ही माझी शेवटची निवडणूक, चंद्रशेखर घुलेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद !

chandrashekhar ghule

राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी करण्याचा निर्णय निश्चित झाला असून, ही माझी शेवटची निवडणूक असल्याने या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहावे, त्यासाठी जे करावे लागेल ते करू असे परखड मत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले आहे. दि.१६ ऑगस्ट रोजी घुले यांचा वाढदिवस असून, या वाढदिवसानिमित्त … Read more

ठाकूर निमगांव येथे आण्णासाहेब साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

gokul daund

शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगांव येथे आण्णासाहेब साठे यांची १०४ वी जयंती सोमवार दि ५ आॅगस्ट रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोकूळभाऊ दौंड होते. यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी ठाकूर निमगांव चे मा सरपंच रघुनाथ घोरपडे, विशाल घोरपडे, लहुजी ग्रुप चे नामदेव घोरपडे, संतोष … Read more

ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे पिकांमध्ये तणाची वाढ, रोगांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव !

moog

शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव परिसरात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाल्यानंतर जून महिन्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या कमी जास्त प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरिपाची पेरणी केली. त्यानंतर पिकेही जोमात आली; परंतू गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार बुरबुर पावसामुळे पिके रोगाला बळी पडत आहेत. त्यामुळे पिकांची वाढ खुंटुन रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला … Read more

मतदारांनी मतदान रुपी शिक्का मारून अ‍ॅड. ढाकणे यांना विधानसभेत पाठवावे : खा. लंके !

lanke

पाथर्डी शेवगाव पाथर्डी मतदार संघातील बेरोजगारी संपवण्यासाठी या भागात मिनी एमआयडीसी उभारण्यासाठी मी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत.या कार्याला अधिक गती मिळावी यासाठी अ‍ॅड. प्रताप काका यांचा विधानसभेचा उमेदवारीचा अर्ज मी पवार साहेबांकडून मंजूर करून घेतो. तुम्ही मतदान रुपी शिक्का मारून अ‍ॅड. ढाकणे यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन खा. निलेश लंके यांनी केले. अ‍ॅड. … Read more

शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दोन आरोपी जेरबंद, शेवगाव पोलीसांची कामगिरी !

shevgav

शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दोन आरोपी शेवगाव पोलीसांनी गजाआड केले आहेत. अशोक बाबुराव कदम, लक्ष्मण उर्फ बबलु दत्तात्रय मडके दोघे (रा.गदेवाडी, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ हरिशचंद्र इसरवाडे रा. गदेवाडी यांनी ए.के. ट्रेडिंग कंपनी नावाचे शेअर मार्केट गदेवाडी येथे ५ लाख रुपयांची फसवणुक झाल्याची फिर्याद दिली … Read more

शेअर मार्केटमध्ये इसरवाडे यांची पाच लाखांची फसवणूक, शेअर ट्रेडिंग व्यावसायिकावर शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल !

fraud

शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्याने एका एजंटने गदेवाडीसह परिसरातील अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गदेवाडी (ता. शेवगाव) येथील शेअर मार्केट व्यवसाय करणाऱ्या तिघांविरुद्ध जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. इसरवाडे यांनी शेवगाव पोलिसांत … Read more

शहरात घाणीचे साम्राज्यामुळे शेवगाव शहर बनले आहे बकाल, नगरपालिकेचे होत आहे दुर्लक्ष !

kachara

शहरात ठिकठिकाणी असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे शहर बकाल होत असल्याचे दिसून येत असून, मुख्य बाजारपेठेतील रस्ते तसेच नागरी वस्तीतील परिसर, ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांनी गटाराचे रूप धारण केले आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आंदोलनाला उधाण आलेले असून, फक्त देखाव्या पुरतेच आंदोलने सुरू असून, नागरिकांचे … Read more

शेवगाव व पाथर्डी दोन्ही तालुक्यात कधीही भेदभाव न करता समान निधी दिला : आ. राजळे

monika rajale

गेली १० वर्षापासून आमदार असताना मी कधीही भेदभाव न करता शेवगाव व पाथर्डी या दोन्ही ही तालुक्यात विकासाची समान कामे करण्याचा सातत्त्याने प्रयत्न केला असून, मतदारसंघाचा जेवढा विकास करता येईल, तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यातील मुंगी, दहिगाव शे, बोधेगावसह सोनविहीर ते कांबी या … Read more

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात ग्रामसडक योजनेअंतर्गत ५४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर – आ. राजळे !

