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

साईबाबा संस्थानला आठ दिवसांत १६ कोटी ६१ लाख रुपये दान प्राप्त

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : श्री साईबाबा संस्थानला नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप, आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवात २५ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात संस्थानला एकूण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये देणगी मिळाल्याची माहिती संस्थानचे मुख्य … Read more

शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण लवकरच

३ जानेवारी २०२५ शिर्डी: शिर्डी विमानतळावर उडाण योजनेअंतर्गत लवकरच नाईट लँडिंग विमानसेवा सुरू होणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करण्याची योजना आहे,अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली. गुरुवारी साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मोहळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी … Read more

तीन लाख भाविकांसहित बड्या बड्या हस्ती साईबाबांच्या चरणी नतमस्तक ; सरत्या वर्षाला निरोप देऊन केले नवीन वर्षाचे स्वागत

१ जानेवारी २०२५ शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत दरवर्षी नाताळपासूनचं अनेक मंत्री, अभिनेते, सेलिब्रेटी, खेळाडू, उद्योगपती, आमदार, खासदार आदी बड्या मंडळीं हजेरी लावतात. मंगळवारी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साई समाधीचे दर्शन घेतले, तर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. सरत्या वर्षाला निरोप … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more