रस्तारोको करत शेतकरी आंदोलन तीव्र करणार; यांनी दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून देशभर कृषी कायद्यावरून आंदोलने पेटली आहे. शेतकरी संघटनांसह अनेक राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यातच या मुद्यावरून नगर जिल्ह्यामध्ये देखील निदर्शने करण्यात आली आहे. आता हि आंदोलने तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी … Read more

थकीत कर्जदारांना लाखोंचे कर्ज वाटले; २७ संचालकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील वेळू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेमध्ये संचालकांनी सचिवास हातास धरून थकीत कर्जदारांना कर्ज वाटप करून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फिर्यादी सुनील खर्डे (विशेष लेखा परीक्षण अधिकारी) यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अपहार केल्याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज १४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार ३८९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१९ ने वाढ … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपींची नावे समोर,पण मास्टरमाईंड…

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.  तपासला प्रगती असून पुढील आरोपींच्या शोधात पोलिस आहेत. हे हत्याकांड सुपारी देऊन झाल्याचा पोलिसांचा दावा असून याप्रकरणी ही सखोल तपास करत आहेत. यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा … Read more

आठ महिन्यांपासून कोरोनाची भीती आता त्यात बिबट्यांची भर

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-आठ महिन्यांपासून कोरोना संसर्गाची भीती सर्वांना वाटत होती. आता त्यात बिबट्यांची भर पडली आहे. बाहेर पडले की कोरोनाची आणि शेतात गेले की, बिबट्यांची दहशत शेतकऱ्यांना वाटते. शेतीसाठी रात्रीच वीज पुरवठा केला जात असल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जावे लागते. महावितरणने दिवसा वीज दिली, तर बिबट्यांच्या तावडीत सापडण्याची वेळ आमच्यावर … Read more

आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर पिता-पुत्राचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-खर्डा येथील श्रीछत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाच्या जागेची मंडलाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास १५ दिवसांत सादर केला जाईल, असे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर बागडे पिता-पुत्रांनी आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोरील उपोषण मागे घेतले. खर्डा येथील श्रीछत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ संचलित श्रीछत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, संत गजानन … Read more

बिबट्या विहिरीत पडल्याची व्हिडीओ क्लिप खोटी

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-नगर तालुक्यातील कापूरवाडी परिसरात बिबट्या विहिरीत पडला असल्याची व्हिडीओ क्लिप सोमवारी दुपारी व्हॉटस् अॅप ग्रूपवर व्हायरल झाली. मात्र, ही क्लिप कापूरवाडी भागातील नसून कुणीतरी खोडसाळपणा करून ती व्हायरल केली असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे व निसर्गमित्र मंदार साबळे यांनी सांगितले. सध्या नगर तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचे दर्शन होत … Read more

कार्यक्रमात जाऊन दगडफेक करून धिंगाणा घातल्याप्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-दुसऱ्याच्या हळदीच्या कार्यक्रमात जाऊन दगडफेक करून धिंगाणा घातल्याप्रकरणी ११ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. नऊ जणांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली, तर दोन जण फरार असल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कोपरगाव शहरातील टाकळी नाक्याजवळ राहणाऱ्या योगीता संजय थोरात यांच्या दिराच्या हळदी कार्यक्रम चालू असताना आरोपी दीपक राजेंद्र … Read more

शास्तीमाफीला मुदतवाढ दिल्याने मोठा दिलासा’

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-महापालिकेने मालमत्ता करावर ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. या माफीची मुदत नोव्हेंबरअखेर संपणार होती. ही मुदत वाढवण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापाैर भगवान फुलसाैंदर व मी आयुक्तांकडे केली. त्यानुसार मुदतवाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात कर जमा होऊन महापालिकेचे कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावता येतील. महापालिकेच्या … Read more

पुन्हा पकडला गुटखा; दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-दुचाकीवरून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी अकोले रोडवर करण्यात आली. दुचाकीवर अवैध गुटखा वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळताच अकोले नाका येथे पथक पाठवून कारवाई करण्यात आली. गोपाळ एकनाथ राठी (४०, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्येप्रकरणी दोघे ताब्यात, धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता..

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काल रात्री उशिरा नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, ही हत्या … Read more

देह व्यापारातील बळी महिलांना आरोग्याच्या विविध योजनांचा लाभ देण्यास जिल्हारुग्णालय कटिबद्ध– डॉ.अरुण सोनवणे

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- देह व्यापारातील बळी महिलांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ देण्यास जिल्हा रुग्णालय कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालयाचे हिपँटायटीस बी तपासणी मोहिमेचे समन्वयक डॉ. अरुण सोनवणे यांनी केले. जागतिक एच. आय. व्ही./एडस सप्ताहनिम्मित स्नेहालय, लायन्स क्लब अहमदनगर, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय आणि महालँब अहमदनगर … Read more

पालकमंत्री मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर,नुकसानग्रस्तांना देण्यात येणार्‍या मदतीचा घेणार आढावा

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार, दिनांक ०३ डिसेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9-45 वाजता मुंबईहून शिर्डी विमानतळ येथे आगमन व श्री साईबाबा मंदीराकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता श्री साईबाबा दर्शन. … Read more

निकृष्ट कामे करणाऱ्यांची बिले अदा करू नयेत -आमदार पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात येऊ नयेत अश्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपच्या ठिय्या आंदोलनांच्या प्रसंगी दिल्या. श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून खराब रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या चालू आहे पण हे काम करताना सार्वजनिक … Read more

27 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नुकतेच कोरोनाच्या काळात पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान झाले. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांसह कार्यकर्ते देखील जोमाने निवडणुकीच्या कामात पुढाकार घेत आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्रीरामपूर तालुक्यातील माहे जुलै … Read more

तरुणीच्या मोबाईलवर संदेश पाठवत केला विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका 23 वर्षीय तरुणीच्या मोबाईलवर व्हाट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे बोलून धमकी … Read more

रेखा जरे खून प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या … Read more

वस्त्र परिधान मुद्यावरून तृप्ती देसाईंनी उपस्थित केला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- जगभर ख्याती असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. आता याच मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती … Read more