पारनेर तालुक्यातील त्या 27 कामगारांना कोरोनाची व्हायरसची लागण झाली नाही

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सुपा (ता. पारनेर) येथील एका कंपनीतील 27 जण चीनमध्येे प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यांना कोरोना व्हायरस नसल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या सर्वांची तपासणी पूर्ण केली असल्याची माहिती डॉ. दादासाहेब सांळुके यांनी दिली. चीनमधील बुहान शहरात कोरोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाल्यानंतर भारतात आलेल्या व येणार्‍या प्रत्येक नागरिकांची … Read more

भाजप सरकार हे जनतेच्या हिताचे -जिल्हाध्यक्ष मुंडे

श्रीगोंदा :- भाजप चे केंद्रातील सरकार हे जनतेच्या हिताचे सरकार असून राष्ट्रीय नागरिकत्व कायदा हा सर्वांच्या फायद्याचा आहे पण काँग्रेस व आघाडीचे सरकार हे भाजप च्या विरोधात रान उठवत आहेत असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून अरुण मुंडे यांचा श्रीगोंदा येथे भाजप च्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी बोलताना नवनिर्वाचित … Read more

भारतीय जनता पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  भारतीय जनता पक्षाच्या नगर तालुकाध्यक्षपदी मनोज कोकाटे यांची मंगळवारी नियुक्ती झाली. नगर तालुक्याबरोबरच जामखेड तालुकाध्यक्षदी अजय काशीद व पारनेर तालुकाध्यक्षपदी वसंतराव चेडे यांची नियुक्ती झाली आहे. भाजपच्या दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी ही नियुक्ती केली आहे. नगर तालुकाध्यक्षपदावर नियुक्त झालेले मनोज कोकाटे यांनी यापूर्वी भाजपच्या युवा मोर्चाचे काम पाहिले … Read more

प्रेमसंबंध ठेव म्हणत प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘प्रेमसंबंध ठेव’ म्हणत श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील असिफ कबीर पठाण या तरुणाने राहुरी विद्यापीठाच्या उजव्या कालव्याजवळ विवाहित महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती महिला गंभीर जखमी झाली. एखाद्या फिल्मी ‘लवस्टोरी’लाही लाजविणारी ही घटना रविवारी सायंकाळी घडली.  प्रेयसीवर धारदार सुऱ्याने वार करून फरार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या मदतीने विवाहित तरुणीवर बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे राहणारा आरोपी बाबासाहेब लक्ष्मण छत्रे याने त्याची पत्नी संगिता हिच्या मदतीने एका २७ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीवर त्याच्या शेतात इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तसेच यातील आरोपी बाबासाहेब छत्रे व त्याची पत्नी संगिता यांना दोन मुली आहेत. त्यांना मुलगा नाही. या कारणातून संगिता हिने नवरा बाबासाहेब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याने तोडला मुलाचा कान

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी: राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथे काही तासापूर्वी तीन वर्षाच्या चिमुकलीचा कान तोडून बिबट्याने धूम ठोकली. श्रेया मंजाबापू जाधव असे, या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, श्रेयाला अहमदनगर जिल्हा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कानासह तिच्या गालावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. पिंपळगाव फुणगी येथे गव्हाच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ताजे निशाण … Read more

कांद्याच्या भावात झाली इतकी घट

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहुरी येथील बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर लाल कांद्याला १९०० ते २५०० रूपये क्विंटल भाव मिळाला. शनिवारी वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर एक नंबर कांद्याला २००० ते २८०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता. शनिवारच्या तुलनेत क्विंटलमागे ३०० रूपयांनी भाव उतरले. रविवारी ६ हजार २३० गोणी लाल कांद्याची आवक झाली. दोन … Read more

अहमदनगर जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्थांनी कोरोनाचा घेतला ‘धसका’

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : भारतात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात या आजाराचा फारसा धोका दिसत नसला, तरी आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.  दिवसंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने दक्षता म्हणून जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शिर्डी … Read more

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आजी आणि नातीचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील ५५ वर्षीय महिलेसह साडेतीन वर्षांची मुलगी ठार झाल्याची घटना नगर-पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील स्माईल स्टोन जवळ शुक्रवारी (३१ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास घडली. मधुकर ठोकळ (वय ५८, कामरगाव, ता.नगर) हे त्यांची पत्नी आशा मधुकर ठोकळ व त्यांची नात ईशा अमोल ठोकळ यांच्यासह त्यांच्या दुचाकीवरून नगरकडून … Read more