monika rajale

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक २ मधून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील ३९ कि.मी. सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी ५४ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजुर झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. आमदार राजळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात प्रथमच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना एवढा मोठा निधी मिळाला आहे. याबाबत माहिती देताना … Read more

प्रस्थापित कारखानदारांना निवडणुका आल्यावरच जनतेची आठवण येते – किसन चव्हाण

kisan chavhan

शेवगाव – पाथर्डी तालुक्यात किमान १५० घोंगडी बैठका झाल्या, या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून मोठी जनशक्ती वंचित बहुजन आघाडीमध्ये तयार झाली आहे. बहुतेक शेतकरी, गोरगरीब कुटुंबांना, घरकुल, डोल, कुपन, शिवरस्ते, पाणंद रस्ते, वीजपुरवठ्यासंदर्भात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने घरात बसलेले आणि जनतेला वाऱ्यावर सोडून दिलेले मतदारसंघातील कारखानदार घराबाहेर पडले आहेत. निवडणुका आल्यावरच … Read more

१० वर्षापासून ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी तालुक्याचा काय विकास केला – घुले !

ghule

स्व. घुले पाटील यांचेपासून ते आज पर्यंत शेवगाव तालुक्यातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी घुले घराणे कायम पुढे राहिले असून येथून पुढच्या काळात तीच आमची वाटचाल राहणार आहे. असे मत स्व. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी व्यक्त केले आहे. आगामी राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये … Read more

पाट पाणी आणणे व जिरायत शेतीसाठी पाणी हेच माझे मुख्य ध्येय – अॅड. ढाकणे

adv dhakane

जनतेच्या हितासाठी विधानसभा निवडणुक लढवल्या. मात्र, यामध्ये माझा पराभव झाला तरी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून न्याय देण्याचा प्रयत्न केला, येथून पुढच्या काळातही तो संघर्ष सुरूच राहील. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह परिसरात आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधींनी शेतीच्या पाणी प्रश्नासाठी लढा न दिल्याने हा जिरायत भाग अजूनही पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्वभागात शेतीसाठी … Read more

केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत पोहचवाव्या – आ. मोनिका राजळे !

monika rajale

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचवणे आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी आठशे रुपये मिळत होते; परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता पंधराशे रुपये मिळत आहे. खरीप पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, योजनेच्या जाचक अटी शिथिल … Read more

त्या सर्व शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम सरसकट मिळावी – चंद्रशेखर घुले

pikvima

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ज्या शेतकऱ्यांनी सन २०२३-२४ यावर्षी पिकविमा भरला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम अदा केली जावी तसेच मागणी असेल त्या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषदेत केली. श्री. घुले यांनी मतदारसंघात जनसंवाद परिवर्तन यात्रा सुरू केली असून, या यात्रेत लोकांचे प्रश्न व … Read more

खा. निलेश लंकेमुळे प्रतापकाका ढाकणे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा

थोड्याच दिवसात राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पार पडणार असुन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी झालेले खासदार निलेश लंके यांच्या निवडून आलेल्या खासदारकीमुळे शेवगाव- पाथर्डी या विधानसभा मतदार संघात केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड. प्रतापराव बबनराव ढाकणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार … Read more

पाण्याअभावी भाजीपाला मोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ ! भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगावने परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने परिसरातील पाणीसाठे संपुष्टात येत आहेत. अशा स्थितीत घाम गाळून घेतलेल्या भाजीपाल्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे भाजीपाल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील काळात लावलेला भाजीपाला मोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेवगाव तालुक्यातील देवटाकळी व परिसरातील पाझर तलाव व साठवण तलावातील … Read more

टोलनाक्यालाच शेतकऱ्याकडून आडवे दांडके…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरपाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण -निर्मळ राष्ट्रीय महामार्ग ६१, या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच या महामार्गावर मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड, या ठिकाणी वाहनांसाठी उभारण्यात आलेला टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण ज्या ठिकाणी हा टोलनाका उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने या टोलनाक्याजवळच पत्र्याचे … Read more

तीव्र पाणीटंचाईमुळे कहेटाकळीचे ग्रामस्थ त्रस्त ! जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी प्रकल्पामध्ये पुनर्वसित झालेले तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे कहेटाकळी गावचे ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले असून, गावाला चार-पाच दिवसातून एकदा व तोही अत्यंत कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. गावाच्या पायथ्याला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अथांग पसरलेला नाथ जलाशय, गावातून उघड्या डोळ्याने नाथसागराचे पाणी दिसतेय; परंतू ‘धरण उशाला आणि कोरड … Read more