गायीला वाचविण्यास गेलेल्या दोघांवर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे बिबट्याने गायींवर हल्ला केला त्याच्या बचावासाठी आलेल्या दोन व्यक्तींना जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री … Read more

मुलाचा खून करणार्‍या आरोपीला अटक करण्याची आईची आर्तहाक

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-पंधरा दिवसापुर्वी नगर तालुक्यात ओमकार भालसिंग याच्यावर खूनी हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असता सदर प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन मयत मुलाची आई लता बाबासाहेब भालसिंगने सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले. यावेळी आशाबाई कासार, विष्णू कासार, अंजली कासार आदि उपस्थित होते. नगर तालुका येथील … Read more

शहर राष्ट्रवादीच्या वतीने दिल्लीच्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंगळवार दि. 8 डिसेंबर भारत बंद मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती … Read more

नवदाम्पत्यांनी वृक्षरोपणाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेंडी-पोखर्डी (ता. नगर) नगर- औरंगाबाद रोड येथील साईमुरली लॉन्स मध्ये झालेल्या लग्नात वधू-वरांनी वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. निमगाव वाघा (ता. नगर) येथील अतुल फलके यांचा विवाह शेंडी येथील अनिता निमसे यांच्याशी पार पडला. यावेळी स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या वृक्षरोपण … Read more

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात निषेध

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर समस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काही वेळेसाठी लिलाव बंद करून घोषणाबाजी करत निर्यात बंदीचा निषेध नोंदवला.सध्या कांदा निर्यात बंद असल्याने कांद्याचे भाव घसरले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याकरीता केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी … Read more

पांगरमलची ‘ती’ दारू ‘या’माजी आमदाराच्या माणसांनी पुरवली गाडे यांचा खळबळजनक आरोप

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्हा परीषद पंचायत समिती प्रमाणे मार्केट कमिटी ही ताब्यात घेणार . लोकशाही पद्धताने बँकेचे ठराव झाले तर कर्डीले यांना पंधरा मते सुध्दा पडणार नाही . गावात एक ठराव होतो इकडे दुसऱ्यालाच उभे केले जाते . पांगरमल दारू हत्याकांडामध्ये मा. आ. कर्डिले यांच्या लोकांनी विषारी दारू पुरवल्यामुळे लोकाना जीव गमवावा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या चोवीस तासांतील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५२ ने वाढ झाली. … Read more

काय सांगता! आ.लंके यांच्या मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांचा मतदार यादीत समावेश

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- दररोज काहीतरी आपल्या आजूबाजूला काहीतरी नवीन घडामोडी घडत असतात. मात्र राष्ट्रवादीच्या आमदाराच्याच मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांची येथील स्थानिक मतदार यादीत नावे समावेश करण्यात आल्याचा प्रकार घडला असून,यामळे मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील सुपा येथे म्यानमार येथील तब्बल ९२ परदेशी नागरिकांना मतदानाचा हक्क मिळाला … Read more

शेतकरी विरोधातील जुलमी कायदे रद्द करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य, अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने शेतकरी विरोधातील जुलमी कायदे रद्द करण्याची मागणी करुन, देशव्यापी बंदमध्ये सहभागी होऊन दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. शेतकरी विरोधातील जुलमी कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष … Read more

मार्केटयार्ड चौकात रास्ता रोको आंदोलकांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेतकरीविरोधी असलेल्या तीन नव्या कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे मागील दहा दिवसापासून सुरु असलेल्या आंदोलनाची केंद्रातील भाजप सरकार दखल घेत नसल्याने मंगळवारी (दि. 8 डिसेंबर) रोजी शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर अ.भा. किसान कामगार समन्वय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर भारत बंद मध्ये सहभागी … Read more

अन्यायकारक कृषी कायदे रद्द करा समाजवादी पार्टीची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर पारित केलेले तीन अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली, तर भारत बंदला पाठिंबा दिला. मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जिल्हाधिकारी कार्यालय येथे अन्यायकारक कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच केंद्रातील भाजप सरकार … Read more

मंत्री दादासाहेब भुसे यांनी जाणून घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची मते

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-राज्याचे कृषी मंत्री आणि नगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. दादासाहेब भुसे हे सोमवारी नगर दौऱ्यावर होते . आपल्या दौऱ्यात त्यांनी नगरच्या शासकीय विश्रामग्रहावर शिवसेनेच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न व्हावेत . नेते आणि कार्यकर्त्यांना काम करीत असताना कोणत्या अडचणी येत … Read more

रस्तालूट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यत घेतले

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास अज्ञात तिघांनी रस्त्यात थांबवुन दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन ५९,०००/- रु किमतीचे त्यात दोन मोबाईल व एक पल्सर मोटर सायकल असा मुददेमाल बळजबरीने चोरुन नेला. या प्रकरणी अंकुश विनायक तौर, (वय २२, रा. टाकरवन,ता माजलगाव जि. बीड) यांनी पाथर्डी पो.स्टे येथे फिर्याद दाखल केली होती. … Read more

बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घाला

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकतेच नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यात अनेकांचे जीव घेतले आहेत. त्यानंतर करमाळा तालुक्यात शिरलेल्या बिबट्याने आता पर्यंत तीन जणांचे बळी घेतले आहेत. करमाळा तालुक्यातील बिबट्या नरभक्षक बनला असल्याने तो … Read more

राहत्या घरात गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-घरचे बाहेर गेल्याचे पाहत रहात्या घरामध्ये पंख्याच्या छताला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार जामखेड शहरातील मोरे वस्तीवर घडला आहे. विशाल ठाकरे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत विशाल ठाकरे हा वॉटर फिल्टरचा व्यवसाय करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची … Read more

घरात घुसून टोळक्याकडून महिलेला मारहाण; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. तसेच जिल्ह्यात दरदिवशी घडणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे घरामध्ये एकटी असलेल्या महिलेला दहा महिला व पुरुष यांनी घरात घुसून मारहाण व शिवीगाळ केल्याची … Read more

धक्कादायक! उसाच्या शेतात आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-एका ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान हा खळबळजनक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. समजलेल्या अधिक माहितीनुसार मृत महिलेच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारुन खून करुन तो मृतदेह उसाच्या शेतात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या ! अटकपूर्व जामिनावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्यापूर्वीच पोलिसांना नोटीस काढत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता बोठेच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे असल्याचे समोर आल्यानंतर त्याचा समावेश आरोपीत करण्यात आला … Read more