पाणीपट्टीच्या आकारणीत दुप्पट करवाढ ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : नगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नगरकरांना पाणीपुरवठा केला जातो, ही योजना चालवण्यासाठी मनपाला वर्षभरात २४ ते २५ कोटी खर्च येतो. त्यातुलनेत वसुलही अपुराच होत असल्याने योजनेवरील खर्च भागवणे मनपासाठी अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने पाणीपट्टीच्या आकारणीत दुप्पट करवाढ स्थायीकडे सुचवली आहे. मनपाच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात ही वाढ अपेक्षित … Read more

८३ रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : शहरातील प्रमुख ८३ रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेने या रस्त्यांच्या कामाचा विकास आराखडा तयार केला आहे. तो लवकरच शासनाकडे पाठवला जाणार आहे. सुमारे ७०० कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होईल, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. महापालिका … Read more

अडचणीच्या काळात पंकजा मुंडे यांना साथ देऊ

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :राजकीय अडीअडचणीच्या काळात आमच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मनापासून साथ देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहू. त्यांनी बहीण मानले आहे. त्यामुळे बहिणीचा तालुका प्रेमात व विश्वासात कधीही अंतर पडू देणार नाही, २०१४ ची निवडणूक मी प्रथमच लढवली. या भागातील मतदारांनी भरभरून मते दिले. मात्र, त्या तुलनेत या भागात विविध … Read more

म्हणून अहमदनगर जिल्हा विभाजन प्रलंबितच राहणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एक नवीन जिल्हा निर्माण करण्यासाठी सुमारे ७०० ते हजार कोटी रुपये लागतात. नवा जिल्हा निर्मिती करणे सोपे नसते. नवीन जिल्हा बनवण्याची कुठलीच माहिती आमच्याकडे नाही. त्यामुळे कुठलाही जिल्हा होण्याचा प्रश्नच नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हा विभाजनाबाबत स्पष्ट मत मांडल्याने नगर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांचे विभाजन पुन्हा … Read more

अहमदनगरमध्ये चारा छावणीत गैरव्यवहार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळात राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावणीत जनावरांची संख्या खोटी दाखवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तक्रारी आलेल्या चारा छावण्यांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पातळीवरील समिती गठित करण्यात आली असून, समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री … Read more

कर्जमाफीपासून हिवरे बाजार वंचित ! कारण वाचाल तर तुम्हालाही धक्काच बसेल !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ नगर तालुक्यातील १५ हजार १९ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे ९१ कोटी ६५ लाख ८४ हजारांचे कर्ज माफ झाले. आदर्श गाव हिवरे बाजारच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १०० टक्के वसुली असल्याने त्यांचा एकही कर्जदार थकीत नसल्याने ते गावच कर्जमाफीपासून वंचित राहिले. २०१४ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: झोपेतच विद्यार्थ्यांनीला पेटविण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विदयालयातील इयत्ता ११वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थीनीला झोपेतच गादीसहीत (बेड) पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना बुधवार दि.२९ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामध्ये वैष्णवी भांगरे राहणार – बोधेगाव ता- शेवगाव ही भाजली असून तिच्या हात व पायाला गंभीर दुखापत … Read more

थंडीचा कडाका पिकांना ठरणार फायदेशीर

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेल्या दोन दिवसांपासून राहुरीच्या पूर्व भागात थंडीचा कडाका वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. कारण ही थंडी गहू, हरभरा व कांदा पिकास अनुकूल असल्याने पिकांची वाढ होण्यास मदतच होईल.  राहुरीच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, पिंपरी, वळण, महाडूक सेंटर, मांजरी आदी गावातील लाभक्षेत्रात शेतकरी बांधवांनी यंदा आपल्या शेतात मोठ्या … Read more

आमदार रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक : कर्जतमध्ये एमआयडीसी उभारण्यास मान्यता !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत येथे एमआयडीसी उभारण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याचे उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी गुरूवारी सांगितले. मुंबईत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ३८५ व्या बैठकीत त्या बोलत होत्या.  यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रोहित पवार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय काटकर उपस्थित होते.  कर्जत … Read more